आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्यातील बहुतेकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळायला आवडत असतील. कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी तुम्हाला खूप घरांमध्ये पाहण्यास मिळतात.
हे घरातील पाळीव प्राणी घरातील इतर सदस्यांसारखे एक सदस्यच असतात. या प्राण्यांना पाळणारे लोक त्यांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे तितकेच लाडही करतात.
त्यांची प्रत्येक गरज हे लोक वेळोवेळी पूर्ण करत असतात, त्यामुळे हे पाळलेले प्राणी देखील आपल्या मालकाशी खूप ईमानदार असतात.
ते देखील आपल्या मालकाची साथ कधीही सोडत नाही. या प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या मालकांमध्ये मैत्रीचे एक प्रेमळ नाते निर्माण झालेले असते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
प्रत्येकजण आपापल्या पसंतीने प्राणी पाळत असतो. तसे तर प्राणी पाळण्याची प्रथा आताची नाही, तर पूर्वीपासूनची आहे. जुन्या काळामध्ये लोक हत्ती, घोडे, पोपट आणि इतर प्राणी – पक्षी इत्यादी पाळत असत.
सध्याच्या डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून वाघासारखे जंगली प्राणी सुद्धा काही लोकांनी पाळल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल!
जास्त लांब कशाला जायचं, थोर समाज सुधारक आणि आदिवासी जमातींसाठी काम कारणारे डॉ.प्रकाश बाबा आमटे यांनी सुद्धा त्यांच्या घरी वाघ पाळला होता, यावरून आपल्याला कळतं की जंगली प्राण्यांना सुद्धा प्रेमाची आपुलकीची भाषा समजते!
–
–
जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं, तर प्रत्येक योद्ध्याचा एक पाळलेला प्राणी होता, जो त्याला खूपच आवडत असे आणि तो त्याच्यावर खूप प्रेम करत असे; हे आपल्या लक्षात येतं.
तुम्ही महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचं नाव तर ऐकलं असेलच. चेतकला त्यावेळी सर्वात प्रतापी आणि तेजस्वी घोडा मानले जात असे.
सध्या अशीच एक घोडी चर्चेत आलेली आहे, जी चेतकची वंशज आहे. त्यामुळे तर लोक या घोडीला पाहण्यासाठी खूप दूरवरून येत आहेत. या घोडीची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याच्या सारंगखेडा येथे घोड्यांची जत्रा भरते. कितीतरी वर्षांपासून दरवर्षी भरणारी ही जत्रा खूप प्रसिद्ध आहे.
या जत्रेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे घोडे खरेदी – विक्रीसाठी येतात. दरवर्षी देशभरातून लोक वेगवेगळ्या जातीचे घोडे घेऊन येतात. पण मध्यंतरी सर्वात जास्त चर्चा पद्मा नावाच्या घोडीची होती.
पद्मा घोडीच्या बाबतीत सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या घोडीची किंमत इतर घोड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती.
राजनेत्यांपासून स्टार्सपर्यंत आणि घोडे पाळण्याचा छंद ठेवणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांनी या घोडीची २ कोटींपर्यंत बोली लावली.
जसे की आम्ही सांगितलं, लोकांनी या घोडीची किंमत कोटींमध्ये लावली. पण या घोडीचा मालक बडका चंदना या घोडीला विकायला तयार नव्हता. त्याचा दावा आहे की, ही घोडी चेतकची वंशज आहे.
तसं तर या जत्रेमध्ये सरासरी एकूण २००० घोडे येतात, पण या सर्वांमध्ये पद्मा घोडी ही सर्वात उंच आणि सुंदर लक्ष वेधून घेणारी ठरते. या घोडीला पाहण्यासाठी लोक खूप दूरवरून आले होते.
–
- नेपोलियन वर सश्यांनी हल्ला चढवला – आणि ससे जिंकले!
- दुसरं महायुद्ध आणि पॉपाय कार्टूनचं आहे एक वेगळंच कनेक्शन; वाचा काय ते!
–
पद्माचे मालक चंदना यांचं म्हणणं आहे की, पद्माला कानपूरच्या एका जत्रेमधून तेव्हा खरेदी करण्यात आले आहे, जेव्हा पद्मा ही फक्त ४ महिन्याची होती.
तेव्हापासून आतापर्यंत तिला फक्त दूध आणि काजू – बदाम इत्यादीच खाद्यपदार्थ देऊन वाढवण्यात आलं आहे.
पद्माच्या व्यतिरिक्त ऑस्कर, बादल, राजा आणि चेतक यांसारखे घोडे देखील या जत्रेचे खास आकर्षण असतात.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन या आकर्षक घोड्यांना पाहिले होते. पद्माचे मालक चंदनाने सांगितले की, पद्माची किंमत ऐकून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटलं होतं.
पद्माने या जत्रेमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये एक लाखाचं बक्षीस जिंकलं होतं. महाराष्ट्राव्यतिरिक्त पद्माने गुजरात, राजस्थान, पंजाब या जत्रेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे.
या जत्रेमध्ये घोड्यांच्या खरेदी – विक्री व्यतिरिक्त घोड्यांशी निगडीत असलेले कितीतरी प्रकारचे स्पोर्ट्स आणि हॉर्स रायडींग यांसारखे खेळ देखील होतात. जे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास उपयुक्त असतात.
अशी ही पद्मा खूपच आकर्षक आहे आणि त्याचबरोबर या जत्रेमध्ये आलेल्या घोड्यांमध्ये ती खूप उठून देखील दिसते, त्यामुळे कदाचित तिची एवढी थक्क करून टाकणारी किंमत लावण्यात आली आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.