' तुघलकी फर्मान’ ही म्हण प्रचलित होण्यामागचा रंजक इतिहास तुम्हाला वाचलाच पाहिजे! – InMarathi

तुघलकी फर्मान’ ही म्हण प्रचलित होण्यामागचा रंजक इतिहास तुम्हाला वाचलाच पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राजा म्हणजेच प्रजेचा पालनकर्ता, त्यांचा सांभाळ करणारा त्यांच्यासाठी सुख समृद्धी आणणारा. जेव्हा आपल्या देशात लोकशाही नाही तर राजेशाही होती, तेव्हा अनेक असे राजे होऊन गेले ज्यांनी आपल्या प्रजेच्या हितासाठी कार्य केले तर काही असेही राजे होते ज्यांनी प्रजेचा नाही तर केवळ स्वतःचा स्वार्थ बघितला.

या वाईट आणि निर्दयी राजांमध्ये पहिले नावं येते ते मुहम्मद बिन तुघलक  याचे. आजवर जेवढे राजा दिल्लीच्या गादीवर बसले त्यापैकी तुघलक हा सर्वात हुशार होता. पण त्याच्या शासनकाळात काही अशे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे त्याला इतिहासातील सर्वात मूर्ख राजा समजल्या गेले.

 

tughlaq InMarathi

१४ व्या शतकात दिल्लीवर २६ वर्षे अधिराज्य जागवणाऱ्या मुहम्मद बिन तुघलक याला केवळ त्याच्या शासनाकरिता नाही तर त्याच्या चुकीच्या निर्णयाकरिता ओळखले जाते. आजही जर नेत्यांनी कुठलाही निर्णय किंवा कायदा अचानकपणे कसलाही विचार न करता लागू केला तर त्याला ‘तुघलकी फर्मान’ सांगत त्याचा निषेध केला जातो.

 ‘तुघलकी फर्मान’ ही म्हणं मोहम्मद बिन तुघलकच्याचं मूर्ख निर्णयांमुळेच प्रचलित झाली.

 

tughlak 1 InMarathi

तुघलक राजवंशचे संस्थापक गयासुद्दिन तुघलक यांचा मुलगा उलगू खां उर्फ जौना खां हाच पुढे जाऊन मुहम्मद बिन तुघलकच्या नावाने ओळखल्या गेला. गयासुद्दिनच्या मृत्यू नंतर मुहम्मद बिन तुघलक  याने १३२५ ते १३५१ पर्यंत दिल्लीवर राज्य केले.

मुहम्मद बिन तुघलकला फारसी आणि अरबी भाषांचे ज्ञान अवगत होते. गणित, खगोलशास्त्र, भविष्य, तर्कशास्त्र इत्यादी विषयांत देखील तो निपुण होता. त्याने दानधर्म देखील केले. त्या काळातील तो पहिला असा सुलतान होता जो हिंदूंच्या होळी आणि दिवाळी सारख्या सणांमध्ये सहभाग घ्यायचा. त्यासोबतच तो एक कुशल योद्धा देखील होता. पण एवढे गुण असून देखील त्याने काही असे निर्णय घेतले ज्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागले.

 

tughlaq coin InMarathi

तुघलकला माहित होते की, त्याच्या जवळ सोन्या-चांदीहून जास्त तांबा आणि पितळ आहे. त्यामुळे त्याने दोकाना नावाची मुद्रा चलनात आणली. ही मुद्रा तांबा आणि पितळ यांपासून बनलेली होती. ज्यानंतर लोकांच्या हाती पैसा यायला लागला, आवश्यकतेपेक्षा जास्त शिक्के बाजारात चलनात आले. याचा परिमाण म्हणजे महागाईचा स्तर अचानक वाढून गेला.

 

tughlaq coin 1 InMarathi

 

जेव्हा याचे परिमाण तुघलकच्या लक्षात आले तेव्हा त्याने नवीन शिक्के बंद करून जुने शिक्के चलनात आणले आणि अशी घोषणा केली की, तांबा-पितळच्या खऱ्या शिक्क्यां एवजी त्याचं किमतीचे सोने-चांदीचे शिक्के देण्यात येईल. मग काय लोकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणत फायदा उचलला आणि याच्या परिणाम स्वरूप राजाच्या खजिन्यातील सर्व सोने-चांदीचे शिक्के संपायला आले.

या एका निर्णयामुळे मुहम्मद बिन तुघलक याला इतिहासातील सर्वात मूर्ख शासक म्हणून घोषित करण्यात आले.

 

Daulatabad_fort_InMarathi
 

मंगोलच्या सेनेच्या वारंवार हल्ल्याने तुगलक त्रासला होता, त्यामुळे त्याने त्याची राजधानी दिल्लीहून दक्षिणमध्ये दौलताबाद किल्ल्यावर स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा आणखी एक मूर्खपणा होता. त्याला दक्षिणचे वातावरण खूप आकर्षक वाटायचे. त्यामुळे त्याने तात्काळ आपल्या संपूर्ण प्रजेसह देवगिरीकडे प्रस्थान केले.

 

tughlak 2 InMarathi

पण त्या किल्ल्याच्या आसपासच्या क्षेत्रात पाण्याची कमी होती, त्यामुळे त्याला दिल्ली जास्त सोयीस्कर वाटली. म्हणून त्याने परत दिल्लीला राजधानी बनवले आणि आपल्या प्रजेसह दिल्लीला परतला. ४० दिवसांत ७०० मैल एवढा प्रवास केलेल्या जनतेची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. या प्रवासादरम्यान अनेकांचे आरोग्य बिघडले तर काही मरण पावले.

त्याकाळी तुघलक ने काढलेल्या फतवा चुकीचा असूनही कोणी त्याला विरोध करू शकत नव्हते, म्हणून त्याने लागू केलेले निर्णय म्हणजेच ‘तुघलकी फर्मान’ हा सर्वांना मान्य करावा लागत होता.

या दोन अश्या घटना आहेत ज्या मोहम्मद बिन तुगलकला एक मूर्ख शासक म्हणून सिद्ध करतात. अशा अनेक घटना आहेत ज्यामुळे मोहम्मद बिन तुगलक याला मूर्ख शासक म्हटल्या जाऊ लागले.

प्रसिद्ध इतिहासकार – डॉ. ईश्वरी प्रसाद यांनी तुगलक बद्दल सांगितले होते की,

मध्य युगातील सर्वात विद्वान, सुसंस्कृत शासक एकच होता, तो म्हणजे तुगलक!

तर इतिहासकार बदायुं यांनी तुगलकच्या मृत्यूवर टीका करत म्हटले होते की,

आणि याचं प्रकारे सुलतानची प्रजेपासून आणि प्रजेची सुलतानपासून सुटका झाली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?