Site icon InMarathi

‘स्मार्टफोनमुळे’ आता लायसन्स व इतर कागदपत्रे स्वतःकडे बाळगायची गरज नाही!

digi locker featured inmarathi

newsbharati

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बाहेर दुचाकी किंवा कार घेऊन फिरताना समोर ट्रॅफिक हवालदार दिसला की उगाचच सगळ्यांच्या मनात एक धडकी भरते!

आपल्याकडे लायसन्स आहे, पण पियुसी, हेल्मेट, रजिस्ट्रेशन बुक, इन्शुरन्स आहे की नाही याची आपण मनातल्या मनात उजळणी देखील करतो!

समजा त्या हवाळदाराने आपल्याला पकडलं तर त्याला उत्तरं काय द्यायची इथपासून तो ५० किंवा १०० रुपयात मानेल का अगदी इतक्या खालच्या थराला आपले विचार जातात!

आपण नुसते ओरडतो की पोलिस किंवा ट्रॅफिक हवालदार पैसे घेतात, पण आपण चूक करतोय नियम धाब्यावर बसवतोय याचा कुणाच्याच मनात विचार सुद्धा येत नाही! 

 

India Today

 

गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाकडे गाडी चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

त्यामुळे जर तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसेल किंवा गाडीचे पूर्ण पेपर नसतील आणि तुम्हाला पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो.

पण कधी – कधी चुकून आपल्याकडून गाडीचे पेपर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घरी राहते किंवा आपण ते घ्यायला विसरतो. अशावेळी देखील तुम्हाला दंड भरावा लागतो.

 

the better india

 

पण आता जर तुम्ही लायसन्स किंवा गाडीच्या आरसीची कॉपी घरी विसरलात, तरी देखील पोलिसांना घाबरण्याची काही गरज नाही, कारण आता सरकारने एक नवीन सुविधा दिलेली आहे!

ज्यानुसार तुम्हाला गरजेच्या कागदपत्रांची हार्डकॉपी आपल्या जवळ बाळगायची गरज नाही. या सुविधेमुळे तुम्ही या चिंतेमधून मुक्त व्हाल.

चला तर मग जाणून घेऊया, यावर काय पर्याय दिला आहे सरकारने त्याबद्दल..

खरतर, आता तुम्ही हार्डकॉपीच्या ऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीच्या आरसीची सॉफ्टकॉपी देखील पोलिसांना दाखवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता.

यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनमध्ये डीजीलॉकर अॅप (DigiLocker App) डाऊनलोड करायचे आहे.

हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही यामध्ये तुमचे सर्व गरजेची कागदपत्रे स्टोर करून ठेऊ शकता. येथे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्यांना जवळ बाळगण्याची समस्या संपुष्टात येईल. हे सरकारी अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे.

 

tweak library

 

यामध्ये काय – काय स्टोर करू शकतो..

डीजीलॉकर (DigiLocker App) मध्ये सर्व प्रकारचे गरजेची कागदपत्रे जसे, पॅनकार्ड, पासपोर्ट, मार्कशीट, डिग्री यांना स्टोर करून ठेवण्यात येऊ शकते.

जर तुम्हाला तुमची कागदपत्रे कोणाला पाठवायची असतील, तरी देखील तुम्ही याच्या आधारे त्याची डिजिटल कॉपी सहजतेने शेअर करू शकता.

काही दिवसांनी यामध्ये १ जीबीपर्यंतचे स्टोरेज केले जाऊ शकते. डीजीलॉकरला वापरकर्ते आपल्या गुगल आणि फेसबुक खात्याशी देखील लिंक करू शकतात.

यामध्ये तुम्ही कागदपत्रांच्या फाइलला pdf, jpg, jpeg, png, bmp आणि gif फॉरमॅटमध्ये अपलोड करू शकता.

डीजीलॉकरचा वापर कसा करावा..

स्टेप १ :

 

thebetterindia.com

 

डीजीलॉकर ह्या अॅपला गुगल प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करा. हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. या अॅपच्या वेलकम स्क्रीनवर तुंम्हाला दोन पर्याय दिसतील.

त्यातील एक पर्याय साईन इन चा असेल, तर दुसरा साईन अपचा असेल. जर त्यामध्ये पहिल्यापासून तुमचे खाते असल्यास, तुम्ही साईन इनच्या पर्यायावर क्लिक करून लॉग इन करू शकता.

पण जर तुम्ही याचे नवीन युजर असाल, तर तुम्ही साईन अपच्या पर्यायावर जा.

 

स्टेप २ :

 

digital-locker.in

 

त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. या ओटीपीच्या सहाय्याने व्हेरीफिकेशन केले जाईल.

ही व्हेरीफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही तुमचे नाव आणि पासवर्ड क्रिएट करू शकता.

अशा या सरकारने दिलेल्या डीजीलॉकरच्या पर्यायामुळे आता लायसन्स आणि इतर कागदपत्रे घरी विसरल्यानंतर देखील आपल्या मनामध्ये कोणतीही भीती राहणार नाही!

आणि आपल्याला दंड भरावा लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकानेच या नवीन डीजीलॉकर पर्यायाचा उपयोग करून घेतला पाहिजे!

आहे की नाही हा एकदम मस्त पर्याय, कोणतीही कागदपत्र बाळगायची झंझट नको, फक्त मोबाइल जवळ ठेवा, आणि सगळी कागदपत्र बिनधास्त घेऊन फिरा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version