Site icon InMarathi

ही KB, MB आणि GB ची भानगड आहे तरी काय? जाणून घ्या

bit kb byte feature inmarathi

full form in hindi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – विशाल दळवी 

पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड तर सगळ्यांनाचं माहिती आहेत. स्मार्टफोनमध्ये तर मेमरी कार्ड हवंच…! विना स्मार्टफोनचा मेमरी कार्ड म्हणजे स्मरणशक्तीविना माणूसच जणू!

तर या मेमरी कार्डला आपण आपल्या सामान्य भाषेत काय म्हणतो, तर “२ जीबीवालं मेमरी कार्ड”, “४ जीबीवालं मेमरी कार्ड”, “८ जीबीवालं मेमरी कार्ड”…वगैरे…वगैरे…म्हणजे आपण त्या त्या मेमरी कार्डच्या कॅपेसिटीनुसार त्याला नाव दिली आहेत.

 

rs web solution

 

जेवढी मेमरी कॅपेसिटी जास्त तेवढा जास्त डेटा त्यात बसणार. हे ठीक. पण तुम्हाला या केबी, जीबी आणि एमबी चा नेमका अर्थ माहितीये का?

हे सर्व मेमरी मोजण्याचे एकक आहेत.

या मेमरी कॅपेसिटीचे प्रमुख सहा प्रकार आहेत :

YouTube

स्रोत

 

प्रत्येक प्रकारापुढे त्याच संक्षिप्त रूप दिलेलं आहे ज्या नावाने आपण त्यांन ओळखतो. चला तर प्रत्येक प्रकाराबद्दल स्वतंत्ररित्या जाणून घेऊ.

बीट :-

हे मेमरी मोजण्याच सर्वात लहान मोजमाप आहे. बीट हे ० किंवा १ या प्रमाणात असू शकतं.

बाईट (बी) :-

८ बीट एकत्र केल्यावर बनतो १ बाईट…. स्टोरेज साईज मोजताना बाईट हे प्राथमिक मोजमाप म्हणून ग्राह्य धरलं जातं.

किलोबाईट (केबी) :-

१,०४८,५७६ बाईट म्हणजे १ किलोबाईट

मेगाबाईट (एमबी) :-

१,०४८,५७६ बाईट किंवा १०२४ किलोबाईट म्हणजे १ मेगाबाईट

गिगाबाईट (जीबी) :-

१,०७३,७४१,८२४ \बाईट किंवा १०२४ मेगाबाईट म्हणजे १ गिगाबाईट अर्थात आपलं १ जीबी. ज्यामध्ये प्रत्येकी १.५ एमबी साईजची ६८२ इमेजेस मावू शकतात, तर प्रत्येकी ५ एमबीची २०४ गाणी मावू शकतात.

टेराबाईट (टीबी) :-

१,०९९,५११,६२७,७७६ बाईट किंवा १,०२४ गिगाबाईट म्हणजे एक टेराबाईट…! १ टीबीची हार्ड डिस्क आजकाल बहुधा सगळ्यांनाच हवी असते, कारण त्याची कॅपेसिटीचं इतकी जबरदस्त आहे ना !

प्रत्येकी १६ जीबीचे ६४ पेनड्राईव्ह म्हणजे एक टीबी…ज्यामध्ये प्रत्येकी १.५ एमबी साईजची ६९९,०५० इमेजेस मावू शकतात, तर प्रत्येकी ५ एमबीची २०९,७१५ गाणी मावू शकतात.

स्रोत

 

टेराबाईट म्हणजे काही शेवटचे मोजमाप नव्हे, त्यापुढेही मेमरी साईज मोजली जाऊ शकते.

टेराबाईट नंतरची मोजमाप सामान्य स्तरावर वापरली जात नाहीत. तर मोठमोठ्या कंपन्यांचा प्रचंड मोठा डेटा साठवण्यासाठी यांचा वापर केला जातो. इथे आपण गुगलचे उदाहरण घेऊ शकतो.

