आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – डॉ प्राजक्ता जोशी
===
“मेथीलाडु” प्रमाणेच “अळीवलाडु” हे देखील हिवाळ्यात आठवतातच! घरातल्या थोरामोठ्यांकडून ते आग्रहाने तयार केले जातात.
“अळीवासारखा दुसरा गुणकारी पदार्थ नाही” हे शब्द तुम्ही तुमच्या घरातही ऐकले असतील. पण तुमच्यापैकी कितीजण मनापासून अळीवाचे पदार्थ खाण्यासाठी होकार देता?
अळीव म्हटलं की अनेकांच्या कपाळ्यावर आठ्या पडतात, तर काहीजइण नाक मुरडतात. बेचव, अतिउष्ण अशी अनेक दुषणं देत अळीवाला नाकारणा-यांची संख्या जास्त आहे, यात काही शंका नाही.
पण आजचा हा लेख वाचल्यानंतर अळीवाला नकार देण्याचा विचारही तुम्ही करणार नाही.
==
हे ही वाचा : कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा
==
“अळीव” ही वनस्पती पर्शियातून भारतातील आलेली आहे. भारतीय आहारात विशेषकरून त्याच्या बीजांचा समावेश आहे.
अळीवातील पोषणमुल्ये
अळीवमध्ये Vit- C भरपुर प्रमाणात असते. जे c-reactive protiens ची मात्रा प्रमाणात ठेवते. त्यामुळे हृदयविकाराची संभावना कमी होते.
यात Vit- A देखील भरपुर प्रमाणात असते. त्यामुळे food allergy पासुन दुर ठेवते.
दुग्धनिर्मितीमध्ये स्तनग्रंथींना प्रवृत्त करण्याचा विशेष गुणधर्म यात असतो. त्यामुळे प्रसुतिनंतरच्या काळात याचे सेवन ऊपयुक्त ठरते.
==
हे ही वाचा : प्रोटीनची कमतरता ठरू शकते फारच गंभीर… या गोष्टींकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका!
==
अळीवातील Magnese या घटकामुळे Bone density वाढते आणि त्यामुळे Arthritis ची शक्यता कमी होते.
अळीवातील Vit- B2(riboflevin) हे मज्जासंस्थेशी निगडीत व्याधी दुर करते.
Neural tube defect शी निगडीत birth defects ( जन्मजात व्यंग) हे Vit- B9 च्या कमतरेने होतात. अळीवात 10% Vit- B9 असते. त्यामुळे गर्भावस्थेतही अळीव खावे, अर्थात त्यापुर्वी डॉक्टरांची परवानगी गरजेची आहे.
यातील Vit- B6 हे hemoglobin च्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे ते Anemiaमध्ये ऊपयुक्त ठरते.
हा तर झाला अर्वाचिन दृष्टीकोन.
आता आयुर्वेदानुसार अळीवाचे ऊपयोग पाहुया :
आयुर्वेदात अळीवास “चंद्रशुर” नाव आहे.
अळीवाच्या बीया या स्निग्ध (oily) पिच्छील (बुळबुळीत) गुणात्मक असतात.
कफदोष व वात दोषाचे संतुलन अळीव करते.
अळीव शरीरात प्रतिकारक्षमता वाढवते. सध्याच्या कोरोनासारख्या महाभयंकर रोगांत प्रतिकारशक्तीची किती गरज आहे हे वारंवार दिसून येते.
कोरोनाच नव्हे तर इतर सगळ्या रोगांसाठीही अळीव खाल्ल्याने मिळणारी प्रतिकारशक्ती अत्यंत गरजेची आहे.
सध्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण औषध, गोळ्या घेतात, पण यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. अशा औषधा घेण्यापेक्षा घरच्या घरी अळीवाचे हे चविष्ठ लाडु हा अत्यंत सोपा पर्याय आहे ना!
==
हे ही वाचा : कोरोनाच्या नव्या रुपाला भिडताना भारताने अशी खबरदारी घ्यायलाच हवी!
==
औषधीय ऊपयोग
वारंवार उचकी लागत असेल, तर अळीव नक्कीच उपयोगी ठरते.
वातव्याधी (संधीवात, आमवात) मध्ये ऊपयुक्त ठरते.
कफज अतिसार (dysentry) मध्ये ऊपयुक्त सांगितले आहे.
वातरक्त (gout) मध्ये ऊपयुक्त सांगितले आहे.
औषधीकल्प :
चतुर्बीज चुर्ण—bloating
वातविध्वंस रस—osteoarthritis
धन्वंतरारीष्ट—post natal care
==
हे देखील वाचा : कडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15
==
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.