' 2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी – InMarathi

2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

देशाच्या तिजोरीला १ लाख ७६ हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला. 2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी सीबीआय कोर्टाने आज माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यावर निर्णय दिला.

 

2G spectrum scam-inmarathi01

 

माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. यामध्ये ए. राजा, माजी डीएमके खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींचा समावेश होता. ते सर्व दोषमुक्त झाले आहेत.

सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांनी आज या घोटाळ्याचा निकाल जाहीर केला. 2-G स्पेक्ट्रम घोटाळा हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा मानला जातो.

हा निकाल जाहीर करणाऱ्या विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांच्याबद्दल काही खास गोष्टी इंडिया टुडे ने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांचा हा गोषवारा.

१. ओ पी सैनी हे ६३ वर्षांचे असून त्यांनी त्यांचे करिअर दिल्ली पोलिसांत उपनिरीक्षक म्हणून सुरु केले होते. उपनिरीक्षक झाल्याच्या ६ वर्षांनंतर त्यांनी न्यायालयीन दंडाधिकारीची परीक्षा दिली आणि त्यात ते निवडल्या गेले.

 

2G spectrum scam op saini -inmarathi
scratchmysoul.com

२.सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जी.एस.सिंघवी व ए. के गांगुली यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे असे सांगितले. तेव्हा या प्रकरणाकरिता सैनी यांनी निवडण्यात आले.

३. 2-G स्पेक्ट्रम घोटाळया आधी सैनी यांनी कॉमन वेल्थ गेम्स संबंधित प्रकरण देखील हाताळले आहेत. यात त्यांनी सुरेश कलमाडी, त्यांचे सहकारी ललित भानोत, वि.के. वर्मा, के.यु.के. रेड्डी, प्रवीण बक्षी आणि देओरुखर शेखर यांना पाठीशी घातले.

 

suresh-kalmadi-inmarathi
sportskeeda.com

४. ओ.पी. सैनी यांना एक कठोर न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. त्यांनी एम. कानिमोझी यांची जामीन हे सांगत फेटाळून लावली की, ते प्रसिद्ध राजकारणी आहेत त्यामुळे ते साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न करू शकतात.

५. सैनी यांनी National Aluminium Company Limited (NALCO) संबंधी भ्रष्टाचाराचे प्रकरण देखील हाताळले होते. यावेळी त्यांनी कंपनीचे चेअरमन ए.के. श्रीवास्तव यांची जामीन फेटाळून लावली होती.

 

red fort-inmarathi
newsmobile.in

६. सैनी यांनी लाल किल्ला शूटआऊट प्रकरणावर देखील निर्णय दिला होता. ज्यात त्यांनी मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती, तर इतर सहा आरोपींना जन्मपेठेची शिक्षा सुनावली होती. न्यायाधीश (एम. सभरवाल) 2002 मध्ये निवृत्त झाल्यानंतर सैनी यांनी हे प्रकरण हाताळले होते.

हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते, त्या संबंधी ५ इतर प्रकरण आणि ३०० साक्षीदार होते. त्यामुळे सैनी यांच्याआधी २ न्यायाधीशांनी हे प्रकरण हाताळण्यास नकार दिला होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?