जगभरातील सर्वात मोठे डेटा सेंटर गुगलचे आहे असे मानले जाते. गुगलच्या या डेटा सेंटरची कॅपेसिटी जवळपास ८ ते १० ईक्साबाईट अर्थात ८ ते १० ईबी एवढी आहे असे म्हणतात!

 

the balance small business

 

मेमरी कॅपेसिटी बद्दलच्या काही समान्य अफवा:

१) १ मेगाबाईट (एमबी) म्हणजे १०२४ किलोबाईट (केबी) पण तसे नसून १ एमबी म्हणजे १००० केबी.

याचे  Binary अर्थात द्विआधारी रूपांतरण पुढीलप्रमाणे:

१०२४ बाईट = १ किब (किबीबाईट), १०२४ किब = १ मीब (मेबीबाईट) आणि अश्याप्रकारे पुढचे गणित

तर Decimal अर्थात दशांश रुपांतरण पुढीलप्रमाणे:

१००० बाईट = १ केबी (किलोबाईट), १००० केबी = १ एमबी (मेगाबाईट) आणि अश्याप्रकारे पुढचे गणित.

स्टोरेज कंपन्या decimal अर्थात दशांश रुपांतरण वापरतात, त्यामुळे जर आपण मूळ केबी चा विचार केला तर वेगळ गणित मांडल जाईल. उदा. ४.७ जीबीची डिव्हीडी म्हणजे ४७०० एमबी.

पण आपल्या कॉम्प्यूटर मधील ऑपरेटिंग सिस्टम मात्र binary अर्थात द्विआधारी रूपांतरण वापरतात. पण आपल्याला दिसताना मात्र ‘किब’च्या जागी ‘केबी’ दाखवतात. म्हणजे वापरणार Binary रुपांतरण आणि दाखवणार Decimal रूपांतरण, यामुळे लोकांचा गोंधळ उडतो.

हेच कारण आहे ज्यामुळे तुमच्या पेन ड्राईव्हची साईज कॉम्प्यूटर प्रॉपर्टीज मध्ये कमी दाखवली जाते. कॉम्प्यूटरमध्ये १,०४८,५७६ बाईट = १ एमबी दाखवली जाते पण प्रत्यक्षात ती १ मीब असते.

अॅप्पलने OS X 10.6 रिलीज केल्यापासून १,०००,००० बाईट = एक एमबी अशी मोजमापाची नवीन पद्धत सुरु केली आहे. (त्यांचं कसं सगळंच वेगळं असतं बुवा!)

२) अजून एक गोंधळ आपण घालतो तो KB आणि Kb मध्ये.

नीट पहा लार्ज आणि स्मॉल अल्फाबेट…! मोठा “B” आणि छोटा “b”

 

YouTube

 

जेव्हा आपण KB लिहितो त्यात दोन्ही अल्फाबेट लार्ज असतात, याचा अर्थ आहे ते किलोबाईट आहे. जेव्हा आपण Kb लिहितो त्यात b स्मॉल असतो, याचा अर्थ आहे किलोबीट.

किलोबीट तेव्हा वापरले जाते जेव्हा आपण नेटवर्क स्पीड बद्दल बोलत असतो.

उदाहरणार्थ, 500Kbps.म्हणजे तुमच्या नेटवर्क डेटा किलोबीट मध्ये मोजला जातो.

 

 

मेमरी कॅपेसिटीसाठी किलोबाईट वापरले जाते. उदाहरणार्थ, 500KB.

आम्हाला माहिती आहे, माहिती जरा गुंतागुंतीची झाली आहे खरी…! पण करणार काय – हे विज्ञान–तंत्रज्ञान आहेच गुंतागुंतीचं!

पण एकदा का हे सगळं गौडबंगाल समजलं की दोस्तांमध्ये इंप्रेशन मारायचा चान्स मात्र हातातून जाऊ देऊ नका !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version