Site icon InMarathi

येथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील

robot-waiter-inmarathi01

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रोबोट हे आजच्या आधुनिक जगातील विकसित तंत्रज्ञानाचे सर्वात उत्तम आणि मोठे उदाहरण. आज आपल्या वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे रोबोट तयार केले आहे, ज्यामुळे माणसांच्या आवाक्या बाहेरची कामे देखील शक्य झाली, तर आज असे रोबोट देखील आहेत जे आपल्या दैनंदिन कामात देखील मदत करू शकतात.

 

eeyuva.com

विदेशात असे अनेक रेस्टॉरंट आहेत जिथे ग्राहकांना सर्व्ह करण्याची जबाबदारी रोबोट घेतात. पण तुम्हाला जाणून आनंद होईल की, आता तुम्हाला भारतात देखील रोबोट वेटर बघायला मिळणार आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे देशातील पहिले रोबोट रेस्टॉरंट उघडले आहे.

 

jagran.com

चेन्नईच्या महाबलीपुरम रोडवर बनलेल्या या रेस्टॉरंटचे नाव मोमो आहे, हे एक चायनीज रेस्टॉरंट असून येथे तुम्ही थाई आणि चायनीज पदार्थांना आस्वाद घेऊ शकता. हे एक रोबोट थीम रेस्टॉरंट आहे.

 

हे भलेही भारतातील पहिले रोबोट वेटर असणारे रेस्टॉरंट असेल पण जगात असे अनेक रेस्टॉरंट आहेत. मागे ऑस्ट्रेलिया येथील एका पिझ्झा कंपनीने होम डिलिव्हरी करिता रोबोट नियुक्त केल्याची बातमी आली होती. या रोबोट ने पहिला पिझ्झा हा ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे डिलिव्हर केला होता.

 

lifehacker.com.au

लीडार म्हणजेच लेजर बेस्ड सेन्सर टेक्नॉलॉजी, जी विना ड्रायव्हर चालणाऱ्या गाड्यांमध्ये असते, तीच टेक्नॉलॉजी या रोबोटमध्ये वापरण्यात आली आहे. ज्यामुळे ते गुगल मॅप आणि जीपीएसच्या मदतीने रस्त्यांना ओळखतात आणि गाड्यांपासून वाचत नेमक्या ठिकाणी पिझ्झा डिलिव्हर करतात. त्यासोबतच कोणी अनोळखी यांच्या जवळून पिझ्झा घेऊ शकत नाही, कारण ग्राहकाजवळ असणाऱ्या एका खास कोड ला एन्टर केल्यावरच ते पिझ्झा डिलिव्हर करतात.

 

newagebd.net

भारताआधी आशियाच्या काही देशांमध्ये देखील हे रोबोट वेटर रेस्टॉरंटमध्ये लोकांना सर्व्ह करताना दिसून येत आहेत. चीन च्या एका रेस्टॉरंटमध्ये रोबोट केवळ वेटर नाही तर कुक देखील आहे. तसेच सिंगापूरमध्ये देखील रोबोट वेटर रेस्टॉरंट आहेत. एवढच नाही तर पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये देखील असे रोबोट वेटर रेस्टॉरंट आहेत.

 

chinadaily.com.cn

माणसाने आज एवढी प्रगती केली आहे की, तो एका मशिनच्या म्हणजेच रोबोटच्या सहाय्याने हवे ते काम करवून घेऊ शकतो. येणाऱ्या काळात जर रस्त्यावर हे रोबोट फिरताना दिसले तर त्यात काही नवल नाही…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version