Site icon InMarathi

CA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का? जाणून घ्या

sisters featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्हाला शाहरुख खानचा ‘स्वदेस’ हा चित्रपट आठवतो का? ज्यात शाहरुख एक मोठा वैज्ञानिक असतो आपल्या गावातील समस्यांना सोडविण्यासाठी आपली नोकरी सोडून गावात राहतो.

अशीच एक कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पण ही कहाणी फिल्मी वाटत असील तरी ती कुठल्या चित्रपटाची कहाणी नसून खरी कहाणी आहे.

ही कहाणी आहे हरियाणाच्या बहादूरगढ येथील दोन मुलींची, यामिका बहती आणि शिवानी महेश्वरी.

यामिका हिने देशाची सर्वात कठीण अशी CA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तर शिवानी हिने MBA ची पदवी घेतली आहे.

या दोघींनाही कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली असती. पण त्यांनी शेतीला आपलं करिअर बनविण्याचा निश्चय केला. आता दोघी शेती करतात.

 

 

हे ही वाचा – ‘गृहिणी बनून संसार करेल’ असं हिणवलं गेलं, पण ती आज आहे १२०० कोटींची मालकीण!

पण आज जिथे सर्वांना मोठ्या शहरात राहायचं आहे, CA, MBA, Engineering करून मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत व्हायचं आहे, तिथे या दोघींकडे ती संधी असूनही त्यांनी शेतीचा मार्ग का अवलंबला असावा?

असे अनेक प्रश्न आता तुमच्या येत असतील. पण काळजी करू नका… हा लेख संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील.

 

 

यामिका आणि शिवानी यांनी शेती करण्यासाठी हरियाना येथील टांडा हेडी हे गाव निवडले. तिथे त्या ८ एकराच्या जागेत नेट लावून शेती करतात आणि दिवसातील ५-६ तास येथे घालवतात.

 

 

या दोघींनी त्यांच्या शेतीची सुरवात फुलांच्या शेतीपासून केली होती, ज्यातून त्यांनी पहिल्याच वर्षी लाखो रुपयांचा नफा कमावला. आता त्यांनी एक एकरात काकडी आणि टमाटरची लागवड केली.

 

 

त्या सांगतात की, त्यांच्या शेतात होणाऱ्या गुलदावरी, जरवेरा आणि ग्लॅड यांसारख्या फुलांची दिल्लीमध्ये खूप मागणी आहे. हे एक फुल बाजारात जवळजवळ ४०-५० रुपयांत विकले जाते. त्यांनी प्रती एकर २ लाखाच्या जवळपास फुलांच्या रोपांची लागवड केली आहे.

 

 

यामिका सांगते की, तिला शिकत असताना कळाले की “भारत हा एक कृषिप्रधान देश आहे”. पण असे असून देखील येथील शेतकऱ्यांना फायदा नाही तर नुकसानच सोसावं लागतं.

याचं कारण म्हणजे ते पारंपारिक पद्धतीनेच शेती करतात. तसेच औद्योगिकरणामुळे देखील शेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. ज्यामुळे तरुण वर्ग हा शेतीपासून दूर होत चालला आहे. म्हणून त्यांनी शेती करण्याचा निश्चय केला.

शेतीत यायच्या आधी त्यांनी नेट फार्मिंग आणि आधुनिक शेतीच्या पद्धती जाणून घेतल्या. ज्यामुळे त्या कमी जागेत देखील जास्त नफ्याची शेती करू शकत आहेत.

नेट फार्मिंग ही कमी पाण्याची शेती करण्याची पद्धती आहे. यामध्ये शेतात वाया जाणारे पाणी देखील वापरात आणले जाऊ शकते.

 

 

शिवानी यांना ही गोष्ट सिद्ध करायची होती की, शेतीमुळे नुकसान नाही तर फायदाच होतो, पण त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपारिक पद्धती विसरून आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करायला हवा.

शिवानी सांगते की,

“शेतीची कामे हे मुख्यकरून घरातील पुरुष वर्गच बघतात पण आम्हाला हे दाखवून द्यायचे होते की, मुली देखील शेती करू शकतात आणि त्यातून त्या कमवू शकतात.”

 

हे ही वाचा – महाराष्ट्राच्या सुपुत्राने लावलेला शोध आज ८ देशांमध्ये वापरला जातोय!

यामिका आणि शिवानी सांगतात की नेट फार्मिंग करिता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक शेतीला दिलेले प्रोत्साहन देखील एक प्रेरणास्त्रोत ठरले.

एवढंच नाही तर हरियाणा सरकार देखील आधुनिक शेतीचा अधिकाधिक प्रचार करू इच्छिते म्हणू ते पॉली हाउसवर ६५ टक्क्यांपर्यंत सब्सिडी देते.

अश्या या यामिनी आणि शिवानी ज्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की, आजच्या भारतातील मुली ह्या खरच कोणापेक्षा कमी नसून त्या देखील स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. त्यांची ही कामगिरी नक्कीच इतर मुलींकरिता आणि शेतकऱ्यांकरिता एक प्रेरणास्थान ठरेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version