Site icon InMarathi

ही ७ उदाहरणं दाखवून देतात की “चुकणे” हा देखील कित्येकदा यशासाठी महत्वाचा भाग असतो…

invention-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

कित्येकदा असे होते की, आपण करायला एक जातो आणि घडते भलतेच. ज्याला आपण चूक म्हणतो, पण अनेकदा असे देखील होते की चुकीने घडलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो.

या चुकांचे काही असे परिणाम आपल्याला बघायला मिळतात ज्याचा आपण कधी विचार देखील केलेला नसतो. यालाच आपण कोइंसीडंन्स म्हणजेच “योगायोग” म्हणतो.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा शोध चुकीने लागला होता. आणि बरं का ह्या सर्व गोष्टी तुमच्या नेहमीच्या वापरातील/ऐकण्यातील आहेत.

आज ह्या गोष्टींनी आपल्या जीवनात एक महत्वाचे स्थान घेतले असले तरी यांचा शोध मात्र चुकीने किंवा नकळत लागला आहे…

१) एक्स-रे :

 

shutterstock.com

एक्स-रे हा मेडिकल जगतातील एक महत्वाचा शोध आहे. याच्या मदतीने शरीराच्या आतील कमतरता बघितल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, या एक्स-रे चा शोध चुकीने लागला होता…!

एक प्रसिद्ध वैज्ञानिक ‘विलहम रोएंटगन’ हे कॅथॉडीक रेज ट्यूब बनविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या या शोधादरम्यान अचानक एक लाईट चमकायला लागली.

तेव्हा त्यांनी बघितले की, अपारदर्शी कवरशिवाय खालील पेपर दिसतो आहे. याला बघून ते आश्चर्यचकीत झाले आणि अश्या प्रकारे एक्स-रेचा शोध लागला.

२) प्रिंटर :

 

प्रिंटर ही देखील एक आवश्यक मशीन आहे. पण याचा शोध देखील चुकीने लागला होता. एक इंजिनीअरने चुकीने आपल्या पेनवर गरम आयरन ठेवले. काही वेळाने त्या पेन मधून शाई निघू लागली. ज्यानंतर त्याने इंक जेट प्रिंटर्स चा शोध लावला.

३) मायक्रोवेव :

 

 

जेवण गरम करायचं असेल किंवा हलकं-फुलकं काही बनवायचं असेलं, तर सर्वात आधी आपल्याला मायक्रोवेव आठवतो. या मायक्रोवेवचा शोध देखील एक संयोगच होता.

याचा शोध पर्सी स्पेंसर यांनी चुकीने लावला होता. ते नवीन व्यॅक्युम ट्यूब च्या मदतीने रडार संबंधी रिसर्च करत होते. या दरम्यान मायक्रोवेवचा शोध लागला.

४) चिप्स :

 

aspenspecialtyfoods.com

बटाट्याचे चिप्स हे आजचे सर्वात फेमस स्नॅक्स आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे बटाट्याचे चिप्स खूप आवडतात. पण या चीप्सचा जन्म देखील चुकीने झाला होता.

जॉर्ज क्रम नावाच्या एका शेफने आपल्या एका खोडकर ग्राहका करिता फ्रेंच फ्राईज बनवत होते. पण तो ग्राहक त्यांच्या फेमस फ्रेंच फ्राईज ला चक्क नाकारत होता. त्याला ती फ्रेंच फ्राईज खूप “जाड” वाटत होती.

म्हणून त्या ग्राहकाला धडा शिकवण्याकरिता जॉर्ज यांनी बटाट्याचे अगदी पातळ काप करून ते तळले आणि त्यावर प्रमाणापेक्षा अधिक मीठ घातले. आश्चर्यम्हणजे – हे जे काही तयार झालं होतं ते त्या ग्राहकाला खूप आवडलं…!

अश्या प्रकारे या बटाट्याचे चिप्सचा अविष्कार झाला.

५) पेसमेकर :

 

 

पेसमेकर याच्याचमुळे अनेकांना त्यांचे जीवन परत मिळाले आहे. याचा शोध देखील चुकीने लागला होता.

इलेक्ट्रिक इंजिनीअर ‘जॉन होप्स’ एका प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांना कळले की, जर थंडीमुळे हृदयाचे ठोके बंद झाले तर हृदयाला कृत्रिम उत्तेजना देऊन त्याला परत कार्य करण्यास लावता येते. अश्या प्रकारे या पेसमेकरचा अविष्कार झाला.

६) पेनिसिलीन :

 

 

वैज्ञानिक ‘अलेक्जेंडर फ्लेमिंग’ हे घाव भरणारी चमत्कारिक औषधी बनविण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यात यश मिळाले नाही, म्हणून त्यांनी निराश होऊन या प्रगोग करण्यात आलेल्या अनेक वस्तू बाहेर फेकून दिल्या.

काही दिवसानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांनी जिथे त्या वस्तू फेकल्या होत्या तेथील बॅक्टेरिया पूर्णपणे नाहीशे झाले होते. अशाप्रकारे पेनिसिलीनचा शोध लागला.

७) कोकाकोला :

 

 

कोकाकोला हे अनेकांचे आवडते पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तर थंड कोकाकोला हा अनेकांना आवडतो. पण या कोकाकोलाचा शोध देखील चुकीने लागला होता.

डोके दुखीवर उपाय म्हणून औषध बनविण्याकरिता एका फार्मासिस्टने कोला नट आणि कोलाच्या पानांचा वापर केला, त्यानंतर त्याने या दोघांना कार्बोनेटेड वॉटर म्हणजेच सोडा वॉटरमध्ये मिसळले. या प्रकारे बनला आपला आवडता कोकाकोला.

अशी आणि यांसारख्या अनेक अश्या वस्तू आहेत ज्यांचा शोध हा निव्वळ एक संयोग होता. ज्याला बनविण्याचा कोणीही विचार केला नव्हता. पण जर हे योगायोग जुळून आले नसते तर आपले जीवन कदाचित एवढे सोयीस्कर नसते.

थोडक्यात – ही ७ उदाहरणं तुमच्या आमच्या जीवनातील “चुका” किती महत्वाच्या ( 😉 ) असतात हे शिकवून जातात! 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version