९० वर्षापूर्वीच्या या फ्लाइंग बोट्स काही विमानापेक्षा कमी नव्हत्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
विमानामध्ये बसून फिरायला जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. जीवनामध्ये एकदातरी विमानात बसायला मिळावे आणि विमानातील आरामदायी प्रवासाचा आनंद घेता यावा असे आपल्याला नेहमी वाटते.
विमानामध्ये मिळणाऱ्या लक्झरी सुविधा आपल्याला विमान प्रवासाकडे आकर्षून घेतात. विमानातून प्रवास करून आलेला प्रत्येकजण आपल्याला विमानामध्ये मिळणाऱ्या सुविधांची आणि आरामदायी प्रवासाची प्रशंसा करताना दिसतो. त्यामुळे आपली उत्सुकता अजूनच वाढते.
आज जगातील बहुतेक एअरलाईन्सनी प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी योग्य त्या उपाययोजन केल्या आहेत.
सिंगापूर एअरलाईन्सपासून एमिरेट्स आणि कँटास एअरलाईन्सपर्यंत सर्वांनीच त्यांचे फर्स्ट क्लास आणि बिजनेस क्लास स्वीट जगासमोर आणले आहेत. आणि या स्वीट्समधून प्रवास करण्याची मज्जा काही वेगळीच असते, हे आपण चित्रपटातून पाहतोच. यामधून प्रवास करणाऱ्या लोकांना खूपच रॉयल ट्रिटमेंट दिली जाते.
पण तुम्हाला हे माहित आहे का ? आजपासून ९० वर्षापूर्वी चालणारी फ्लाइंग बोट या विमानांपेक्षा कमी आरामदायी नव्हत्या. याचे विंटेज फोटो तुम्हाला या गोष्टीचा पुरावा देतील. या फ्लाइंग बोटची निर्मिती १९ व्या शतकातील आहे आणि ही बोट पाण्यातून चालत असे.
तसेच, त्या पाण्यावर टेक ऑफ आणि लँडिंग करण्याची क्षमता देखील या बोटमध्ये होती.
त्यामुळे गरजेच्या वेळी ही बोट उड्डाण देखील करत असे. अशा या फ्लाइंग बोटबद्दल आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या फ्लाइंग बोटबद्दल काही आकर्षक आणि अफलातून अशी माहिती…
हे फोटो १९३० च्या फ्लाइंग बोटचे आहेत. ज्यामध्ये आजच्या काळातील विमानामध्ये असलेल्या सुविधांसारख्या लक्झरी सुविधा दिल्या जात असत. त्या काळातील श्रीमंत लोक या फ्लाइंग बोट्स हॉटेल्समध्ये प्रवास करत असत. यामध्ये आरामदायी आर्मचेयर, डायनिंग रूम, ड्रेसिंग रूम्स आणि स्त्री – पुरुषांसाठी वेगवेगळे बाथरूम होते.
नवविवाहित दाम्पत्यांसाठी हनिमून स्वीटची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
तरी पण यामध्ये प्रवास करायला खूप वेळ लागत असे आणि यामधील प्रवास स्वस्त देखील नव्हता. सॅन फ्रान्सिस्कोमधून हाँग काँगपर्यंत जाण्याच्या प्रवासाचे भाडे तब्बल ४८ हजार रुपये होते. जे आजच्या काळामध्ये ८ लाखाच्या बरोबर आहेत.
त्यावेळचे श्रीमंत या फ्लाइंग बोट्स हॉटेल्समध्ये प्रवास करत असत. दुसरे महायुद्ध शांत झाल्यानंतर फ्लाइंग बोट्सचे प्रोडक्शन आणि फ्लाइंग टेक्नोलॉजी अधिक प्रगत झाली. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत मोठमोठ्या रनवेच्या बरोबरच कितीतरी विमानतळे बनवली गेली होती.
त्याच्यामुळे विमानांना समुद्रामध्ये उतरवण्याची गरज राहिली नाही. शेवटी, १९४६ मध्ये कॅलिफोर्निया क्लीपर माइल्सच्या उड्डाणानंतर शेवटची फ्लाइंग बोट घोषित करून या फ्लाइंग बोट्सचा वापर करणे बंद करण्यात आले.
अशा या ९० वर्षापूर्वीच्या फ्लाइंग बोट्स खूपच प्रशस्त आणि आरामदायी होत्या. तसेच, या बोट्समध्ये प्रवाशांना कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी पूर्णपणे काळजी घेतली गेली होती. आजपासून ९० वर्षापूर्वी देखील एवढ्या सुखसुविधा प्रवासाच्या दरम्यान देणे हे एक नवलच आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.