' मुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का? उत्तर वाचा… – InMarathi

मुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का? उत्तर वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला देश हा भलेही हिंदू धर्म मानणारा देश असला तरी आपल्या देशात सर्वच धर्मांना आदर दिला जातो, आपला देश प्रत्येक सण हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यातीलच एक म्हणजे क्रिसमस…

आज ख्रिसमस भेलेही आपण मोठमोठ्या हॉटेल्समध्ये साजरा करत असू, पण काय तुम्हाला माहित आहे की, मुघल शासक देखील हा सण साजरा करायचे?

 

Christmas_InMarathi

 

औरंगजेब आणि इतर काही राजांना सोडलं, तर अकबर ते शह आलम पर्यंत सर्वच मुघल शासकांनी ख्रिसमस साजरा केला आहे. मुघल काळात आग्रा हे सर्वात अलिशान शहर होते.

दिवंगत लेखक थॉमस स्मिथ यांनी सांगितले होते की, जो कोणी युरोप वासी येथे यायचा तो येथील समृद्धी आणि सुंदरता बघून प्रभावित व्हायचा.

 

agra-fort_chrismas InMarathi

 

त्यांनी सांगितले की, ‘आग्रा हे एक महानगर होते जिथे इटलीचे सोनार पोर्तुगाल आणि डच जहाजांचे मालिक होते.

फ्रान्सचे पर्यटक, व्यापारी आणि मध्य आशिया तसेच इराण येथील कारागीर आणि मध्य-पूर्व विद्वान आग्र्याला भेट देत राहायचे.’ एवढे विदेशी येथे येत-जात राहायचे, त्यामुळे ख्रिसमसच्या दिवसांत येथे खूप उत्साहाचे वातावरण राहायचे. त्यावेळी बाजारांत देखील खूप झगमगाट राहायचा.

 

Christmas_1 InMarathi

मध्ययुगीन युरोपात या ख्रिसमसचा जन्म झाला असला तरी उत्तर भारतात या सणाची सुरवात अकबराच्या शासन काळात तेव्हा झाली, जेव्हा अकबराने आपल्या राजदरबारात एका पादरीला आमंत्रित केले.

अकबराने या पादरीला शहरात एक भव्य चर्च बनविण्याची परवानगी दिली. या चर्चमध्ये अनेक मोठ-मोठ्या घंटा बसविण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक अकबराचा मुलगा जहांगीरच्या शासन काळात पडली.

 

akbar 2 Inmarathi

 

अकबर आणि जहांगीर या सणाला साजरा करायचे आणि यावेळी आग्र्याच्या किल्ल्यात पारंपारिक मेजवानी देखील राहायची. ख्रिसमसच्या सकाळी अकबर चर्चमध्ये यायचे आणि प्रतिकात्मकरीत्या येशू ख्रिस्त यांचा जन्म दाखविण्यासाठी बनविलेली गुहा बघायचे.

जेव्हा अकबर चर्चमध्ये यायचे तेव्हा त्यांचे स्वागत बिशप सारखे व्हायचे.

त्यांचे आगमनावर घंटानाद व्हायचा आणि भजन गायल्या जायचे. सायंकाळी हरमच्या सर्व स्त्रिया आणि राजकुमारिका लाहौर चर्च येथे जायच्या आणि मेणबत्ती द्यायच्या.

 

christmas-mughal-inmarathi04

 

युरोपवासी ख्रिसमसच्या रात्री लहान मुलांना आणि मुलींना परिंच्या वेशभूषेत तयार करून येशू ख्रिस्त यांच्या जन्माची नाटिका करायचे.
अकबर आणि जहांगीरच्या शासन काळात हे नाटक आयोजित केल्या जायचे.

या दरम्यान शांतता राखण्यासाठी शाही फौजफाटा देखील तैनात करण्यात यायचा.

 

christmas-mughal-inmarathi03

 

१६३२ सालानंतर या नाटकांवर बंदी आणण्यात आली, कारण शहाजहान आणि पोर्तुगीज यांच्यात काही मतभेद झाले होते. ज्यानंतर आग्रा येथील चर्च देखील तोडण्यात आले आणि ख्रिश्चन लोकांना सार्वजनिकरित्या प्रार्थना करण्यावर देखील बंदी आणण्यात आली.

पण १६४० साली जेव्हा मुगल आणि पोर्तुगीज यांच्यातील संबंध ठीक झाले तेव्हा पुन्हा चर्च बनविण्याची परवानगी देण्यात आली.

अश्याप्रकारे मुघल काळात नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण साजरा केला जायचा…

स्त्रोत : बीबीसी हिंदी 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?