‘ह्या’ खेळाडूंच्या बॅटने धावांचाच नाही तर पैश्यांचाही वर्षाव होतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
क्रिकेट तसा तर भारताचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि त्याला लोकप्रिय बनवलंय आपल्या लोकप्रिय खेळाडूंनी. नुकतच BCCI ने या खेळाडूंच्या वार्षिक पगारात वाढ केली आहे. पण हे खेळाडू काही BCCI च्या पगारावरच अवलंबून असतात असे नाही, तर जाहिराती, प्रमोशन्स इत्यादी माध्यमांतून देखील ते पैसा कमावतात.
ह्या खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्याकडून स्वतःच्या ब्रान्डच प्रमोशन करण्यासाठी त्यांच्याशी करार करतात. हे प्रमोशन प्रत्येक ठिकाणी होताना तुम्ही बघितले असेलच, पण खेळाच्या मैदानावर देखील हा प्रचार सुरूच असतो.
क्रिकेट बघताना तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा केव्हा कुठला खेळाडू मैदानावर आपली बॅट घेऊन उतरतो तेव्हा त्याच्या बॅट वर काही स्टिकर्स लागलेले असतात. हेच असत ते मैदानावरील प्रमोशन. यावेळी ज्याप्रकारे रन्स चा वर्षाव होत असतो त्याच प्रकारे त्या खेळाडूंवर पैश्यांचाही वर्षाव होत असतो.
आपल्या बॅटवर हे स्टिकर्स लावण्याकरिता त्यांना खूप पैसे मिळतात. आज आम्ही हेच सांगणार आहोत की कोणता खेळाडू आपल्या बटवर स्टीकर लावायचे किती पैसे घेतो…
विराट कोहली :

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याची तर बातच न्यारी आहे. सध्या तो यशाच्या सर्वात उंच शिखरावर जाऊन विराजमान झाला आहे, आणि नक्की तिथ्पार्य्नात पोहोचण्यासाठी त्याने अतिशय चिकाटीने मेहनत केली. विराटने MRF सोबत १०० कोटींचा करार केला आहे. MRF ही कंपनी विराटच्या बॅट्सची स्पॉन्सर आहे.
एम एस धोनी :

ब्रान्ड इंडोर्समेंटने कमाई करणाऱ्या यादीत आपला धोनी विराट नंतर दुसऱ्या स्थानावर येतो. धोनीने स्पोर्ट्स कंपनी स्पार्टन सोबत करार केलेला आहे. त्याला त्याच्या बॅट वर स्पार्टनच स्टीकर लावायचे वर्षाचे ६ कोटी रुपये मिळतात.
शिखर धवन :

भारतीय क्रिकेट टीमचे गब्बर म्हणजेच आपले शिखर धवन यांचा देखील MRF कंपनीसोबत करार आहे. आपल्या बॅटवर स्टीकर लावायचे तो ३ कोटी रुपये घेतो.
रोहित शर्मा :

रोहित शर्मा यांनी २०१५ साली CEAT कंपनीसोबत करार केला आहे. रोहित आपल्या बॅटबवे स्टीकर लावायचे वर्षाला ३ कोटी घेतो. पण सध्याचा रोहितच फॉर्म बघता ही किंमत वाढण्याची दात शक्यता आहे.
युवराज सिंह :

युवराज आपल्या बॅटवर प्युमा कंपनीच स्टीकर लावतो. आणि यासाठी त्याला ४ कोटी मिळतात. याव्यतिरिक्त तो प्युमाचे शूज, रिस्टबॅण्ड इत्यादीचे प्रमोशन देखील करतो.
क्रिस गेल :

क्रिसगेल याला त्याच्या बॅटवर स्पार्टनचेह स्टीकर लावायचे वर्षाला ३ कोटी रुपये मिळतात.
एबी डी विलियर्स :

दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणजेच आपला एबी डी विलियर्स याला त्याच्या बॅटवर MRF च स्टीकर कावायचे ३.५ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मिळतात.
हे होते ते काही खेळाडू जे आपल्या बॅटने फक्त रन काढत नाहीत तर पैसे देखील कमवतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.