' घाण्याचं तेल रिफाईंड पेक्षा अधिक चांगलं असतं का? नेमकं सत्य जाणून घ्या! – InMarathi

घाण्याचं तेल रिफाईंड पेक्षा अधिक चांगलं असतं का? नेमकं सत्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: डॉ विवेक कुलकर्णी

===

बऱ्याचदा आपल्या शारीरिक विकाराचे मूळ कारण आपल्या खाण्यामध्ये दडलेले असते. ज्या प्रकारचे अन्न असेल त्या प्रकारचे शरीर घडते आणि तशाच प्रकारची रोग प्रतिकारक , किंवा रोगकारक प्रवृत्ती शरीरामध्ये तयार होत असते.

आज काल शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक रोगांचे कारण म्हणजे आपण स्वयंपाक घरात वापरत असलेल्या तेलामध्ये दडलेले असते. अनेक लोकांना बाहेरचं खाण आवडत.

यात कधी कधी आवडीपेक्षा घराच्या बाहेर राहतोय, नोकरीच्या वेळा या वेळा नसून “अवलक्षणी अवेळा” असतात.

 

home made food inmarathu'

 

घरचं जेवण बेचव वाटत किंवा बाहेरच्या चटपटीत खाण्याची चटक लागलेली असते. या सर्व प्रकारात जे अन्न आपण खातो ते एकतर मैद्याचे असते किंवा प्राधान्याने त्यात मैदा वापरलेला असतो शिवाय जे तेल वापरलेले असते ते refined oil असते.

म्हणजेच अनेक वेळा फिल्टर करून त्यातला सर्व चिकटपणा सर्व प्रकारचं fat घालवलेलं असत.

या प्रक्रियेमध्ये मुळच्या तेलात असलेली सर्व पोषण मुल्ये देखील निघून गेलेली असतात.

अशा तेलाची (Glycemic index) GI value खूप जास्त असते. त्यामुळे अगदी थोड जरी खाल्ल तरी असे अन्न शरीरात मेद वाढवते आणि अनेक आजारांना आमंत्रण देखील देते.

 

fast food inmarathi

 

Cooking oil या संज्ञे मध्ये अनेक तेल बियांपासून आणि धान्यांपासून बनवलेल्या तेलांचा समावेश होतो. मग ते शेंगदाणा तेल असेल, करडई तेल असेल, नारळाचे तेल असेल किंवा सोयाबीन, rice bran पासून बनवलेले तेल असेल.

तस तर आपली संस्कृती खर तर लाकडी घाण्यावर बनलेले तेल खाण्याची. पण अस तेल आरोग्याला हानिकारक आहे असा पद्धतशीर अपप्रचार तेल बनवणाऱ्या कंपन्यांनी पहिल्या पासून राबवला.

 

TEL-GHANI-MACHINE-inmarathi

 

परिणामी गावा गावात पूर्वी चालणारे लाकडी घाणे बंद पडले. जे तेल पूर्वी डोळ्यासमोर तयार करून मिळायचं ते आता कुठेतरी दूरवरच्या कारखान्यात तयार होवून चकाचक, आकर्षक packing मध्ये येवू लागल.

त्या तेलाचा रंग, वास, चव सगळच हरपल. अगदी पाण्यासारख पातळ तेल बाटल्यातून घर घरात आलेलं आहे पण जर यातलं सगळ हानिकारक fat काढून टाकल असेल तरी खरच का हे तेल आरोग्याला चांगल आहे या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच द्याव लागत.

 

oil cans inmarathi

 

हे जे काही पिशवीतून किंवा कॅन मधून मिळणारे डबाबंद फिल्टर केलेले तेल आपल्या घरी येते त्याच्यावर उच्च प्रमाणात रासायनिक आणि यांत्रिक प्रक्रिया केलेली असते.

या प्रक्रीये मध्ये सगळ्या प्रकारची नैसर्गिक पोषणमुल्ये त्या तेल बियातून काढून घेतली जातात. जे खाली राहतो तो चव नसलेला साका आपल्याला तेल म्हणून विकला जातो.

