इंग्रजांच्या कपटनितीमुळे शेवटच्या ‘मुघल सम्राटाचा’ मृत्यू झाला – जाणून घ्या कसा ते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताच्या इतिहासामधील मुघल हे एक महत्त्वाचा भाग आहेत. मुघलांनी भारतामध्ये अनेक वर्ष आपली सत्ता कायम ठेवली.
अगदी ब्रिटीश भारतामध्ये येईपर्यंत भारतामध्ये मुघलांनी आपली सत्ता कायम ठेवली होती.
पण इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी या मुघल साम्राज्याला संपवले आणि भारताला स्वतःच्या अधिपत्याखाली घेतले.
आज आम्ही तुम्हाला या मुघल साम्राज्याच्या शेवटच्या शासकाचा म्हणजेच बहादूर शाह जफरचा मृत्यू कसा झाला याबद्दल सांगणार आहोत!
चला तर मग जाणून घेऊया, या मुघल साम्राज्याच्या शेवटच्या शासकाविषयी..
सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारमध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्यावेळी ते अंतिम मुघल शासक असलेल्या बहादूर शाह जफरच्या मजारवर गेले होते.
बहादूर शाह जफरची कबर नक्की कुठे आहे, याविषयी शंका आहे,
आणि त्यामुळे यावर सगळीकडे चर्चा झाली होती की, मोदी ज्या मजारवर गेले होते ती बहादूर शाह जफरची खरी मजार आहे का ?
६ नोव्हेंबर १८६२ मध्ये भारताचा शेवटचा मुघल शासक बहादूर शाह जफर द्वितीय किंवा मिर्झा अबूजफर सिराजुद्दिन मुहम्मद बहादूर शाह जफर याला लकव्याचा तिसरा झटका आला,
आणि ७ नोव्हेंबरच्या सकाळी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सैय्यद मेहंदी हसन यांनी आपल्या ‘बहादूर शाह जफर अँड द वॉर ऑफ १८५७ इन डेली’ या पुस्तकात लिहिले आहे की,
बहादूर शाह जफरची तब्येत दिवसागणिक बिघडत जात होती आणि २ नोव्हेंबरला त्याची तब्येत खूपच बिघडली.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पाहण्यासाठी डॉक्टर आले, त्यांनी सांगितले की, बहादूर शाह जफरच्या गळ्याची परिस्थिती खूपच खराब आहे.
–
हे ही वाचा – अवघ्या २००० मावळ्यांनी जेव्हा हजारो मुघलांना पळवून लावलं होतं…!!
–
सैय्यद मेहंदी हसन यांनी आपल्या या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, ६ नोव्हेंबरला डॉक्टरने सांगितले की, त्याच्या गळ्याला लकवा मारला आहे आणि ७ नोव्हेंबर १८६२ रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, ज्यावेळी बहादूर शाह जफरचा मृत्यू झाला, त्यावेळी ते भारतापासून लांब रंगूनमध्ये इंग्रजांच्या कैदेत होते.
ब्रिगेडियर जसबीर सिंग यांनी त्यांच्या ‘कॉम्बॅट डायरी: अॅन इलस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ ऑपरेशन्स फॉर फोर्थ बटालियन, कुमाऊं रेजिमेंट १७८८ ते १९७४’ या पुस्तकात लिहिले आहे की,
बहादूर शाह जफरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी ४ वाजता ८७ वर्षाच्या या मुघल शासकाला रंगूनमध्येच दफन करण्यात आले होते.
त्यांनी यामध्ये लिहिले आहे की, रंगूनच्या ज्या घरामध्ये बहादूर शाह जफरला कैद करण्यात आले होते. त्याच घरामागे त्याची कबर बनवण्यात आली होती!
आणि त्याला तिथे दफन केल्यानंतर त्या ठिकाणावरील जमीन सारखी करण्यात आली.
माहितीनुसार, जेव्हा त्याच्या मृतदेहाला दफन केले तेव्हा त्याची दोन मुले आणि एक विश्वासू सेवक देखील तिथे उपस्थित होते.
पण इंग्रजांनी बहादूर शाह जफर यांच्या कबरची निशाणी देखील सोडली नाही. आता यामागे नेमका त्यांचा काय हेतू होता याबाबत कुठेही काहीही लिहिलेले नाही.
पण भारताचा शेवटचा मुघल सम्राट आणि त्याच्या मृत्यूची निशाणीही भारतीयांना माहित नसावी असा खटाटोप करण्यामागे इंग्रजांची काय कुटनीती असेल हे कळायला मार्ग नाही…
सैय्यद मेहंदी हसन लिहतात की, त्यावेळी बहादूर शाह जफरच्या कबरीजवळ बांबूचे एक कुंपण बनवण्यात आले होते.
पण हळूहळू ते नष्ट झाले आणि त्या ठिकाणी गवत उगवले गेले. ज्याच्यानंतर या शेवटच्या मुघल शासकाच्या कबरीची शेवटची निशाणी देखील नष्ट झाली.
लेखक विल्यम डेरिम्पल याने आपल्या ‘द लास्ट मुगल‘ या पुस्तकात म्हटले आहे की, वर्ष १८८२ मध्ये बहादूर शाह जफरची पत्नी जीनत महलचा मृत्यू झाला.
त्यावेळेपर्यंत बहादूर शाह जफरची कबर कुठे होती, हे कोणालाही लक्षात नव्हते. डेरिम्पल यांनी लिहिले आहे की, वर्ष १९०३ मध्ये भारताचे काही पर्यटक बहादूर शाहच्या मजारवर येऊ इच्छित होते.
त्यावेळेपर्यंत लोक जीनत महलच्या कबरीची जागा देखील विसरले होते. त्यावेळी स्थानिक गाईडने एका म्हाताऱ्या झाडाकडे बोट दाखवून हे सांगितले की, हीच बहादूर शाहची कबर आहे.
वर्ष १९०५ मध्ये मुघल बादशाहच्या कबरीची ओळख आणि तिला सन्मान देण्यासाठी रंगूनमध्ये मुस्लिम समुदयाने आंदोलन सुरू केले.
यांच्यासाठी कितीतरी महिन्यांपर्यंत निदर्शने चालू राहिली, ज्याच्यानंतर वर्ष १९०७ मध्ये ब्रिटीश प्रशासनाने या गोष्टीला परवानगी दिली आणि बहादूर शाह जफरच्या कबरीवर दगड लावण्यात आले.
या प्रकरणामध्ये असे ठरवण्यात आले की, या दगडावर लिहिण्यात येईल की,
‘बहादूर शाह दिल्लीचे पूर्व बादशाह, रंगूनमध्ये ७ नोव्हेंबर १८६२ मध्ये मृत्यू, या जागेच्या जवळपास दफन करण्यात आले होते.’
यानंतर याचवर्षी जीनत महलच्या कबरीवर दगड लावण्यात आला. सैय्यद मेहंदीने देखील या बाबतीत त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, १९०७ मध्ये ब्रिटनी अधिकाऱ्यांनी एक कबर बनवून तिथे दगड लावले.
अशाप्रकारे बहादूर शाह जफर या शेवटच्या मुघल शासकाचा अंत झाला आणि त्याची कबर नक्की कुठे आहे, हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
===
हे ही वाचा – मुघलांचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा मुलींची लग्न नातेवाइकांतच लावत
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.