' नवाझुद्दीनच्या बाळासाहेबांवरील चित्रपटाबद्दल महत्वपूर्ण माहिती – InMarathi

नवाझुद्दीनच्या बाळासाहेबांवरील चित्रपटाबद्दल महत्वपूर्ण माहिती

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, एक असे व्यक्तिमत्व जे आज महाराष्ट्रातील अनेकांसाही प्रेरणास्थान आहे. त्यांचा जीवनप्रवास खूप रोचक होता. महाराष्ट्राच्या राजकारणाला बाळासाहेबांमुळे एक नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्यावर देखील एक बयोपिक नक्की बनायला हवी अशी अनेकांची इच्छा होती आणि अखेर ती इच्छा पूर्ण होणार आहे.

आता बाळासाहेबांच्या जीवनावर अधिरीत एक चित्रपट येणार आहे, ज्याचं टीझर नुकतच लॉन्च करण्यात आलं आहे.

 

 

या बायोपिकम्ध्ये बाळासाहेबांच्या भूमिकेत नावाझुद्दीन सिद्दिकी दिसणार आहेत.

 

 

nawaz-thackray-inmarathi03
asianage.com

आणि त्यांचा हा नवा लुक खरचं आपल्याला बाळासाहेबांची आठवण करून देतो.

 

nawaz-thackray-inmarathi02
financialexpress.com

नवाझुद्दीनच्या आधी या व्यक्तीरेखेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खानच्या नावावर विचार करण्यात आला होता.

‘ठाकरे’ असं या बायोपिकचं नाव आहे.

महान लेखक मंटो यांच्या बयोपिक नंतर नवाझ आता बाळासाहेबांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. त्यांना बघून असेच वाटते की, हा रोल त्यांच्याव्यतिरिक्त आणखी कुणीही करू शकले नसते. जेवढ जस्टीफिकेशन ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला देत आहेत कदाचितच ते आणखी कोणी देऊ शकले असते. त्यांचा हा लुक बघून असाच वाटत की, हा रोल त्यांच्यासाठीच आहे.

या चित्रपटाच्या टीझरची सुरवातच दंग्याच्या सीन ने होते. जिथे एक लहान मुलगा रडत असतो आणि त्याच्या जवळच एक पेट्रोल बॉम्ब येऊन फुटतो आणि त्यानंतर दंग्याचा सीन येतो, ज्यात नवाझ अगदी बाळासाहेबांप्रमाणे जनसमुदायाचे अभिवादन करताना दिसत आहेत.

 

nawaz-thackray-inmarathi01
financialexpress.com

या चित्रपटासाठी नवाझ यांनी खासकरून मराठीची ट्रेनिंग घेतली. नवाझ यांना मराठी शिकण्यासाठी खूप परिश्रम करावे लागले. पण बाळासाहेब हे फक्त “एक मराठी माणूस” नव्हते तर मराठी माणसाच्या अभिमानाचं स्फुल्लिंग चेतवणारे प्रेरणास्थान होते. त्यामुळे त्यांचा रोल करायचा म्हटलं, तर मराठी ही यायलाच हवी. म्हणूनच नवाझ यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांना मराठीत डायलॉग बोलताना अनेक अडचणी आल्या. म्हणून मग या चित्रपटाच्या निर्मात्यांनी असा निर्णय घेतला की – या चित्रपटाचे केवळ काही मुख्य डायलॉग हे मराठीत असणार तर इतर डायलॉग हे हिंदीतच असणार.

 

nawaz-thackray-inmarathi
indianexpress.com

मिड-डेच्या बातमीनुसार, शिवसेना प्रवक्ता आणि या चित्रपटाचे प्रोड्युसर संजय राऊत यांनी काही महिन्यांआधी नावाझुद्दीन यांच्याशी संपर्क साधला. नवाझ देखील या चित्रपटासाठी एवढे उत्साहित आणि आनंदी होते की त्यांनी फीसची डिमांड न करताच या चित्रपटासाठी होकार दिला.

संजय राऊत यांनी सांगितले की,

“बाळासाहेबांवर चित्रपट बनविणे हे माझे स्वप्न आहे. बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांना मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा,” असं मला वाटतं.

 

bal-thackeray-inmarathi
intoday.in

या चित्रपटाला अभिजित पानसे डायरेक्ट करणार आहेत. तर इतर कलाकारांचे नाव अजूनही फायनल केल्या गेले नाहीत. हा चित्रपट बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजेच २३ जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनीच या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.

स्मिता ठाकरे यांनीही 2015 मध्ये बाळासाहेबांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. त्यांचा मुलगा आणि बाळासाहेबांचे नातू राहुल ठाकरे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या विरोधानंतर हा चित्रपट बनला नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?