या पदार्थाला कडवट म्हणून नाकरणं म्हणजे स्वतःच्याच आरोग्याचे नुकसान, वेळीच सावध व्हा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी
—
मागील भागाची लिंक : निरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा
–
हिवाळा म्हटलं की, “मेथीलाडू” हमखास आठवतात. काय असेल बरे या कडवट पदार्थाचा ऊपयोग?? तेच आज आपण पाहणार आहोत.
पोषणमूल्ये-
असे हे मेथीबीज बऱ्याच पोषणमुल्यांनी युक्त असते.
आधुनिकशास्त्रानुसार मेथीबीजाचे काही ऊपयोग पाहुया.
मेथी ही antimicrobial सांगितली असुन कुठल्याही प्रकारची inflamation (सूज) दुर करण्यास मदत करते.
त्यामुळे mouth ulcers, boils, bronchitis, tuberculosis यात ऊपयुक्त ठरते.
बद्धकोष्ठता व सूज दूर करण्यास मदत करते. त्यामुळे आंत्रावरील सुज, व्रण (ulcerative colitis) मध्ये उपयुक्त ठरते.
Antidibetic property-
Non-insulin dependant diabetes मध्ये 5gm मेथीबीज जर रोज सेवन केले तर रक्तातील साखर नियमीत राहते.
Antioxidents चे प्रमाण भरपुर असल्याने त्वचा, केस यांचे आरोग्य राखल्या जाते.
Menopausal period व menstrual period मधील पोटदुखी मेथीबीज सेवनाने कमी होते.
मेथ्या antitumerogenic असतात. त्यामुळे ovarian cyst (pcod) च्या स्त्रीयांनी अवश्य सेवन करावे.
Metabolism सुधारण्यास करण्यास मेथ्या मदत करतात. त्यामुळे पचनशक्ती वाढते.
Breast feeding देखील improve होते.
पेशींशी निगडीत वेदना व सुज कमी करते, त्यामुळे gout, sciatica यासारख्या व्याधीत ऊपयुक्त ठरते. पौरूष शक्ती वाढवते, त्यामुळे male infertility मध्ये ऊपयुक्त ठरते.
Cholesterol कमी करण्यास मदत करते.
muscle mass कायम ठेवुन फक्त fats नष्ट करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
आयुर्वेदानुसार मेथीबीज अत्यंत ऊपयुक्त आहे. संस्कृत मध्ये “मेथिका”म्हणतात.
मेथी ही लघु (पचनास हलकी) सांगितली असून स्निग्ध गुणाने वाताचे शमन करणारी आहे.
तसेच कफदोषाचेही शमन करते.
ऊष्ण गुणात्मक असल्याने हिवाळ्यात अवश्य सेवन करावे.
तसेच “ज्वरनाशक”(antipyretic) सांगितली आहे.
“बल्य “म्हणजेच शक्तीदायक सांगितली आहे.
“वाजीकर”(increases male fertiliy) हा गुणधर्म सांगितला आहे.
अरूचि (nausea) कमी करण्या मदत करते .
“दिपनीय”(improves metabolism)वर्णीली आहे.
मात्र रक्तपित्त (bleeding disorders) मध्ये देऊ नये.
1 ऊदरशुल(abdominal pain)
2.अरूची*(nausea)
3प्रमेह( मुत्रसंस्थेच्या व्याधी)
4 स्थौल्य
मेथ्याचे काही घरगुती ऊपयोग( प्रथमोपचार)
पोटात gas धरणे(bloating)—चिमुटभर हिंग+1चमचा मेथी पावडर+बिना लोण्याचे ताक(1ग्लास)घेणे.
केस गळत असल्यास कोरफडीचा रस व मेथी पावडर एकत्र करून मुळांना लावावे.
श्वेतप्रदर(lucorhoea-white discharge) असणार्या स्त्रीयांनी methika pessariवापराव्यात.
मेथीच्या गुळण्या केल्यास तोंडातले येणे (mouth ulcers), घशात फोड येणे(sore throat)या अवस्थांमध्ये बराच आराम मिळतो.
अशी ही मेथी जीभेला जरी कडवट लागली तरी शरीराचे आरोग्य जपण्यास अत्यंत लाभदायक ठरते.त्यामुळे तिचा आहारात नक्की समावेश करावा.
—
- उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
- पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.