यांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कुटुंबे पाहतो. काही कुटुंबे ही लहान तर काही कुटुंबे ही मोठी असतात. पण त्यांच्यामध्ये एखादी अशी गोष्ट नक्कीच असते, जी त्यांना एकमेकांशी जोडून ठेवते आणि इतरांपासून वेगळे बनवते.
सामान्य माणसाला दुखापत झाल्यावर खूप वेदना होतात, कधी – कधी तर या वेदना असह्य वाटणाऱ्या असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका कुटुंबाबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे हाड जरी तुटले तरीदेखील त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत, तर या कुटुंबातील लोक त्या परिस्थितीमध्ये देखील स्कीइंग करतात. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या कुटुंबाबद्दल..
इटलीमध्ये एक असे कुटुंब आहे, ज्यांना दुखापत झाली तरी त्यांना वेदनेची जाणीव होत नाही. याउलट या कुटुंबातील एक व्यक्ती अशी देखील आहे, जी पाय तुटल्यानंतर देखील स्कीइंगची मजा घेतो.
बातम्यांनुसार, या कुटुंबातील तीन पिढ्यांचे ६ सदस्य असे आहेत, ज्यांना कधीही वेदनेची जाणीव झालेली नाही. या कुटुंबामध्ये एक ७८ वर्षाची आजी, तिच्या दोन मुली ५० आणि ५२ वर्षाच्या आणि या मुलींचे तीन मुलं २४, २१ आणि १६ वर्षाची यामध्ये समाविष्ट आहेत.
शास्त्रज्ञांना त्यांच्या या अद्भुत क्षमतेमुळे आशा आहे, की, या कुटुंबाच्या मदतीने वेदनाशावक औषध बनवले जाऊ शकते.
या कुटुंबातील व्यक्तींना दुखापत झाल्यावर त्या वेदनेने कळवळण्याच्या ऐवजी वेदनानांच दुख होत असावे,कारण या कुटुंबातील सदस्यांना वेदनेची कोणतीच जाणीव होत नाही. या कुटुंबातील काही सदस्यांना तर गंभीर दुखापती देखील झालेल्या आहेत, हातपाय देखील तुटले आहेत, पण यांना काहीही जाणवत नाही.
एवढेच नाहीतर एकदा या कुटुंबातील एका मुलीच्या खांद्याचे हाड तुटले आणि तिला त्याबद्दल काहीही समजले नाही. ती स्की करतच राहिली आणि गाडी ड्राइव्ह करत घरी देखील पोहोचली. त्यानंतर दोन दिवसानंतर देखील तिला या दुखापतीची जाणीव झाली नाही.
जेनेटिक म्यूटेशन असू शकते कारण
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा रोग एक जेनेटिक म्यूटेशन म्हणजेच अनुवांशिक उत्परिवर्तनमुळे होत असेल. या विचित्र स्थितीला चिकित्सकांनी या कुटुंबाच्या आडनावाच्या आधारावर मर्सिली सिंड्रोम नाव दिले आहे.
डॉक्टर याला कॉनजेटिनल हायपोल्जीजा शी देखील जोडून पाहत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ते मर्सिली कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून त्या गोष्टीचा तपास करणार आहेत, ज्यामुळे त्यांना वेदनेची जाणीव होत नाही.
त्यांना आशा आहे की, या माहितीनंतर वेदनाशावक औषध बनवायला मदत मिळेल. तरी पण डॉक्टर्स हे देखील सांगत आहेत कीकि, मर्सिली कुटुंबातील काही लोकांनी ५० ते ६० सेकंदासाठी वेदनेची जाणीव झाल्याचे सांगितले आहे.
असे हे इटलीमधील कुटुंब कधीही कोणत्याही दुखापतीला घाबरत नाही, कारण त्यांना कधी वेदना होतच नाहीत. थोडे विचित्र वाटते ना हे, पण हे सत्य आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.