अशा प्रकारच्या उच्च तापमानाला झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे अनेक रोगांना निमंत्रण देणारे विषद्रव्ये त्या तेलात तयार होतात. विकसित देशामध्ये याबाबत अनेक वार चाचण्या झालेल्या असून त्यातले निष्कर्ष धक्कादायक आहेत.

काही वेळा अशा refined oil बनवताना त्यात हायड्रोजन मिसळला जातो. ज्याच्या योगे नैसर्गिक fat काढून पूर्णपणे पाण्यासारखे पातळ बनलेले तेल परत घट्ट बनावे.

 

refined oil inmarathi 2

 

असे तेल मार्गारीन, डालडा च्या नावाखाली विकले जाते.

आरोग्याला सगळ्यात घातक असे हे तेल आपल्याकडे diet च्या नावाखाली खाल्ले जाते ज्याचा कुठल्याही प्रकारे आरोग्याला उपयोग होत नाही.

आपल्या देशात हृदय रोगाचे पेशंट वाढत चालले आहेत. आणि यातही विशेष गोष्ट म्हणजे पूर्वी ५० किंवा ६० वर्षे वय झाल्यानंतर होणारा हा हृदय रोग आज काल अगदी २७ -२८ वर्षाच्या तरुण माणसांना देखील होतो आहे.

 

heart patient inmarathi

 

अचानक काम करता करता तरुण मुले चक्कर येवून पडली , कोसळली त्यांना हृदय विकाराचा झटका आला अशा बातम्या आपण वाचतो.

आपण खात असलेल्या या refined oil चा आणि अशा तरुण वयातील हृदय रोगाचा निश्चितपणे एकमेकांबरोबर संबध आहे. असले उच्च तापमानाला उकळलेले तेल स्नायूंमध्ये inflammtion म्हणजेच जळजळ निर्माण करते.

triglyceride चे रक्तातील प्रमाण वाढवते. Triglyceride हा घटक शरीरात अतिरिक्त मेद निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. डायबेटीस, कॅन्सर, हृदयरोग यांच्या शक्यता अशा प्रकारचे तेल हजारो पटीने वाढवते.

आयुर्वेदा नुसार असले refined oil शरीरात वात दोषाचा प्रकोप करते. वात दोष वाढवते. हा वाढलेला वात लठ्ठपणा, गुडघ्याचे संध्याचे विकार, मणक्याचे विकार इ. मध्ये परावर्तीत होतो.

 

oil refinery inmarathi

 

आपल्या देशात फार पूर्वी पासून लाकडी घाण्यावर तेल काढल जायचं.

तेलबिया घाण्यात घालून त्याचं चर्वण करून कुठलीही प्रक्रिया न केलेले थंड आणि सर्व प्रकारचे नैसर्गिक गुणधर्म असलेल स्वच्छ अस तेल डोळ्या समोर काढून मिळायचं.

ह्या पद्धतीलाच cold pressing अस म्हणतात. तेल काढून राहिलेला पेंढा जनावरांना चारा म्हणून खाण्यास उपयोगी येत असे. या प्रकारच्या तेलामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया झालेली नसल्यामुळे हे तेल चवीसाठी आणि खाण्यासाठी सर्वोत्तम मानले जाई.

घाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपय न होता फायदाच मिळतो.

 

oil ghana inmarathi

 

असे तेल जरी त्याच्यात natural fat असेल तरी ते आरोग्यासाठी अपायकारक होवू शकत नाही तसेच त्याच्या सेवनाने मेद देखील वाढत नाही. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी असे तेल मदत करते.

अशा तेलाच्या सेवनाने कुठल्याही प्रकारे हृदयरोगाचा धोका उत्पन्न होत नाही. या तेलाने शरीरातील वात दोष देखील कमी होतो त्यामुळेच आयुर्वेदात शुद्ध तीळ तेलाचा अभ्यंग किंवा मसाज आवर्जून सांगितला जातो.

या सर्व गोष्टी मुळे स्वयंपाक घरात घाण्याचे शुद्ध तेल वापरणे हे आरोग्यासाठी आवश्यक ठरते. किंबहुना असे तेल वापरणे म्हणजेच आरोग्याची गुरुकिल्ली हस्तगत करणे असे म्हटले तर चूक ठरणार नाही.

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 

शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?