आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला देश हा एक पुरुष प्रधान देश आहे जिथे मुलाला घरचा वारस तर मुलीला ओझं समजल्या जाते. भलेही आता काही लोकं त्याबाबत जागरूक असतील किंवा ते असे मानतही नसतील तरी आजही आपल्या देशात मुलांना जास्त प्राधान्य देण्यात येते या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून आपल्या देशात भृणहत्या वारंवार घडत असतात. आज जरी यासंबधी जागरूकता पसरविली जात असली तरी ते पूर्णपणे बदलले नाही. म्हणूनच आपल्या देशात मुलांची संख्या जास्त आणि मुलींची संख्या कमी आहे. हे तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे.
तुम्हाला माहित आहे की, जगात असा देखील एक देश आहे जिथे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, हो.. ‘Curacao’ या देशात प्रत्येक १०० पुरुषांमागे १२१ स्त्रिया आहेत.
पण आज आम्ही तुम्हाला काही अश्या देशांची ओळख करवून देणार आहोत, जिथे भारताप्रमाणेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या फार कमी आहे.
१. कतार :
या देशाची परिस्थिती या बाबतीत अतिशय दयनीय आहे. कतार या देशात १०० पुरुषांमागे केवळ ३० स्त्रिया आहेत.
२. संयुक्त राष्ट्र अरब :
या पश्चिम आशियायी देशात देखील अशीच स्थिती आहे, या देशात १०० पुरुषांच्या मागे केवळ ४३ स्त्रिया आहेत.
३. ओमान :
ओमान हा अरबच्या खाडीतील मुख्य देश आहे. या अरब देशात १०० पुरुषांच्या तुलनेत केवळ ५३ स्त्रियाच आहेत.
४. बहरीन :
बहरीन देखील याच यादीत येतो, येथे १०० पुरुषांमागे केवळ ६१ स्त्रिया आहेत.
५. कुवैत :
कुवैत, सौदी अरब आणि इराकच्या सीमेलगतचा देश आहे. कुवैत या देशातही पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी आहेत. येथे १०० पुरुषांमागे ६७ स्त्रिया आहेत.
६. सौदी अरब :
हा कुवैतचा शेजारी देश आहे, पण इथेही अशीच परिस्थिती आहे. येथे १०० पुरुषांमागे ७१ स्त्रिया आहेत.
७. भूतान :
भूतान, हा भारताचा शेजारी देश आहे. या देशात १०० पुरुषांमागे ८६ महिला आहेत.
८. वेस्टर्न सहारा :
वेस्टर्न सहारा हे एक विवादित क्षेत्र आहे, येथे १०० पुरुषांमागे ९० च्या जवळपास स्त्रिया आहेत.
९. चीन :
चीन देखील या यादीत येतो, पण या देशाची स्थिती इतर देशांपेक्षा बरी आहे, या देशात १०० पुरुषांमागे ९२ स्त्रिया आहेत. जे ठीक आहे.
१०. भारत :
आपला भारत देश या यास्डीत १० व्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात १०० पुरुषांमागे केवळ ९३ स्त्रिया आहेत.
११. पाकिस्तान :
या यादीन पाकिस्तान देखील आहे. पण पाकिस्तानची परिस्थिती जरा चांगली आहे या बाबतीत, कारण येथे १०० पुरुषांमागे ९४ स्त्रिया आहेत.
हे आहेत त्या देशांपैकी ११ असे देश जिथे पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा अधिक आहे…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.