आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
चीनचं नाव घेतलं कि येतो डोळ्यासमोर अजस्त्र लोकसंख्या असलेला, लाल राजकीय विचारसरणीला एक आधुनिक रुप देउ पाहणारा देश. या देशाचं भारतासोबत असलेलं वैर काही नवीन नाही. भारत स्वतंत्र झाल्यापासून एक एक कुरापती सतत चालू आहेत. मग ते नागा बंडखोरांना लष्करी ट्रेनिंग देणं असो वा पाकिस्तानला मोकळ्या हाताने मदत करणं असो.
१९६२ च्या उद्धानंतर भारत आणि चीन संबंधांमध्ये बरेच उतार-चढाव आलेत. डोक्लाम विवाद, न्यूक्लीअर स्प्प्लायार ग्रुप च्या प्रवेशात भारतासाठी अडथळे तयार करणे, एका कुख्यात आतंकवाद्यला जागतिक पटलावर जाहीर करण्यात अडथळे निर्माण करणे, इत्यादी चालूच आहे. भारत आणि चीन संबंध भविष्यात काय वळण घेतील हे कोणालाच सांगता येणं शक्य नाही.
एखाद्या देशाचा जागतिक व्यवस्थेवर प्रभाव काही गोष्टींवर अवलंबून असतो. जसे कि देशाची अर्थव्यवस्था, लष्करी सामर्थ्य (ज्यात नाविक, वायू आणि थल या तिघांचा समावेश होतो), देशाचे भौगोलिक स्थान, मनुष्यबळ इत्यादि. आशिया खंडात भारत आणि चीन हे दोन राष्ट्रे जागतिक राजकारणात आपले स्थान निर्माण करू पाहत आहे. राज्यशात्र्याच्या नियमांप्रमाणे प्रत्येक राष्ट्र आपली शक्ती नेहमी वाढवतच राहणार. ही शक्ती निरंतर निर्माण करण्यात आणि ती टिकवून ठेवण्यात संघर्ष होणारच. युद्ध नाही झाले तरी सामरिक संघर्ष हा तर अटळ आहे.
भारत आणि चीनच्या लष्करी शक्ती (नाविक, वायू आणि थल) एकमेकांना तोडीस तोड आहेत. पण, हा लष्करी आणि सामरिक शक्तीचा समतोल थोडा चीनच्या दिशेने झूकण्याची शक्यता आहे. कारण चीनचे नवे ५व्या पिढीचे लढाऊ विमान J-२०.
५व्या पिढीचे लढाऊ विमान म्हणजे काय ?
याचे उत्तर आपल्याला थोडं मागे जाऊन बघावे लागेल.
पहिल्या पिढीचे विमान म्हणजे ज्यात रडार नाही, आहे तर फक्त वेग तोही ध्वनीपेक्षा कमी. यात आधुनिक क्षेपणास्त्र नाहीत, फक्त जून्या बंदूका. या विमानांचा उपयोग द्वितीय महायुद्ध संपेपर्यंत झाला.
दुसऱ्या पिढीचे विमान म्हणजे ज्यात रडारचा मोजका उपयोग झाला (रेंज रडार ) आणि विमानाने ध्वनीचा वेग मोडला.
तिसऱ्या पिढीचे विमान म्हणजे वेग, उत्तम असे pulse रडार, विविध missile आणि वेगवेगळी लष्करी कामे करणारे विमान.
चौथ्या पिढीचे विमान म्हणजे तिसऱ्या पिढीच्या विमानातला ६०-७०% आधुनिकीकरण.
आणि – पाचव्या पिढीचे विमान म्हणजे –
रडार ज्याला पकडू शकत नाही, वेग आणि इंधनाचा संयम म्हणजे Supercruise क्षमता आणि सगळ्यात आधूनिक missiles ज्या १०० किमीपेक्षा दुरून कुठल्याही लक्षाला भेदू शकतात.
तर हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान जगात सगळ्यात पहिले बनवले ते अमेरिकेने, F-२२ Raptor. त्यात फेरबदल करून तयार झाले F-३५. मग यात मुसंडी मारली ती चीनने J-२० बनवून!
J-२० चा उगम:
हे विमान १९९० साली चालू झालेल्या J-XX प्रोग्राम अंतर्गत तयार झाले. ‘चेंगडू’ विमान कंपनीने हे विमान पूर्णपणे तयार केले आहे. चीनी राज्यकर्ते एवढे हुशार आहेत की त्यांनी या विमानाचे पहिले प्रायोगिक उड्डाण त्यांनी अमेरिकी रक्षामंत्री रोबेर्ट गेट्स ज्या दिवशी परिषदेसाठी आले त्याच दिवशी केले. कसला हा माज ?
