Site icon InMarathi

दारू पिऊन गाडी चालवत असताना अपघातात जीवितहानी झाल्यास, भोगावा लागणार ७ वर्षांचा कारावास

Drink and drive.Inmarathi00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतामध्ये हिट अँड रन केस आपल्याला खूप पाहायला मिळतात. आपण बातम्यांमध्ये अशा प्रकारची प्रकरणे घडलेली खूपवेळा बघितली आहेत. कधी-कधी तर आपल्या डोळ्यादेखत असे काहीतरी घडते. आपल्या भारतात रस्ता अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. या रस्ता अपघातामधील जास्त अपघात हे दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात. रात्रीच्या वेळी काही लोक मद्यपान करून दारू पिऊन गाडी चालवतात, अशावेळी त्यांचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि अपघात होतो. या अपघातात कधी – कधी कोणत्यातरी निरपराध माणसाचा नाहक बळी जातो.

 

erewise.com

पण आता अशा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर सरकार कडक कारवाई करणार आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या लोकांसाठी खासकरून ही बातमी आहे. खरेतर, ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अपघातामध्ये होणाऱ्या मृत्युंमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना आता खूप कडक शिक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल, कारण सरकार आता याविषयी काही कडक पाऊले उचलणार आहे.

आतापासून जर कोणी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असेल आणि त्याच्याकडून एखादा अपघात झाल्यास व त्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या माणसाला सात वर्षासाठी तुरुंगात जावे लागू शकते. आतापर्यंत अशा कोणत्याही प्रकरणामध्ये कलम ३०४ A च्या आधारे शिक्षा म्हणून दोन वर्षाची कोठडी, फाईन किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जात असत.

 

indianexpress.com

पण आता सरकार या शिक्षेचा काळ वाढवून सात वर्ष करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या लोकांवर चांगलाच प्रतिबंध बसणार आहे. आकड्यांनुसार,

भारतामध्ये रस्तावर होणाऱ्या अपघातामध्ये दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो.

 

cloudfront.net

सरकारने हा निर्णय वाढणारे रस्ता अपघात लक्षात घेऊन घेतला आहे. याचबरोबर मोटर वाहन कायद्यामध्ये संशोधनचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. संसदेच्या एका स्थायी समितीने गेल्या शुक्रवारी या कायद्याच्या दुरुस्तीविषयीच्या बिलाचे रिपोर्ट जमा केले आहे. यामध्ये रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीने १५ मुद्द्यांना घेऊन कलमाच्या संशोधनाचा प्रस्ताव दिला होता.

याव्यतिरिक्त सर्व वाहनांसाठी जीवनभरासाठी विमा काढणे देखील अनिवार्य असेल. काही आकड्यांनुसार हे समजते की, यावेळी देशातील जवळपास अर्ध्या वाहनांचा विमा नाही आहे. अशा प्रकरणांमध्ये अपघात झालेल्या पिडीताला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. याचबरोबर अपघातामध्ये जखमी करणाऱ्या चालकाला जखमी झालेल्या माणसाबरोबर रुग्णालयात वेळ घालवण्याचा प्रस्ताव देखील आहे, ज्यामुळे तो त्याचे दु:ख तो समजू शकेल.

 

morrow.or.us

समितीने असेही सांगितले आहे की, वाहनांची गती, विशेषतः रेसिंग करणारे आणि रस्त्यांवर स्टंटबाजी दाखवणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी योग्य नियम तयार केले जातील. शिवाय, ५०० किमीपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या जड वाहनांमध्ये दोन चालकांची सुविधा करण्यासाठीचा नियम बनवण्यात येणार आहे. त्यामुळे चालकाला आराम करण्यासाठी योग्य तो वेळ मिळेल.

अशा या नियमांच्या सक्तीमुळे रस्त्यावरील गाड्यांचे अपघात आटोक्यात येण्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version