आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
जर तुम्हाला रस्त्यात कोणी नाचताना दिसलं तर तुम्ही काय विचार कराल.. हाच ना की हा कोणी पागल आहे. पण जर तुम्हाला रस्त्यात किंवा चौकात एखादा पोलीसवाला असं करताना दिसला तर तुम्ही काय समजाल… चक्रावलात ना?
पण जर तुम्ही इंदूर शहरात गेलात तर कदाचित तुम्हाला हे चित्र अनुभवायला मिळेल. इंदूर येथील ३८ वर्षीय ट्राफिक पोलीस ऑफिसर आपल्या अनोख्या स्वॅग करिता सध्या चर्चेत आहेत. रंजित सिंह असे या ट्राफिक पोलिसाचे नाव असून ते तुम्हाला इंदूरच्या चौकात ‘Moonwalk’ करत ट्राफिक कंट्रोल करताना दिसतील. आता तुम्हीच विचार करा की हे किती मनोरंजक असेल.
Popstar Michael Jackson च्या स्टेप्स त्या पण इंदूरच्या चौकात एक ट्राफिक पोलीस करतोय… यावर विश्वास ठेवणे जरा कठीणच नाही का?
ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत त्या रंजित सिंह याचं यावर काय म्हणणं आहे बघूया,
“मी खुप आधी पासून Michael Jackson चा फॅन आहे. १२ वर्षांपासून मी त्यांच्या डान्स मूव्ह्ज कॉपी करतोय. आधी लोकं खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघायचे, पण काही काळाने त्यांना माझा अंदाज आवडू लागला आणि मी प्रसिद्ध झालो.”
डान्स वगैरे ठीक आहे, पण डान्स करत असताना ट्राफिक कंट्रोल करणे म्हणजे तारेवरची कसरतच.. पण हे देखील रंजित सिंह खूप चांगल्या प्रकारे करतात.
याबाबत सांगताना ते म्हणतात की,
ट्राफिक कंट्रोल करणे काही सोपे काम नाही, वाहनांच्या आवाजात आणि प्रदुषणाच्या धुक्यात वाहनचालक एका पोलिसाला Moonwalk करताना बघून आश्चर्यचकित होऊन जातात.
रंजित सिंह हे सोशल मिडीयावर देखील खूप पॉप्यूलर आहे. फेसबुकवर त्यांचे ५० हजारावर Followers आहेत.
पण यातच एक चांगली गोष्ट देखील घडली आहे,
रंजित सांगतात की, जिथे त्यांची ड्युटी असते त्या ठिकाणी ट्राफिक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
सुरवातील रंजित यांची ट्राफिक कंट्रोल करण्याची ही पद्धती त्यांच्या सोबतच्यांना काही रुचली नाही, पण आता तर रंजित सिंह आपल्या सहकर्मचाऱ्यांना देखील डान्सच्या मूव्ह्ज शिकवत आहेत.
अशे हे अतरंगी आणि अनोखे ट्राफिक पोलीस ऑफिसर जर आपल्याला प्रत्येक चौकात बघायला मिळाले तर, कल्पना करा की रस्त्याने प्रवास करणे किती रंजक होऊन जाईल आणि आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेणाऱ्या या पोलिसांचेही छंद जोपासल्या जाईल…
स्त्रोत : NDTV
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.