Site icon InMarathi

रेल्वे रिझर्व्हेशन करताना आपल्याला हवी ती सीट का मिळत नाही? जाणून घ्या!

railway reservation im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकाला वाटतं की त्याचा प्रवास सुकर व्हावा, कुणाशी जागेवरून भांडण नको अगदी शांतपणे प्रवास व्हायला हवा, पण खऱ्या आयुष्यात असं कधी घडत का तर नाही!

आपण प्रवास करताना नेमका त्रास आपल्यालाच का होतो शिवाय रिझर्व्हेशन करताना नेहमी आपल्यालाच का अडचणी येतात याचा कधी विचार केला आहे का?

 

mumbai llve

 

कुठे फिरायला जायचे म्हटले, तर आपला प्रवास आरामदायी व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळेच आपण प्रत्येकवेळी आपल्या सुविधेनुसार स्वतः बसमधील आपल्या सीट्स निवडतो, त्यातही ती जर विंडो सीट तर उत्तमच.

बस असो वा रेल्वे, प्रत्येकवेळी आपली इच्छा असते की, आपल्याला विंडो सीट मिळावी, ज्यामुळे आपण खिडकीबाहेर डोकावून आपल्या प्रवासाचा आनंद घेऊ शकू.

पण रेल्वेच्या बाबतीत विंडो सीट तुमच्या चॉइसवर अवलंबून नसते, कारण येथे तिकीट बुक करताना आपली आवडीची सीट निवडण्याचा कोणताही पर्याय दिलेला नसतो.

 

IndiaMART

 

कितीतरी वेळा तुमच्याबरोबर देखील असे झाले असेल की, सीट बुक केल्यानंतर प्रवासाच्या वेळी तुम्हाला मधली सीट मिळाली आहे. अशावेळी तुम्ही काही करू शकत नाही.

पण तुम्ही कधी विचार केला आहात का? की, सिनेमागृहात देखील आपल्याला आपली सीट निवडण्याची मुभा असते, मग रेल्वेमध्ये ही मुभा का नसते ?

आज आम्ही तुम्हाला याबद्दल स्पष्टपणे माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, याविषयी…

खरेतर, रेल्वेमध्ये बुकिंग करण्याच्या दरम्यान खूप गोष्टी पाहाव्या लागतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि, रेल्वेचे तिकीट बुकिंग सॉफ्टवेअर काही अशाप्रकारे बनवण्यात आले आहे, जे सर्व कोचमध्ये एकसमान लोकांची बुकिंग करतो.

 

breathedreamg

 

रेल्वेमध्ये स्लीपर क्लास एस १, एस २, एस ३, एस ४ अशा क्रमांकाचे कोच असतात. प्रत्येक कोचमध्ये ७२ सीट्स असतात.

त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्वात पहिल्यांदा तिकीट बुक करता, तेव्हा रेल्वेचे सॉफ्टवेअर तुम्हाला मिडल कोच म्हणजेच एस ५ मध्ये कंपार्टमेंटमध्ये मिडलमध्ये सीट नंबर ३० – ४० च्यामध्ये कोणतीतरी लोवर सीट अलॉट करते आणि त्यानंतर बॅलेन्स बनवण्यासाठी अप्पर सीट आणि मिडल सीटचे अलॉटमेंट होते.

जेव्हा तुम्ही आयआरटीसीच्या मदतीने बुकिंग करता, तेव्हा सॉफ्टवेअर पहिल्यांदाच चेक करते की, सर्व कोचमध्ये एकसमान प्रवासी आहेत की नाही.

मिडलपासून सुरु होत गेटच्या जवळची सीटपर्यंत सीट्स अलॉट केल्या जातात. म्हणजेच पहिल्यांदा लोवर बर्थ, त्यानंतर मिडल आणि शेवटला अप्पर बर्थ अलॉट झाला पाहिजे.

असे करण्यामागे रेल्वेचा हेतू सर्व कोचना मम्हणजेच डब्यांना बॅलेन्स बनवून ठेवणे हे असते. कदाचित आता तुम्ही समजला असेल कि, शेवटची तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला अप्पर बर्थ का मिळते.

 

thebetterindia.com

 

जरा विचार करा, जर रेल्वे सध्या चालू असलेल्या बॅलेन्स सीट्स सिस्टमला सोडून काहीही विचार न करता कसेही बुकिंग करायला लागली तर कसे होईल.

असे मानले कि, एस १, एस २, एस ३ कोच पूर्णपणे भरलेले आहेत, परंतु एस ५, एस ६ हे कोच रिकामी आहेत. त्यामध्ये मोजण्याइतके प्रवासी आहेत.

अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रेल्वे आपल्या पूर्ण वेगात धावेल आणि टर्न घेईल तेव्हा पाठीमागील रिकामे डब्बे रुळावरून उतरण्याची भीती असते, कारण त्याचे वजन कमी असते.

सीट बुकिंग करण्यामागे एक टेक्निकल कारण देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे. जेव्हा चालक ब्रेक लावतो, तेव्हा जर सर्व कोचमध्ये समान प्रवासी नसतील तर कोचचे वजन देखील वेगवेगळे असेल. अशावेळी रेल्वेची स्थिरता प्रभावित होऊ शकते.

 

erail.in

 

तिकीट बुकिंग करतेवेळी नाव, वय, लिंग इत्यादींची माहिती भरावी लागते. याच्या आधारावर सीट्स अलॉट केली जातात. जसे. वृद्ध, गरोदर स्त्रिया यांना लोवर बर्थ दिली जाते.

शिवाय यात सिनियर सिटिझन्स यांचा एक वेगळाच कोटा असतो, ज्यात काही लोवर बर्थ हे फक्त त्यांच्यासाठी राखीव असतात ज्याणेकरून त्यांना प्रवासात कसलाही त्रास किंवा कुठलाही अपघात व्हायला नको म्हणून!

 

youtube.com

 

यामुळे सुद्धा आपल्याला लोवर बर्थ मिळण्याची शक्यता कमी होतेच, आणि वृद्ध लोकांना ती तरी सोय उपलब्ध व्हावी म्हणून हि तरतूद केली आहे!

 आता तुम्हाला समजले असेल की, जर लोक आपल्या मर्जीने सीट निवडू लागले तर रेल्वेचा बॅलेन्स बिघडू शकतो आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप धोकादायक आहे.

या सर्व कारणांमुळे आपल्याला आयआरटीसीवरून किंवा असे बाहेरून रेल्वेचे तिकीट काढताना आपल्या आवडीची सीट पसंत करण्याची मुभा मिळत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version