जरी राजकीय आणि लष्करी परीक्षकांनी ह्याला विशेष असं संबोधल नसेल तरीही राजकारणात, तेही सामरिक संबंधात जो ‘Surprise’पणा असतो तो मात्र चिन्यांनी उत्तम साधला. ११ जानेवारी २०११ ला विमानाने पहिले उड्डाण केले आणि सामरिक समतोलाची चर्चा तावातावाने चालू झाली.
पहिल्या विमानाची यथेच्छ खिल्ली उडवली गेली. कारणे पण बरोबरच होती म्हणा. मोठे ‘Heat Signature’, इंजिनचा मोठा आवाज, धूर सोडणारे Xian WS-१५ इंजिन, इत्यादी. या विमानात आणि अमेरिकी विमानात बरेच साम्य आहे. अमेरिकी म्हणतात कि चिन्यांनी अमेरिकेचे तंत्र चोरले म्हणून !
किती खरे आणि किती खोटे, हे त्यांनाच माहित. खरे म्हंटले तरी गोची आणि खोटे म्हणले तर चीनी ताकत वाढत आहे याला दुजोरा ! दोन्ही ठिकाणी पंचाईत!
जसा काळ पुढे सरकत गेला, तसं विमानात सुधारणा होत गेल्या आणि सर्व दोष, इंजिन सोडून, काबूत आले. काही काळात हा दोष सुद्धा निघून जाईल, यात शंका घेण्यात काही अर्थ नाही!
नव्या विमानात जे बदल केले आहेत – ते म्हणजे मोठ्या इंधनाच्या टाक्या, bubble कॉकपीट, जास्त missile घेऊन जाऊ शकणारे कप्पे ( internal बीड), संपूर्ण डिजिटल कॉकपीट, वैमानिकाला ३६०० मध्ये दिसणारे दृश्य. लष्करी एक्स्पर्ट असे म्हणतात कि रडार पासून अदृश्य होण्यासाठी फक्त विमानच्या तोंडाची रचना बरोबर आहे. तोंड सोडले तर बाकी सर्व ठिकाणांपासून रडारला विमानाची कल्पना येऊ शकते.
पण जो पर्यंत रडार विमानाचा पत्ता लावेल, तो पर्यंत विमान हल्ला करून चालला जाईल, हे कोणी लष्करी एक्स्पर्ट सांगत नाही ! विमान maintain करण्यासाठी F-२२ आणि F-३५ सारखा अवाढव्य खर्च येत नाही हे पण कोणी सांगत नाही ! ज्या hanger मध्ये बाकी विमाने पार्क केली जातात, तिथेच हे विमान सुद्धा पार्क केले जाऊ शकते. यासाठी वेगळे hanger जसे F-२२ आणि F-३५ लागतात, तसे लागत नाही, हे कोणी सांगत नाही !
५ व्या पिढीसाठी लागणारे खास धातू चीन बनवत असून, नजीकच्या काळात त्याचा उपयोग नक्कीच होईल. चेंगडू कंपनीच्या अखत्यारीत असणारी एक कंपनी हे काम जोमाने करत आहे.
या विमानाचा परिणाम चीनचा शेजारी राष्ट्रांवर तर होणारच आहेत. खास करून दक्षिण चीनी समुद्रातले देश. या सर्व देशांकडे जुने विमाने आहेत आणि अशी J-२० च्या तोडीस विमाने घेण्यासाठी पैसे नाहीत आणि तशी विमाने बनवणारे देश तेवढे उत्सुक नाहीत! जपानचे ५व्या पिढीचे विमान उशिरा येणार आहेत. अमेरिकेची ७वी नाविक तुकडी सुद्धा या विमानाच्या दृष्टीपथात आली आहे.
भारतावर परिणाम:
भारताची वायुसेना सध्या आकड्यांच्या खेळात मागे आहे.
भारतीय वायुसेनेला जेव्हा ३९.५ Squadron लागतात, आपल्याकडे आहेत ३३. त्यात जुन्या विमानांची संख्या जास्त. मिग-२१ आणि मिग-२७ च्या कमीत कमी १४ Squadron २०१५-२०२४ पर्यंत retire होणार. Rafale आणि सुखोई विमान जाणाऱ्या विमानांची जागा घेतील.
