सर्वात श्रीमंत कोण? क्रिकेटर्स की बॉलिवूड स्टार्स? वाचा!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
प्रसिद्ध मॅगजीन ‘फोर्ब्स’ दरवर्षी भारतातील टॉप 100 लोकांची यादी जाहीर करते. हे ते लोकं असतात ज्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात सर्वात जास्त गाजले, ज्यांनी सर्वात जास्त पैसा कमावला. अशा अनेक श्रेणीत या सेलेब्रिटींचे मूल्यांकन केले जाते. नेहेमीप्रमाणे यावेळी देखील फोर्ब्सने २०१७ चे टॉप मोस्ट 100 इंडियन सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली आहे. यात विशेष म्हणजे केवळ बॉलीवूड जगतातीलच नाही, तर क्रीडा क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींची नावे देखील समाविष्ट आहेत. त्यापैकी आज आपण टॉप 10 सर्वात श्रीमंत सेलेब्रिटीजची नावे जाणून घेऊ…
10. रणवीर सिंह
बॉलीवूडचे बाजीराव रणवीर सिंह हे देखील या यादीत समाविष्ट आहेत. त्यांनी यावर्षी ६२.६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे फोर्ब्सने त्यांना या यादीत दहाव्या स्थानावर ठेवले आहे.
9. ऋतिक रोशन
ऋतिक रोशन यांनी भलेही यावर्षी कुठली हिट पिक्चर नसेल दिली तरी त्यांनी यावर्षी एकूण ६३.१२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांना या यादीत नववे स्थान मिळाले आहे.
8. महेंद्र सिंह धोनी
महेंद्रसिंग धोनी यांना देखील या यादीत स्थान मिळाले आहे. त्यांनी यावर्षी एकूण ६३.७७ कोटी रुपयांची कमाई करत फोर्ब्सच्या या यादीत आठवे स्थान मिळवले आहे.
7. प्रियंका चोप्रा
देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला या यादीत सातवे स्थान मिळाले आहे, तिने यावर्षी एकूण ६८ कोटी रुपयांची कमाई केली.
6. आमिर खान
बॉलीवुड चे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी यावर्षी ६८.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यांना या यादीत सहावे स्थान देण्यात आले आहे.
5. सचिन तेंडूलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांना देखील फोर्ब्सने या यादीत स्थान दिले आहे. यावर्षी ८२.५ कोटी रुपयांची कमाई करत त्यांनी या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.
4. अक्षय कुमार
फोर्ब्सच्या या यादीत चवथ्या स्थानावर खिलाडी अक्षय कुमार आहे. अक्षयने यावर्षी एकूण ९८.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
3. विराट कोहली
मोठमोठ्या बॉलीवूड कलाकारांना मागे टाकत या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे आपल्या कॅप्टन कोहलीने. विराट कोहलीने यावर्षी एकूण १००.७२ कोटी रुपयांची कमाई केली आणि म्हणून फोर्ब्सने त्याला या यादीत तिसरे स्थान दिले.
2. शाहरुख खान
बॉलीवूडचे बादशाह शाहरुख खान यांना या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. किंग खानने यावर्षी एकूण १७०.५ कोटी रुपयांची कमाई केली.
1. सलमान खान
यावर्षी सर्वात जास्त कमाई करणारे स्टार ठरले आपले दबंग भाईजान.. म्हणजेच सलमान खान. सलमानने यावर्षी एकूण २३२.८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे.
स्त्रोत : ForbesIndia
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.