आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बॉलीवूड चित्रपटांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा केवळ अभिनेता-अभिनेत्री यांचीच स्तुती करतो, पण त्या चित्रपटात जो हिरो असतो त्याला हिरो बनवण्यात त्या चित्रपटातील खलनायकांचा देखील तेवढाच हात असतो.
आपल्या भारतीय चित्रपटांना जेवढे चांगले हिरो मिळाले आहे तेवढेच चांगले खलनायक देखील मिळाले आहे. ज्यांनी त्यांच्या अभिनयाने त्या चित्रपटांना यशस्वी होण्यास हातभार लावला.
आपल्या चित्रपट सृष्टीला असे अनेक खलनायक मिळाले आहेत, ज्यांचे अभिनय आपल्या आजही लक्षात आहेत.
पण आपण नेहमी नायकांच्या मुलांबद्दल बोलत असतो, की या हिरोचा मुलगा/मुलगी काय करते आहे ते कधी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत याबद्दल, पण आपण कधीच या खलनायकांच्या मुलांबद्दल फारसं बोलत नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच नावाजलेल्या ११ खलनायकांच्या मुलांबद्दल सांगणार आहोत.
१.
‘शोले’चा गब्बर सिंग म्हणजेच आपले अमजद खान, यांचा तो रोल तर कदाचितच कोणी विसरू शकेल. त्यांची त्यांच्या अभिनयाने गब्बर सिंगचा रोल अविस्मरणीय बनवला. आपल्या वडिलांप्रमाणे शादाब खान यांना देखील चित्रपटांत आपलं करिअर बनवायचं होतं पण त्यात ते काही यशस्वी झाले नाही.
२.
अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ या चित्रपटातून कांचा चीना या रोलमुळे प्रसिद्ध झालेले डॅनी डेन्जोंगपा बॉलीवूडच्या प्रसिद्ध विलन्स पैकी एक आहे. ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘घातक’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम क्ले आहे.
रीन्जिंग डेन्जोंगपा हा त्यांचा मुलगा. तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
३.
शक्ती कपूर यांना कोण ओळखत नाही, विलन आणि कॉमेडीयन या आपल्या दोन्ही भूमिका त्यांनी चोख पार पडल्या. शक्ती कपूर प्रमाणे त्यांना मुलगा सिद्धांत याला देखील चित्रपटांत आपलं करिअर बनवायचं आहे.
त्याने ‘हसीना दि क्वीन ऑफ मुंबई’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
४.
८०-९० च्या दशकातील प्रसिद्ध स्टंटमॅन आणि विलन एम.बी शेट्टी यांचा मुलगा हा सध्या बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डायरेक्ट-प्रोड्युसर पैकी एक आहे. तो आणखी कोणी नसून आपला रोहित शेट्टी आहे.
५.
बॅडमॅन गुलशन ग्रोव्हर हे देखील बॉलीवूडच्या प्रसिद्ध विलन्सपैकी एक आहेत.
त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळेच स्थान बनवले आहे. पण त्यांच्या मुलाला संजय ग्रोव्हर चित्रपटांत काही रस नाही, तो एक बिसनेस मॅन आहे.
६.
‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम रोग’ यांसारख्या चित्रपटांत विलनची भूमिका निभावणारे रजा मुराद हे देखील एक प्रसिद्ध विलन म्हणून ओळखले जातात.
रजा मुराद यांचा मुलाला देखील चित्रपटांची ओढ आहे. त्यासाठी त्यांनी लंडनच्या अक्टिंग स्कूलमधून ट्रेनिंग पण घेतली आहे.
७.
‘अरे ओ सांभा, कितने आदमी थे’ हा डायलॉग आज देशातील प्रत्येक मुलाच्या तोंडी असतो. यातील सांभा म्हणजेच मॅक मोहन हे मुंबईला क्रिकेटर बनायला आले होते. पण ते चित्रपट सृष्टीत आले. त्यांचा मुलगा विक्रांत मॅकीजन हा देखील चित्रपटांत काम करतो.
८.
बॉलीवूडच्या सर्वात हंडसम विलन्सपैकी एक कबीर बेदी यांनी बॉलीवूडला अनेक अविस्मरणीय भूमिका दिल्या आहेत. तर कबीर बेदी यांचा मुलगा आदम बेदी हा एक इंटरनॅशनल मॉडेल आहे.
९.
सुरेश ओबेरॉय हे देखील त्या काळचे गाजलेले विलन आहेत. त्यांच्या पावलावर पाउल ठेवत त्यांच्या मुलाने म्हणजेच विवेक ओबेरॉय याने देखील अभिनय क्षेत्रात आपले नाव कमावले.
१०.
बॉलीवूड विलन्स बद्दल चर्चा होत असताना रंजित यांची चर्चा नाही झाली तर ती चर्चाच अपूर्ण, कारण बॉलीवूड विलन्सची लिस्टच त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांनी सिने सृष्टीला अनेक अविस्मरणीय रोल दिले. त्यांचा मुलगा चिरंजीवी हा देखील एक अभिनेता आहे पण तो रंजित यांच्यासारखा विलन नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.