कुठे समोसा तर कुठे किंडरजॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या या १० वस्तू बॅन आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
खाण्याची आवड नसणारी व्यक्ती या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही. खाण्याचं नाव जरी काढलं तरी लोकांचे चेहरे अगदी खुलून जातात. तुम्ही कधी कुठल्या फुडी म्हणजेच ज्याला खाण्याचं वेड असेल अश्या कुणाशी बोलला आहात का?
त्यांच्याशी खाण्याविषयी बोलताना तुम्हाला नक्कीच भन्नाट अनुभव आला असेल. अनेकांसाठी तर खाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टच महत्त्वाची नसते.
आजकाल असे अनेक फूड लव्हर्स आपल्याला बघायला मिळतात. आपणही त्यातलेच एक असाल. पण जर कुठे या खाण्याच्या पदार्थांवरच बंदी असेल तर!! तुम्ही म्हणालं हा तर अन्याय आहे.
पण असे अनेक फूड प्रोडक्ट्स आहेत ज्यांच्यावर अनेक देशांत चक्क बॅन आहे. आज आम्ही आपल्यासाठी अशाच काही प्रोडक्ट्सची माहिती घेऊन आलो आहोत…
आपला आवडता स्नॅक ब्रँड म्हणजे हल्दीराम! पण यूएसएच्या फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनने हल्दीरामच्या सर्व फूड प्रोडक्ट्सला बॅन केले आहे. त्यांच्या परीक्षणात हल्दिरामचे फूड प्रोडक्ट्स चांगले नसल्याचं सिद्ध झालं.
D-Cold, Vicks Action 500, Enteroquinol, Analgin, Syspride ही औषधं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात सापडतील. पण जगातील अनेक ठिकाणी या औषधांवर बॅन आहे. यातील काही औषधांवर तर, भारतात सुद्धा बंदी घालण्यात आली होती.
मात्र २०१६ साली घातलेली बंदी फार काळ अस्तित्वात राहिली नाही.
खसखस ज्याशिवाय अनेक भारतीय पदार्थ अपूरे वाटतात, पण हीच खसखस सौदी अरब, युएई, तायवान आणि सिंगापूर येथे बॅन आहे.
समोसा म्हणजे भारतीयांचा आवडता पदार्थ… भारतीय तर समोसा लव्हर्स असतात. कुठल्याही प्रसंगावर कुठल्याही वेळी जर समोसा समोर आला तर आपण स्वतःला रोखू शकत नाही. पण या समोस्याच्या त्रिकोणी आकारामुळे हा सोमालिया या देशात बॅन आहे.
‘किंडर जॉय’ आजच्या पिढीच्या लहान मुलांचं आवडतं आहे. पण या फूड आयटमवर युएस आणि इतर अनेक देशांत बॅन लावण्यात आला आहे.
–
- खुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट
- परदेशात बंदी मात्र आपल्याकडे सर्रास विकल्या जातात ‘या’ वस्तू… वाचा!!!
–
रस्त्याने येताना जर कुठे गरम जिलेबी जर कधी आपल्या नजरेस पडली तर आपण नक्कीच त्यावर तव मारत असाल. या जिलेबित फूड कलर वापरण्यात येतो. तसेच भारतात अनेक पदार्थांत फूड कलर वापरला जातो. पण जगातील अनेक देशांत या फूड कलरवर बॅन आहे.
अमेरिकेत जर कुठल्या फूड आयटमवर त्याचं नाव आणि वापरण्यात आलेली सामुग्री लिहिलेली नसेल तर ते फूड आयटम तिथे बॅन असते.
अनेक फॅट फ्री प्रोडक्ट्समध्ये ‘OLESTRA’ नावाच्या आर्टिफिशियल फॅटचा वापर करण्यात येतो, पण यावर युकेमध्ये बॅन आहे.
मीरबेलल प्लम हे फ्रान्समध्ये उत्पादित करण्यात येणारे एक फळ आहे जे अमेरिकेत बॅन आहे.
आजकाल कॉन्टॅमिनेटेड दुधाचा वापर वाढला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात कॉन्टॅमिनेटेड दुधावर बॅन लावण्यात आला आहे.
–
- नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!या ७ टीप्स वापरल्यात तर गॅसवर ठेवलेलं दूध कधीही ऊतू जाणार नाही
हे होते ते १० फु प्रोडक्ट्स ज्यांच्यावर अनेक देशात बॅन लावण्यात आले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.