Site icon InMarathi

‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोणताही खेळाडू एका रात्रीत यशस्वी होत नाही की स्टार बनत नाही. त्यासाठी त्याने कितीतरी वर्ष कष्ट केलेले असते. त्यांनी त्यांच्या या खेळासाठी कितीतरी वर्ष मेहनत घेतलेली असते.

पण असे असूनही काही नेमकेच खेळाडू, आपल्या या खेळाच्या कारकीर्दीमध्ये चांगल्याप्रकारे यशस्वी होतात. पण अशी देखील काहीजण आहेत, ज्यांनी भारतासाठी पदके मिळवून देखील आज ते अतिशय दयनीय जीवन जगत आहेत.

१. आशा रॉय, धावपटू

 

 

आशाला देशातील सर्वात जलद स्त्री धावपटू म्हणून घोषित करण्यात आले होते. पण आम्हाला ठावूक आहे की, आपल्यातील बहुतेकांना हिचे नाव देखील माहित नसेल.

पश्चिम बंगालच्या आशाचे वडील भाजी विकतात, तरीदेखील तिने राष्ट्रीय स्तरावर रेकॉर्ड बनवले. नॅशनल ओपन अॅथेलिटीक्स चॅम्पियनशीपमध्ये दोन सुवर्ण पदक मिळवून देखील आशा आज हलाखीचे आणि एक अनामिक जीवन जगत आहे.

पश्चिम बंगाल सरकार तिला एक नोकरीही देऊ शकली नाही. तिने १०० मीटर रेस ११.८० सेकंदामध्ये पूर्ण केली होती. दुखापतीमुळे ती रिओ ऑलम्पिकमध्ये भाग घेऊ शकली नाही.

२. सरवन सिंग, हर्डलर

 

 

१९५४ च्या एशियन गेम्समध्ये ११० मीटर हर्डलरमध्ये देशाला सुवर्ण पदक देणारे सरवन आज एक कॅब ड्रायव्हर आहेत. १४.७ सेकंदामध्ये १३ हर्डलर पार करणाऱ्या ह्यांना आज आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी गाडी चालवावी लागत आहे. पंजाब सरकार त्यांना मदत म्हणून फक्त १५०० रुपये देते.

३. शंकर लक्ष्मण, हॉकी

 

शंकर लक्ष्मण हे ६० च्या दशकामध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. ते अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असूनही उपचाराच्या अभावामुळे शंकर यांचा मृत्यू झाला होता. एवढे सारे पुरस्कार जिंकूनही या महान खेळाडूला पैशाच्या अभावामुळे मरण पत्करावे लागले.

४. माखन सिंग, धावपटू

 

माखन सिंगने १९६२ मधील राष्ट्रीय खेळांमध्ये मिल्खा सिंगला हरवले होते. १९६२ चे एशियन गेम्स आणि १९६४ च्या समर ऑलम्पिक्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९७२ मध्ये सेनेमधून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावात स्टेशनरीचे दुकान चालवत होते.

मधुमेहाने ग्रासलेले माखन यांना १९९० मध्ये पायाला दुखापत झाली, ज्याच्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या माखन सिंग यांना गरिबीतच अखेरचा श्वास घ्यावा लागला.

५. कमल कुमार, बॉक्सर

 

 

कमल कुमार हे एक राज्यस्तरीय खेळाडू आहेत. कितीतरी मेडल जिंकणारे कमल आज कचरा उचलून आपला उदरनिर्वाह करत आहेत. NDTV मध्ये २०१३ साली छापून आलेल्या वृत्तानुसार, कानपूरच्या ग्वालटोलीमध्ये राहणारे कमल प्रत्येक घरी जाऊन कचरा उचलतात आणि बाकी वेळेमध्ये पानटपरी चालवतात.

त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कितीतरी स्पर्धांमध्ये युपीसाठी पदक मिळवली आहेत. स्वतः बरोबर एवढा अन्याय होऊन देखील कमल हे मानतात की, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. कमलचे स्वप्न आहे की, त्यांच्या मुलांनी देशासाठी पदके जिंकावी.

राज्यासाठी पदक जिंकूनही सरकार त्यांचा योग्यप्रकारे सन्मान करू शकली नाही. त्यांना ना नोकरी मिळू शकली आणि कोणताही आर्थिक लाभही मिळू शकला नाही.

६. रश्मिता पात्र, फुटबॉलपटू

 

ओडीसाच्या या खेळाडूने कितीतरी आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गरिबीने त्यांना फुटबॉल सोडायला भाग पाडले. त्यानंतर आपल्या गावाला परत जाऊन त्यांनी लग्न केले आणि आज ती एक पानटपरी चालवते.

७. निशा राणी दत्त, निशाणेबाज

 

झारखंडची निशाणेबाज निशाला आपल्या कुटुंबियांची मदत करण्यासाठी २०११ मध्ये खेळ सोडवा लागला. निशाने एशियन ग्रँड पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कितीतरी पदक मिळवल्यानंतर देखील त्यांना आपल्या घराची डागडुजी करण्यासाठी आपली उपकरणे विकावी लागली. एवढे सर्व झाल्यानंतर सरकारने त्यांना मदत करण्यसाठी ५ लाख रुपये  देण्याचे घोषित केले. पण देशाने एक प्रतिभावान खेळाडू गमावला.

असे हे आणि यांच्यासारखे कितीतरी खेळाडू आज प्रतिभावान असूनही हलाखीचे जीवन जगत आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version