Site icon InMarathi

या बाजूला कैलास पर्वत, त्या बाजूला राक्षस तळं जाणून घ्या कैलास मानसरोवरचं रहस्य…

kailas man sarovar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशात धर्म श्रद्धा यांचं एक वेगळं स्वतंत्र स्थान आहे, आणि या गोष्टी मानणारा आणि तितक्याच श्रद्धेने ते पाळणारा एक मोठा वर्ग आहे!

भारतीय लोकांमध्ये श्रद्धा आणि भक्ती खूप मोठ्या प्रमाणत बघायला मिळते.

श्रद्धा ठेवणं योग्य का अयोग्य या वादाच्या लफड्यात कधीही न पडलेलंच बरं, कारण आपण जरी काही गोष्टी पाळत नसलो मानत नसलो तरी इतरांच्या श्रद्धेची थट्टा करायचा आपल्याला काहीच अधिकार नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याचं कारण म्हणजे आपला धार्मिक इतिहास. प्राचीन काळापासूनच आपल्या देशांतील लोक हे धार्मिक गोष्टींमुळे प्रभावित जीवन जगत असल्याचे दिसून येते.

भारतात आणि भारता बाहेरही अशी अनेक धार्मिक स्थळ आहेत ज्यांची मान्यता देशातच नाही संपूर्ण जगातील लोकं मानतात.

 

 

असेच एक श्रद्धास्थान आहे कैलास मानसरोवर, ज्याला १२ ज्योतिर्लिंगांत सर्वात वरचे स्थान प्राप्त आहे. या कैलास मानसरोवर यात्रेकरिता अनेक भाविक येथे येतात.

 

 

समुद्रसपाटीपासून ४.५९० मीटरच्या उंचीवर असलेले हे अतिशय सुंदर असे एक श्रद्धा स्थान आहे.

हा कैलास मानसरोवर तलाव जेवढा सुंदर आहे तेवढाच रहस्यमयी देखील आहे.

 

या धार्मिक आणि पवित्र स्थळासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले ज्यावर अनेक आख्यायिका देखील प्रचलित आहेत.

चला तर मग जाणून घेऊ या काय आहे या मानसरोवराचे रहस्य.

 

 

मानसरोवर हे सर्वात मोठे स्वच्छ आणि गोड पाण्याचं सरोवर आहे. असं मानल्या जाते की या सरोवराची निर्मिती स्वतः भगवान ब्रह्मा यांनी ध्यान करण्यासाठी केली होती.

ते अनेक युगांपर्यंत येथे ध्यानावस्थेत होते आणि त्यांनतर त्यांनी येथूनच विश्वाची संरचना करण्यास सुरवात केली.

आधी या सरोवराचा आकार खूप मोठा होता, पण वेलेसोब्तच या सरोवराचा आकार कमी होत गेला आणि हळूहळू तो आपल्या सद्य स्थितीत आला.

 

 

मानसरोवरला लागुनच असलेला कैलास पर्वत हा केवळ हिंदूंच्याच नाही तर जैन, बौद्ध आणि बॉन लोकांच देखील श्रद्धा स्थान आहे. हे लोकं देखील या धार्मिक स्थानाला खूप मानतात.

काही कैलास पर्वतला भगवान शंकरजीचे रूप म्हणून पूजतात तर मानसरोवरला देवी पार्वतीचे रूप म्हणून पूजतात. कैलास मानसरोवर यात्रेकरिता हजारोंच्या संख्येने भाविक येतात.

यावेळी मानसरोवरची परिक्रमा देखील घालतात. मान्सारोवरचा परीघ ८० किलोमीटरचा आहे. याकरिता ३ दिवस लागतात.

 

 

अनेक लोक असे देखील मानतात की देवी-देवता आणि सप्तऋषी येथे रोज अलौकिक प्रकाशाच्या स्वरुपात ब्रह्ममुहूर्तावर येतात आणि या पवित्र सरोवरात अंघोळ करून परतात.

बौद्ध श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की, राणी मायाने या पवित्र मानसरोवर मध्ये स्नान केल्यानंतरच भगवान बुद्धांना जन्म दिला होता.

असे देखील सांगितले जाते की, आधी या सरोवराभोवती ८ प्रसिद्ध बौद्ध मठ होते.

 

या सरोवराबाबत आणखी एक गोष्ट खूप प्रचलित आहे, जी कदाचित तुम्हाला माहित नसणार.

या सरोवराच्या एका बाजूला धार्मिक मान्यता प्राप्त असे भगवान शंकरजींचे कैलास पर्वत आहे तर दुसऱ्या बाजूला राक्षस तळ देखील आहे, ज्याला अपिवित्र मानल्या जाते.

एवढचं नाही तर या तळ्यातील पाण्याला स्पर्श करणे देखील पाप समजल्या जाते.

 

 

जिथे एका बाजूने मानसरोवर अतिशय सुंदर, पवित्र, गोड पाणी असणारे आणि प्रकाशाचे प्रतिक आहे, तर दुसरीकडे हे राक्षस तळ अपवित्र, खाऱ्या पाण्याचे आणि अंधाराचे प्रतिक असल्याचे मानल्या जाते.

आता नेमक या मानसरोवरचं गुपित काय आहे हे तर अद्यापही उघडकीस आलेलं नाही!

म्हणून ज्याला जसे वाटेल तसे तो स्वतःच्या सोयीप्रमाणे याचे रहस्य उलगडण्यासाठी तथ्य लावत गेला. पण कोणीही आजवर या सरोवराचे रहस्य उलगडू शकला नाही.

तर हे आहे या सरोवरामागचं रहस्य, वाचून थक्क झाला असाल ना? तुम्हाला सुद्धा अशी कोणत्या स्थळाविषयी रहस्यं माहीत असतील तर कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version