आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्राणीसंग्रहालय जिथे जंगली प्राणी म्हणजेच सिंह, वाघ, हत्ती, भालू इत्यादी प्राण्यांना पिंजऱ्यात कैद करून ठेवले जाते, जिथे आपण त्यांना बघायला जातो.
आज जगात अशी अनेक प्राणीसंग्रहालय आहेत. पण काय कधी तुम्ही माणसांचे प्राणीसंग्रहालय बघितले आहे? हा प्रश्नच मुळात चुकीचा वाटतो नाही का…
आज आपण या २१ व्या शतकात आधुनिक जगात जगत आहोत, जिथे आपण मानवी अधिकारांबद्दल बोलतो. मानवी हक्कांच्याबाबत आज आपण जेवढे जागरूक आहोत, काही काळा आधीपर्यंत तेवढे जागरूक नव्हतो, म्हणून तेव्हा कुणी स्वतःच्या हक्कांबाबत आवाज उठवत नसे. त्यामुळे ज्याच्याकडे सत्ता होती, ज्याच्याकडे शक्ती होती तो अशक्त लोकांवर राज्य करायचा.
१९ व्या शतकात अनेक अमानवीय घटना घडल्या, त्यातीलच एक म्हणजे ‘मानवी प्राणीसंग्रहालय’…
१९ व्या शतकात युरोपमध्ये असे अनेक प्राणीसंग्रहालय बनविण्यात आले होते. जिथे माणसांचा बंदी बनवून त्यांना प्रदर्शनी करिता ठेवले जायचे. हे किती अमानवीय असायचे हे तुम्हाला पुढील फोटोज वरून कळेलच…
आणि अश्याप्रकारे माणसांची प्रदर्शनी ठेवल्या जायची…
या आदिवासींचे हलाखीचे जीवन ह्या बघणाऱ्यांचा कुतूहलाचा विषय वाटतोय, नाही का?
या निग्रो आदिवासी आणि प्राण्यांत काहीच फरक नाही???
या २० वर्षीय मुलीला पॅरिसच्या मानवी प्राणीसंग्रहालयात आपल्या शरीराचे प्रदर्शन दाखविण्याकरिता ठेवण्यात आले होते.
हे एक संवेदनाहीन कृत्य आहे…
–
- प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर “ह्या” बायकांमध्ये पाळली जाणारी ही प्रथा ‘अमानवी’ आहे!
- विविध समाजांमध्ये ‘पौरुषत्व’ सिद्ध करण्याच्या या प्रथा तुमची झोप उडवतील
–
या महिलांना बंदी बनवून त्यांना अर्ध नग्नावस्थेत ठेवण्यात आले आहे, ज्यांच्यावर या सभ्य लोकांच्या नजरा आहेत.
जर्मनी आणि इग्लंड येथील प्राणीसंग्रहालयात लोकांच्या मनोरंजासाठी या बंदींना नाचावे लागायचे.
या चिमुकलीला बंदी बनवून तिला लोकांच्यासमोर प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे..
हा फोटो ‘ब्रोंक्स जू’चा आहे, जिथे एक आदिवासी चिंपांझीच्या बाळाला घेऊन आहे.
मानवी प्राणीसंग्रहालय हे माणसाच्या विकृतीचे सर्वात भयानक उदाहरण आहे.
या मानवी प्राणीसंग्रहालयांवर नंतर टीका होण्यास सुरवात झाली, ज्यानंतर मानवी अधिकाराच्या नव्या युगाची सुरुवात झाली. त्यानंतर या अमानवीय प्राणीसंग्रहालयांना नेहेमी करिता बंद करण्यात आले.
आपण हे सर्व पहिले ते होते १९व्या शतकातील फोटो. पण, लंडन प्राणिसंग्रहालयाने ऑगस्ट २००५ मध्ये मानवी प्राणीसंग्रहालयाचे प्रदर्शन सुरू केले.
झुलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनच्या वेबसाइटवर एका स्पर्धेद्वारे निवडलेले आठ स्वयंसेवक बेअर माउंटनवर केवळ अंजीरा च्या पानाने लज्जारक्षण करणारा पोशाख घालून यामध्ये सामील झाले.
२० ते २५ वयोगटातील हे स्त्री-पुरुष प्राणिसंग्रहालयात आल्यावर अनुभवी संरक्षक त्यांची काळजी घेत होते. खेळ, संगीत आणि कला यां प्रकारांनी त्यांचे मनोरंजन केले गेले, आणि दररोज दिवसाच्या शेवटी त्यांना घरी जाण्याची परवानगी होती.
मनुष्य हा देखील एक मूलभूत स्वरूपाचा प्राणी आहे, याचे प्रात्यक्षिक दाखविणे, असे या मानवी प्राणीसंग्रहालयाचे उद्दीष्ट आहे. यासोबतच मानव प्रजातीचा इतर प्राण्यांच्या राज्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची तपासणी करणे हे देखील यांचे उद्दिष्ट आहे.
—
- जिलेबी आणि दूध या भन्नाट कॉम्बिनेशनचे हे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
- ‘फूड’ नुसार बनतो तुमचा ‘मूड’! हे पदार्थ खा आणि आनंदी राहा…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.