Site icon InMarathi

दिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो! भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…!

financialexpress.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मुंबईची लाइफलाईन म्हणून आपल्या लोकल ट्रेनची ख्याती आहे. पण आता मुंबईकारांना दिलासा देण्याचे काम मुंबईच्या मेट्रोने केली आहे. मुंबईच्या या मेट्रोला मुंबईची राणी म्हटले तर काही त्यात चुकीचे ठरणार नाही.

या मेट्रोमुळे लोकांना सहन करावा लागणारा ट्रॉफिकचा नाहक त्रास कमी झाला आणि कमी वेळामध्ये आपल्या इच्छुक स्थळी लोक पोहोचू लागले. तसेच, या मेट्रोमुळे अंधेरी भागामध्ये कामाला येणारे लोक आपल्या वेळेमध्ये कामावर पोहोचू लागले.

त्यामुळे ही मेट्रो तिचे भाडे सोडले तर, सर्व बाजूनेच लोकांच्या उपयोगी पडली.

 

intoday.in

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मुंबईच्या आधीच ही मेट्रो सेवा सुरु झाली आहे. लवकरच दिल्लीच्या मेट्रोची मजेंटा लाईन सुरु होणार आहे. या लाईनवर मेट्रो बोटोनिकल गार्डनपासून दक्षिण दिल्लीच्या कालकाजीपर्यंत चालेल.

या मेट्रोच्या लाईनमुळे दक्षिण दिल्लीच्या नोएडा येथे जाण्याचा वेळ फारच कमी होईल आणि प्रवाशांना राजीव चौक किंवा मंडी हाऊसकरून येथे जावे लागणार नाही.

पण मजेंटा लाईन यासाठी देखील एवढी महत्त्वाची आहे, कारण या मेट्रोला ड्रायव्हरलेस म्हणजेच विना चालक मेट्रो चालवण्याची योजना आखण्यात आली आहे.

असे भारतामध्ये पहिल्यांदाच होणार आहे कि, जेव्हा एखादी मेट्रो विना चालक चालवली जाणार आहे.

मेट्रोच्या तिसऱ्या फेजमध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान येईल, पण जगभरामध्ये कितीतरी देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हरलेस मेट्रो पहिल्यापासून चालवण्यात येत आहे.

 

financialexpress.com

दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन यशस्वीपणे चालवण्यात येत आहे. ही मेट्रो जमिनीच्या खालून चालवण्यात येते आणि यामध्ये ड्रायव्हरचे केबिन देखील नसते. युरोपमध्ये डेन्मार्क, स्पेन, इटली, स्वित्झर्लंड आणि ब्रिटेनमध्ये ड्रायव्हरलेस मेट्रो चालवली जाते.

याव्यतिरिक्त अमेरिका आणि कॅनडामध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन चालवली जाते. तिथेच, ब्राझील, पेरू आणि चाइलमध्ये देखील याप्रकारची मेट्रो खूप पूर्वीपासून चालवण्यात येत आहे.

भारताच्या शेजारील देश असलेल्या चीनमध्ये देखील ड्रायव्हरलेस मेट्रो चालते. जर तुम्ही सौदी अरब, कतार आणि सिंगापूर जाल तर तिथे देखील तुम्हाला ड्रायव्हरलेस मेट्रो पाहण्यास मिळेल.

काय खास आहे या मेट्रोमध्ये ?

ड्रायव्हरलेस मेट्रो या नावावरूनच समजते कि, ह्या मेट्रोला चालवण्यासाठी चालकाची गरज भासणार नाही. तसेच, ही मेट्रो कोणत्याही व्यत्ययाला ओळखणे आणि आपतकालीन परिस्थितीमध्ये स्वयंचलित पद्धतीने काम करते.

यामध्ये भलेही ड्रायव्हर नाही आहे. पण या मेट्रोच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येते. कोणती ट्रेन कुठे आहे, कोणत्या वेगाने चालत आहे आणि कोणत्या ट्रेनला कुठे थांबायचे आहे हे सर्व स्वयंचलित असते.

 

themetrorailguy.com

भारताच्या या ड्रायव्हरलेस मेट्रोविषयी असे म्हटले जात आहे कि, या मेट्रोमध्ये जास्त प्रवासी प्रवास करू शकतील आणि यामध्ये ऊर्जेचा उपयोग देखील कमी होईल. ज्या स्थानकांवरून ही मेट्रो जाईल, त्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर स्क्रीन डोर लावण्यात आलेले असतील.

हे स्क्रीन दोन सुरक्षेसाठी लावण्यात आलेले असतील, कारण यामुळे प्लॅटफॉर्म असलेले प्रवासी ट्रॅकवर जाऊ शकणार नाहीत.

हे दरवाजे तेव्हाच खुलतील, जेव्हा मेट्रो प्लॅटफॉर्मवर येऊन थांबेल. तसेच, यावेळी मेट्रोच्या सीट्सचा रंग बदलून लाल आणि नारंगी करण्यात आलेला आहे. सध्याच कालिंदी कुंज डेपोमध्ये एका ड्रायव्हरलेस मेट्रोचा अपघात देखील झाला होता. ही मेट्रो यार्डची भिंत तोडून बाहेर निघाली होती.

 

BBC.com

पहिल्यांदा या अपघाताला चाचणी दरम्यान झालेला अपघात सांगितले गेले होते, पण दिल्ली मेट्रोने याला मेंटेनेसच्या नंतरचा अपघात सांगितले होते. यामध्ये माणसांची चूक असल्याची शंका वर्तवली गेली होती. पण या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

अशी ही ड्रायव्हरलेस मेट्रो दिल्लीतील लोकांच्या भेटीला लवकरच येणार आहे आणि ही मेट्रो भारताला विकासाचा अजून एक महत्त्वाचा टप्पा मिळवून देणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version