आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
समुद्र आपल्या पोटामध्ये कितीतरी गुपिते लपवून ठेवतो, ज्याचा आपण कधी विचार देखील केलेला नसतो आणि ही गुपिते जेव्हा उघड होतात, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. पण काही पाणबुडे या समुद्रातील गुपिते शोधून काढण्यासाठी खूप उत्साही असतात. आज आम्ही तुम्हाला समुद्रातून शोधून काढण्यात आलेल्या अशाच एका गुपिताबद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया, काय आहे हे गुपित त्याबद्दल..
इस्रायलमध्ये सीजरिया नावाचे एक शहर आहे. हे शहर जवळपास दोन हजार वर्षापासून येथे वसलेले आहे. हे शहर इस्रायलमध्ये भूमध्य सागराच्या किनारी आहे. सध्याच येथे जवळपास दीड हजार वर्षापूर्वीच्या जुन्या खजिन्याचे काही शिक्के मिळाले आहेत. इस्रायलच्या ज्वीका फेयरला समुद्रामधील नवनवीन गोष्टी पाहायला आवडते. त्यामुळे तो समुद्रात नेहमी जात असतो.
अलीकडे जेव्हा तो समुद्राच्या तळामध्ये उतरला, तेव्हा त्यांना समुद्राच्या तळामध्ये काहीतरी चमकताना दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, ते सोन्याचे शिक्के आहेत. तो त्या शिक्क्यांना घेऊन बाहेर आला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी परत फेयर आणि त्याचे साथीदार परत समुद्रात उतरले, तेव्हा त्यांना परत शिक्के मिळाले. कदाचित जुन्या काळातील खजिन्याचा तो एक हिस्सा असावा, जो एखाद्या जहाजामधून समुद्रात पडला असेल.
हे शिक्के मिळाल्याची बातमी लगचेच त्यांनी इस्रायलच्या अधिकाऱ्यांना दिली. पहिल्यांदा या अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. पण जेव्हा त्यांनी तिथे जाऊन पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या शिक्क्यांची तपासणी केल्यावर समजले की, हे शिक्के जवळपास दीड हजार वर्ष जुने आहेत. या शिक्क्यांमुळे सीजरियातील इतिहासाचा अलिप्त झालेला भाग जोडला गेला आहे.
या शहराच्या बंदराच्या समुद्र तटावरून युनान, सायप्रस आणि तुर्की पाहताना असे वाटते की, आपण दुसऱ्याच कोणत्यातरी काळामध्ये आलो आहोत. सीजरियाची इमारत युनानिंनी बनवली होती. हेरोडच्या राज्यामध्ये सीजरियाने खूप प्रगती केली. हेरोडनेच रोमन बादशाह सीजरच्या नावावरून या शहराचे नाव सीजरिया असे ठेवले. हेरोडने समुद्राच्या लाटांपासून वाचण्यासाठी या शहराच्या किनाऱ्यावर मोठी भिंत बांधली होती.
इ.स. ६६ ते ७० च्या दरम्यान यहुदींनी रोमन साम्राज्याच्या विरोधात बंड पुकारले आणि येरूशलमचा विध्वंस केला. यानंतर रोमन शासकांनी सीजरियालाच आपली राजधानी बनवली. इसवीसन ६४० मध्ये मुस्लिमांनी या शहरावर आक्रमण करून यावर सत्ता मिळवली. यानंतर १८०० पर्यंत सीजरियाबद्दलची कोणत्याच इतिहासाची माहिती उपलब्ध नाही.
पण आता या शिक्के मिळाल्यामुळे सीजरियाच्या इतिहासाचे एक खूप मोठे कोडे सुटले आहे. इस्रायलचे इतिहासकार जॅकब शर्विट म्हणतात की,
पहिले असे मानले जात होते की, मुस्लिम शासनकाळात सीजरियाची प्रतिष्ठा संपली होती. जॅकब शर्विट म्हणतात की, फेयर आणि त्यांच्या साथीदारांना समुद्राच्या तळामध्ये जे शिक्के मिळाले आहेत, ते हजार वर्षापेक्षा देखील जुने आहेत. या शिक्क्यांमध्ये ९५ टक्के शुद्ध सोने आहे. त्यांना त्या काळामध्ये दिनार म्हटले जात असे. हे शिक्के मुस्लिम खालीफांच्या काळातील आहेत.
या शिक्क्यांवरील तारखेनुसार, हे खलिफा अल हकीम आणि त्याचा मुलगा अल झहीरच्या काळातील आहेत. अल हकीमने सन ९९६ ते १०२१ पर्यंत शासन केले. तिथेच, अल झहीरने १०२१ ते १०३६ च्या दरम्यान शासन केले. शिक्क्यांवरील ठस्यांवरून हे समजते की, इजिप्तची राजधानी काहिरा आणि सिसिलीचे शहर पालेर्मामध्ये तयार करण्यात आले. या शिक्क्यांवर दातांचे निशाण देखील मिळाले आहेत. यावरून हे समजते कि, त्या काळामध्ये लोक दातांनी दाबून शिक्क्यांच्या शुद्धतेची ओळख करत असत.
शर्विट सांगतात की, या शिक्क्यांवरुन हे स्पष्ट आहे की, मुस्लिम काळात देखील सीजरिया एक श्रीमंत शहर होते. येथे सोन्याच्या शिक्क्यांच्या मदतीने कारभार चालत असे. पण शर्विट आणि दुसरे इतिहासकार हे समजू शकले नाही की, हे शिक्के समुद्रामध्ये कसे आले. कदाचित हे एखाद्या जहाजातून पडले असतील, जेव्हा त्याचा अपघात झाला.
हे शिक्के मिळाल्यामुळे फेयर आणि त्याच्या साथीदारांचा उत्साह अजून वाढला आहे आणि ते आता समुद्रामध्ये अजून काही खजिना मिळतो का, हे पाहत आहेत. पण या शिक्क्यांचे गुपित सध्यातरी उलगडले नाही आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.