आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी इत्यादींवर टीका करणाऱ्यांवर “पण तुम्ही त्यांना का बोलत नाही?” असा प्रश्न नेहेमीच विचारला जातो. उलट उत्तरं येताना, “आमच्या घराची आम्ही काळजी घेतो”, “बापाने आपल्या पोराच्या चुकीवर बोट ठेवल्यावर पोराने ‘पण बाजूच्या पोराला तुम्ही काहीच का बोलत नाही’ असं बोलायचं नसतं” असे प्रतिवाद येतात.
ह्या प्रक्रियेत एक महत्वाचा फॅक्टर लक्षात घ्यायला हवा, जो अनेकदा दुर्लक्षित असतो.
“प्रस्थापित विचारवंत विश्वाने इस्लाम चिकित्सा करायला हवी” असं म्हणणाऱ्यांमध्ये २ प्रकारचे लोक आहेत. पहिला आहे हिंदू धर्माची चिकित्सा नं आवडणारा. ज्याला मनातून आपले दोष माहिती आहेत, कदाचित मान्यही आहेत परंतु त्यांची उघड चिकित्सा नकोशी वाटते. त्याने त्याच्या अस्मिता दुखावतात. अश्या लोकांसाठी “आपल्या घराची काळजी आपण घ्यायची असते” हे उत्तर (अपुरं असलं तरी) योग्य आहे. पण – दुसऱ्या प्रकारचे लोक असे नसतात.
हे दुसऱ्या प्रकारचे लोक खुद्द हिंदूंमधील अनिष्ट गोष्टींबद्दल बोलतातच. परंतु ते इस्लाम चिकित्सा सुद्धा करतात आणि तीच अपेक्षा प्रस्थापित विचारवंतांकडून करतात. आता, इस्लाम हे “दुसऱ्याचं” घर आहे, त्यात आपण का पडायचं हा तर्क का लागू होत नाही? तर – इस्लाम चिकित्सा ही सुद्धा आपल्या घराची काळजी घेण्याचाच महत्वाचा भाग आहे.
भारतातील सर्वात मोठा अल्पसंख्य समुदाय जर मध्ययुगीन मानसिकतेत अडकलेला असेल, “आमचाच धर्म सच्चा आहे व इतरांना ह्या धर्मात साम-दाम-दंड-भेद वापरून आणणे हे माझं कर्तव्य आहे” अश्या तत्वांवर विश्वास बाळगणारा असेल तर तो माझ्या घरातलाच प्रश्न असतो. प्रस्थापित विचारवंत ह्या साध्या सत्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. हीच तक्रार आहे.
एका तरुणाने प्रेषितांचं साधं कार्टून काढलं म्हणून त्या पोराला जीवे मारण्यासाठी २०० जणांचा मॉब २ तासात तयार होतो. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला तर “त्याला आमच्या ताब्यात द्या” असं म्हणत हा जमाव पोलीस स्टेशनवर हल्ला करतो — हे मुंबईत घडतं — हा जर आमच्या घरातील प्रश्न नसेल तर “घर” ची व्याख्याच काहीतरी विचित्र समजावी लागेल.
प्रस्थापितांची “इस्लाम हा शांतीचा धर्म आहे” ही टेप पुरातन काळापासून तिथेच अडकली आहे. त्यांनी पुढे जाऊन – “पण ही शांती कुणाला? तर “श्रद्धावानाला” !” हे सांगायला हवंय.
श्रद्धावान कोण? जो एकमेव सर्वशक्तिमान अल्लाह, त्यांचे लाडके प्रेषित पैगंबर आणि पवित्र कुराण ह्यांना “मानतो” तो. इस्लामची शांती त्यांच्यासाठी. इतरांसाठी जिहाद.
जो पर्यंत सर्व काफिर असे श्रद्धावान बनत नाहीत तो पर्यंत येनकेनप्रकारेण त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्यात मिळून मिसळून रहाणे आणि योग्य वेळी, शक्ती-संख्या उपयुक्त असल्यावर जिहाद करणे – हे प्रत्येक श्रद्धावानाचं परम कर्तव्य आहे.
महत्वाची गोष्ट ही की वरील शांतीची, श्रद्धावान व त्याच्या कर्तव्याची व्याख्या केवळ कुराणमध्ये लिहिलेल्या काही ओळींमधील नाही. मुस्लिम मनावर ह्या तत्वांचं प्रचंड शक्तिशाली गारुड आहे – हीच समस्या आहे.
आपले हिंदू भगवद्गीतेतील “परधर्म भयावह” हे वचन म्हणतात, मानही डोलावतात. पण २ च मिनिटात मुस्लिम मित्र भेटला तर खुल्या मानाने “सलाम वालेकुम” म्हणून मोकळे होतात. मुस्लिमांचं तसं नाहीये. ते तसं होणं आवश्यक आहे. जो पर्यंत ते तसं होत नाही तो पर्यंत इस्लाम हा आमच्या घरातीलच प्रश्न असतो.
तथाकथित पुरोगामी वर्ग इतिहासात गाडल्या गेलेल्या मनुस्मृती आणि सती प्रथेवरुन आम्हाला झोडपत रहातो. पण इस्लामच्या बाबतीत आजच्या काळातील प्रश्नांवर त्यांची कॅसेट “शांतीचा धर्म” च्या पुढे जात नाही.
लक्षात घ्या – समस्या “मुस्लिम” नव्हेत. समस्या “इस्लामी मुलतत्व आणि मुस्लिमांच्या मनावर त्या मूलतत्वांचा पगडा” ही आहे. मुस्लिमांनी कट्टर इस्लाम पासून दूर जाणं भारतासाठी आणि खुद्द मुस्लिमांसाठी सुद्धा आवश्यक आहे. पण गो रक्षकांवर टीका करणारे आमचे प्रस्थापित ट्रॉमबे पोलीस स्टेशनवर चालून जाणाऱ्या जमावाबद्दल उफ्फ करत नाहीत. तो प्रश्न acknowledge च करत नाहीत.
आणि म्हणून “तुम्ही त्यांना का काही बोलत नाही” हे विचारावं लागतं.
गो रक्षक जितके आमच्या घरातील प्रॉब्लम्स आहेत, तितकेच – आझाद मैदान ते ट्रॉमबे पोलीस स्टेशन वर धिंगाणा घालणारे लोक हे ही आमच्याच घरातील प्रॉब्लम आहेत : हे जो पर्यंत प्रस्थापित पुरोगाम्यांकडून स्पष्टपणे आणि सतत व्यक्त होत रहाणार नाही तो पर्यंत हा प्रश्न विचारला जाईलच.
आम्ही गो रक्षकांवर ही बोलतो आणि मुस्लिम कट्टरपंथीयांवरही.
आमच्यासाठी हे इक्वेशन “फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा” असं नसून “हिंदू धर्म चिकित्सा आणि इस्लाम चिकित्सा आणि…इतर धर्म चिकित्सासुद्धा” असं आहे.
आमचं हे असं आहे.
तुम्हाला जमतंय का पहा.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.