Site icon InMarathi

‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण २१ व्या शतकात आहोत, जे एक आधुनिक युग आहे. आज आपण इंटरनेटच्या सहाय्याने हवी ती माहिती जाणून घेऊ शकतो. पण तरी देखील काही अश्या गोष्टी असतात ज्या आपल्या नजरेतून सुटून जातात. त्यातल्या काही गोष्टी या अशा देखील असतात ज्याचा आपण कधी विचारच करत नाही… आज आम्ही आपल्यासाठी काही अशाच गोष्टींची माहिती घेऊन आलो आहोत, ज्या वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्य व्यक्त कराल.

 

 

ताजमहाल आणि कुतुब मिनार यांची उंची सारखीच आहे. या दोन्ही वास्तूंची उंची ही ७३ मीटर आहे.

 

financialexpress.com

भारतातील आईआईटी-जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही भूतानच्या लोकसंख्येहून जास्त आहे. २०१२ च्या आकड्यांनुसार भूतानची लोकसंख्या ही ७,४२,७३७ आहे.

 

firstpost.com

आपल्या मुंबईत लोकल मध्ये रोज प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ८० लाखाहून जास्त आहे, जी न्युजीलंडच्या लोकसंख्येहून जवळपास दुप्पट आहे. २०१३ च्या जनगणनेनुसार न्युजीलंडची लोकसंख्या ४२,४२,०४८ एवढी आहे.

 

thebetterindia.com

समोसा जो भारतातील सर्वात आवडता पदार्थ आहे, तो भारताचा नाहीच. समोस्याचा शोध भारतात नाही लागला, काही इतिहासकारांच्या मते दहाव्या शतकात मध्य आशियामध्ये समोस्याचा शोध लागला. १३-१४ व्या शतकात व्यापारींच्या माध्यमातून समोसा भारतात आला.

 

wikipedia.org

जगभरात ग्लोबल वार्मिंग, ग्लेशियर वितळणे आणि समुद्राची पटली वाढणे यावर चर्चा होत असताना, माउंट एवरेस्टची उंची दरवर्षी वाढत चालली आहे. वैज्ञानिक सर्वेक्षणानुसार दरवर्षी २ सेंटीमीटरच्या हिशोबाने याची उंची वाढत आहे.

 

ndtv.com

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा अनुष्का शर्मा -४ वर्ष, दीपिका पडुकोण -६, कटरीना कैफ – ८ वर्षांच्या होत्या.

 

wittyfeed.com

आपण सर्वे रोजच ट्विटरवरील ट्विट बघत असतो, पण काय तुम्हाला या ट्विटरच्या लोगोवर दिसणाऱ्या पक्ष्याबद्दल माहित आहे. ट्विटर जो पक्षी आपल्याला दिसतो त्याच नाव लैरी आहे.

 

eatthis.com

कधी विचार केला आहे की, केळी ही वाकडी का असतात? कारण केळ हा सूर्याच्या दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने वाढतो म्हणून तो वाकडा असतो.

 

wittyfeed.com

१९८२ साली आलेला चित्रपट गांधी यात मोहनदास करमचंद गांधी यांची भूमिका निभावणारे बेन किंग्सले यांचा जन्म भलेही इंग्लंडमध्ये झाला असेल पण ते मुळात गुजराती होते. त्यांच्या वडिलांचा जन्म केनिया मध्ये झाला पण ते गुजराती होते, तर किंग्सले याचं जन्मनाव कृष्ण पंडित भांजी आहे.

तर मग कसं वाटलं ही माहिती वाचून, वरील बाबी कदाचितच तुम्हाला माहिती असतील. जर अश्या आणखी काही गोष्टी तुम्हाला माहित असतील तर त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version