Site icon InMarathi

‘मनी प्लांट’ : घराघरात रुजलेल्या आधुनिक अंधश्रद्धेमागची रंजक कथा

mani plant InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यापैकी अनेकांच्या घरात एखाद्या छोट्याश्या बाटलीत किंवा कुंडीत एक रोपट बघायला मिळत. जे रोपट सूर्याच्या प्रकाशाविना देखील फार काळापर्यंत हिरवेगार राहत. आम्ही बोलत आहोत ‘मनी प्लांट’बद्दल…

 

 

मनी प्लांट एक असं झाड आहे जे अनेक लोकं आपल्या घरात लावतात, यामागे त्यांचा असा विश्वास असतो की, याने त्यांच्या घरात कधी पैश्यांची कमी राहणार नाही. या झाडामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल असे लोकं मानतात. पण या झाडाला मनी प्लांट हे नावं कसे पडले आणि या झाडाचा सुख, समृद्धीशी नेमका काय संबंध आहे?

तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का? अनेकदा आपण इतरांचं अनुकरण करण्यासाठी ते जे करतील ते करतो, पण त्यामागे नेमकं काय कारण आहे, काय कहाणी आहे याचा आपण विचारही करत नाही, हो ना..

असो, आज आम्ही तुम्हाला या मनी प्लांटच्या ‘मनी प्लांट’ होण्याची एक अतिशय रंजक कहाणी सांगणार आहोत.

मनी प्लांट विषयी एक लोककथा खूप प्रचलित आहे…

 

एकदा ताईवानमध्ये एक गरीब शेतकरी होता. खूप कष्ट घेऊनही त्याची प्रगती होत नव्हती, तो ज्या सुख-समृद्धी करिता दिवसरात्र मेहनत करायचा ती त्याच्यापासून नेहमीच दूर राहायची.

त्यामुळे तो हताश-निराश राहायला लागला. एकेदिवशी त्याला त्याच्या शेतात एक रोपट सापडलं, शेतकऱ्याने त्या रोपाला उचलले आणि ते त्याने आपल्या घरी नेले. घरी जाऊन त्याने ते रोप घराच्या बाहेरील मातीत लावले. त्याच्या लक्षात आले की, हे रोपट अतिशय लवचिक आहे आणि ते बिना देखभालीचेही स्वत:हून वाढत आहे.

 

हे झाड ज्याप्रकारे स्वताहून वाढत होत, यामुळे त्या शेतकऱ्याला प्रेरणा मिळाली. या झाडाच्या स्वताहून वाढण्याच्या कलेने शेतकऱ्याला काम करण्याची एक नवीन उर्जा मिळाली.

ज्यानंतर शेतकऱ्याने निश्चय केला की, तो देखील या झाडाप्रमाणे आपल्या व्यक्तित्वात लवचिकता आणेल आणि आपल्या ध्येयाप्रती समर्पित होऊन काम करेल. कोणाचीही पर्वा न करता तो त्याच्या ध्येयाकडे वाटचाल सुरु ठेवेल.

काही दिवसांनी त्या झाडाला फुले आली, तेव्हापर्यंत तो शेतकरी देखील स्वतःच्या अपार कष्टाने एक यशस्वी व्यावसायिक बनला होता.

तेथील लोकांनी त्याच्या यशाचे रहस्य त्याच्या घराबाहेर असलेल्या त्या हिरव्यागार झाडाला मानले. याप्रकारे हळूहळू लोकांनी या झाडाला समृद्धीशी जोडले आणि त्याचं नावं “मनी प्लांट” असे ठेवण्यात आले.

 

या व्यतिरिक्त वेगवेगळ्या आधारांवर आणखी काही आख्यायिका आहेत या मनी प्लांटबाबत…

फेंगशुई नुसार, हे झाड आसपासच्या हवेला शुद्ध करतो, ऑक्सिजन देतो. या झाडामुळे रेडीएशनच प्रमाण कमी होते…

 

आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल की, तुमच्या घरात असणाऱ्या त्या मनी प्लांटमागे नेमकी काय कहाणी आहे ते…

त्या शेतकऱ्याची कहाणी वाचून तुमच्या हे तर नक्कीच लक्षात आले असणार की, त्याच्या यशामागे ते झाड नाही तर त्या झाडाचा गुणधर्म होता, जो त्याने आत्मसात केला.

यश हे कोणाच्याही कृपेने किंवा कुठल्याही गुड लक चार्मने मिळत नसतं, तर त्यासाठी मेहनत हाच एकमेव मार्ग असतो… बस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची आपल्यात जिद्द हवी…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

Exit mobile version