येणाऱ्या १० वर्षात आपल्या वायुसेनेला २०० विमाने लागतील. आता बाजारात जाऊन एक किलो कांदे घेण्यासारखा हा प्रकार नाही. नवीन लष्करी गोष्टी विकत घेण्याचा आपला इतिहास बघता, गोष्ट अजून अवघड जाते.
Rafale विमान कधी येणार सांगता येत नाही. सुपर सुखोईची घोषणा होऊन बराच काळ लोटला पण पक्कं असं काही निघाल नाही. रशियासोबत आपल ५व्या पिढीच विमान बनत आहे, पण प्रगती संथगतीन होत आहे.
रशिया सध्या नव्या इंजिनची चाचणी करत आहे. पूर्ण विमान बनायला अजून अवकाश आहे. ते विमान बनणार आणि मग HAL आणि वायू सेना त्यात बदल करणार यात बराच वेळ अजून जाणार. त्यात भारत आणि रशिया यांच्या भागीदारीतपण बदल घडत आहे, म्हणून अजून उशीर. AMCA जे आपला स्वदेशी ५व्या पिढीच विमान आहे, ते सुद्धा पुढच्या दशकात उडेल. तो पर्यत चीनी त्यांच्या J-२० मध्ये बरेच बदल करून घेतील.
सध्या आपल्यासमोर तीन उपाय आहेत.
एक म्हणजे जमिनीवर असणाऱ्या रडारची क्षमता वाढवणे आणि तत्सम विमानभेदी रचना तयार करणे.
दुसरी म्हणजे शक्तिशाली AWACS विकत घेणे आणि निर्माण करणे.
तिसरी म्हणजे ५ व्या पिढीचे विमान टिपणारी system विकत घेणे (रशियन बनावटीचे S-४००).
पण या तिन्ही पर्यायांना अंत आहे. किती missile घेणार आणि किती S-४०० घेणार? याला खरा, परिणामकारक एकच उपाय आहे तो म्हणजे, आधुनिक वायू सेना – आकड्यानेपण आणि दर्जानेपण !
उद्या पाकिस्तानने समजा चीन कडून ४० J-२० विकत घेतले अथवा वापरायला आणले अथवा चाचण्या करून देतो म्हणून घेतले तर आपली पंचाईत होऊ शकते.
समजा पाकिस्तानने ही विमाने राजस्थानलगत अथवा पंजाबलगत ठेवली तर त्याचे सामरिक आणि लष्करी परिणाम गंभीर होतील!
उद्या चीनने तिबेटजवळ ही विमाने बसवली तर काय होईल? CPEC (China Pakistan Economic Corridor) ला सुरक्षा म्हणून बसवली तर काय होणार? याचा आपल्या Afghanistan मोहिमेवर परिणाम होऊ शकतो काय? उद्या रशियाने उच्च दर्जाचे इंजिने जर चीनला विकली आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली तर काय करणार ?
धोका फक्त विमानाचा आहे असं नाही. फार मोठा धोका आहे तो चीनच्या उत्पादन क्षमतेचा! एकतर हुकुमशाही, अफाट पैसा आणि मोठे मनुष्यबळ! याचा उपयोग चीन घेणारच!
२०१९ पर्यंत चीन या विमानाच्या ४ रेजिमेंट संपूर्णपणे तयार करेल. त्यासाठी लागणारे मनुष्यबळाची ट्रेनिंग सुरुपण झाली आहेत. कारण नुसते विमान बांधून उपयोग नाही, वैमानिक लागणार, तत्सम गोष्टी लागणार. तिथे चीन नक्कीच मुसंडी मारणार! २०३२ पर्यत किती J-२० निर्माण होतील याचा अंदाज आताच लावणे कठीण आहे! पण, संख्या मात्र अवाढव्य असणार!
सामरिक समतोल तेव्हाच साधला जाईल जेव्हा समोरच्या पक्षाचे योग्य ते मोजमाप होऊन पक्के पावले उचल्या जातील. चीन आहे, reverse engineering करतो, असे म्हणून जर चालत राहिलो तर धोका आहेच. चीनच्या या विमानाचा धोका जरी अमेरिकेला तेवढा नसला तरी आपल्याला आहेच.
चीन आधीआपले आशियातले स्थान मजबूत करेल आणि मग जागतिक स्वप्न बघेल.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.