Site icon InMarathi

एटीएमच्या शोधाने त्याने जग बदलून टाकलं – भारतात जन्म घेतलेला संशोधक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही काळापुर्वी खिशात पैसे असल्याशिवाय माणुस घराबाहेर पडत नव्हता.

खर्चाला, प्रवासाला, अडीअडचणीच्या काळात रोख रक्कम लागते हा संवाद आठवतोय का?

पण आता मात्र हा समज अत्यंत चुकीचा ठरत आहे. घराबाहेर निघताना पैसे न घेता निघालात तरी पुढील अनेक दिवस तुम्ही सहज खर्च करु शकता.

काय, चक्रावलात?

 

 

एवढा विचार करण्यापेक्षा, आपल्या आजुबाजुला बघा, एखादं एटिएम मशिन नजरेस पडलं की आपोआप या प्रश्नाच उत्तर मिळेल.

खिशात एटीएम कार्ड नाही, असा म्हणून हल्ली क्वचितच सापडतो, म्हणजे नोकरदारांव्यकिरिक्त गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांपासून ते अगदी कॉलेज मध्ये जाणा-या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाकडूनच एटीएमचा वापर केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अवघ्या काही वर्षांपुर्वीपर्यंत क्लिक केल्यावर क्षणात बाहेर येणाऱ्या  नोटा हे माणसाचं केवळ स्वप्न असताना, आज शहरांतच नव्हे तर खेडेगावांमध्येची एटीएम बाहेर रांगा लागलेल्या दिसतात.

पण आपली गरज बनलेल्या या एटीएम्सचा शोध कुणी लावला? एका क्लीकवर पैसेे मिळु शकतात ही भन्नाट कल्पना कुणाच्या डोक्यात आली ही माहिती गमतीशीर आणि रंजक आहे,

 

malwarebytes.com

 

जस-जश्या मानवाच्या गरजा वाढतात तस-तश्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांतून तो असे काही शोध लावतो ज्यामुळे मानवी जीवन अधिक सोयीस्कर आणि सुखद बनते. याच गरजेतून आज जगात एवढे जास्त शोध लावले गेले आहेत.

एक वेळ अशी होती जेव्हा लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रागेत उभे राहावे लागत होते, पण त्यानंतर आला एटीएम… या मशीनने माणसांना कधीही कुठेही पैसे काढण्याची  मुभा  दिली.

आजच्या या आधुनिक युगात जवळपास सर्वच कामे ही मशीनद्वारेच केली जातात. या मशीन आपले जीवन सोयीस्कर करण्यास मदत करत आहेत. त्यातच एटीएम मशीन तर मानवी इतिहासात सर्वात उपयोगी आणि सोयीस्कर मशीन ठरली.

आज आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पैश्याची गरज भासली तर आपण या मशीनचा वापर करतो. त्यासाठी आपल्याला आता बँकेत जायची गरज भासत नाही.

marketwatch.com

तर जगातील पहिल्यावहिल्या एटिएमच्या वापराचा मान पटकाविला आहे, तो लंडन शहराने…

 २७ जून १९६७ हाच तो दिवस, या दिवशी लंडनच्या बार्कलेज बँकेने पहिल्यांदा एटिएम मशिन वापरलं केला होता,

अर्थात या मशिनच्या शोधाचे जनक स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन हे आहेत.

 

gazabpost.com

पण यातील सर्वाधिक इंटरेस्टिंग गोष्ट ही की जॉन शेफर्ड हे मुळ भारतीय वंशाचे आहेत.

तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की, जॉन शेफर्ड यांचा जन्म भारतात झाला होता. २३ जून १९२५ साली मेघालय येथे त्यांचा जन्म झाला.

त्यांचे वडील स्कॉटीश होते, त्याचं नाव विलफ्रिड बॅरन होते. जॉन यांच्या जन्मावेळी ते चिटगाव पोर्ट कमिश्नरेटचे चीफ इंजिनीअर होते.

 

 

एटीएम मशीनची कल्पना जॉन शेफर्ड यांना कशी सुचली यामागे देखील एक रंजक कहाणी आहे.

एकदा जॉन पैसे काढण्यासाठी बँकेत गेले पण बँकेत पोहोचताच बँक बंद झाली, तेव्हा जॉन यांना वाटले की, की अशी एखादी मशीन असती ज्यातून आपण हवे तेव्हा पैसे काढू शकलो असतो.

 

 

लहानपणापासूनच विज्ञानाशी त्यांची मैत्री होती, त्याचप्रमाणे वैज्ञानिक शोध हा त्यांचा आवडीचा विषय होता, त्यामुळे मनात आलेला विचार पुसून टाकण्यापेक्षा त्यांनी थेट प्रयोगाला सुरुवात केली.

जशी ही कल्पना सुचली त्यांनी या मशीनला बनविण्याचे काम सुरु केले. अर्थात यापुर्वी असे एकही मशिन उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या.

त्याचा आकार कसा असावा, त्यामध्ये पैसे कसे भरता येतील, समोरील व्यक्ती ते पैसे काढून कसे घेईल असे अनेक अडथळे येत होते.

मात्र आपल्या निर्धाराच्या बळावर त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यशस्वीरित्या मिळवली.

त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीने अखेर त्यांच्या या कल्पनेने मूर्त रूप घेतले आणि जगात पहिल्यावहिल्या एटीएम मशीनचा जन्म झाला.

 

marketwatch.com

 

सुरुवातीला अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, क्लिक केल्यावर पैसे हजर ही बाब सामान्यांना तर अनाकलनीय वाटली, बॅंकांसाठीही हा चमत्कारचं ठरला.

ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या एका शाखेत, २७ जुन १९६७ ला लावण्यात आली.

 

 

भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावण्यात आले.

मुंबईच्या  हाँगकाँग अॅण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने पहिले एटीएम बसविले.

काळानुसार एटीएमच्या मशिनच्या आकारात बदल झाले, नवी प्रणाली आली.

एटीएममधील चकाचक वातावरण, अद्यावत यंत्रणा इतकेच नव्हे तर प्रशस्त स्क्रीन हे बदल झाले.

सध्या गल्लोगल्लींमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने मोठीच क्रांती झाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

hindustantimes.com

readers digest

या एटिएमच्या जोरावर खिशात रोख रक्कम नसतानाही माणुस प्रवास करु शकतो, हवी ती खरेदी करु शकतो.

डेबिट कार्ड्स ही केवळ एटिएम सेंटरपुरती मर्यादित न राहता आता भाजीपाल्याच्या स्टॉलपासून थेट फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडे त्याचा वापर केला जात असल्याने रोखीच्या व्यवहारात असलेली भिती, पैशांचे गणित चुकण्याचं टेन्शन न बाळगता आपण व्यवहार करु लागलो आहोत.

या एटीएम मशीनचा शोध लावून जॉन शेफर्ड यांनी सर्व मानवजातीचे कल्याण केलं आहे, प्रत्येक माणसाचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं.  पण आज जॉन शेफर्ड आपल्यात नाही. एटीएम मशीनच्या या शोधकर्त्याचा १५ मे २०१० साली मृत्यू झाला…

 

Daily Express

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version