Site icon InMarathi

अंबानीचं घर, सोन्याचा यॉट – जगातील ह्या ७ महागड्या गोष्टी बघून तुम्ही चक्रावून जाल!

most expesnive things inmarathi

feedpulp.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सामान्य माणूस हा त्याला जेवढे झेपत आहे, तेवढ्याच पैशाच्या वस्तू खरेदी करतो.

उगाचच वायफळ खर्च करणे त्याला आवडत नाही आणि ते बरोबर देखील आहे, कारण त्याला माहित आहे की, जास्त किंमतीच्या वस्तू खरेदी करणे त्याच्या खिशाला परवडण्यासारख्या नाही.

त्यामुळे तो त्याचा विचार सोडून देतो.

पण श्रीमंत लोकांचे तसे नसते, त्यांच्यामध्ये महागड्या वस्तू खरेदी करण्याची जणू स्पर्धाचं सुरू असते.

आपल्या ओळखीच्या माणसाने एखादी महागडी वस्तू घेतली की, ते त्याच्याहून महागडी वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वस्तू श्रीमंत माणसाला देखील परवडेल असे नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्या एखाद्या श्रीमंत माणसाला खरेदी करताना देखील विचार करावा लागेल.

चला तर मग जाणून घेऊया, या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कितीला विकल्या गेल्या…

१. Huia पक्षाचे पंख

 

designbump.com

 

एखाद्या पक्ष्याचा पंख तुम्ही जास्तीत जास्त कितीला खरेदी कराल ? कुणी वेडा असेल, तर यासाठी १००० रुपये देखील देईल.

पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, Huia नावाचा या पक्षाचा पंख १०००० डॉलर्सना म्हणजेच जवळपास ६,५१,६४४ रुपयांना विकला गेला.

हा एक विलुप्त झालेल्या पक्षाचा पंख आहे.

 

२. Rhein II (फोटो)

 

pinterest.com

 

हा सामान्य दिसणारा फोटो, काही सामान्य नाही आहे. Rhein II नावाच्या या फोटोला जर्मन व्हिज्युअल आर्टिस्ट Andreas Gursky याने टिपले होते.

२०११ मध्ये या फोटोचा लिलाव झाला, तेव्हा या फोटोची किंमत ४.३ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २८,०१,४९,७३० लावण्यात आली होती.

 

३. डेड शार्क

 

npr.org

 

डेड शार्क हा एक प्रकारचा आर्टपीस आहे, ज्याला १९९१ मध्ये इंग्लिश आर्टिस्ट डॅमियन हर्स्टने बनवले होते.

या आर्टला एका श्रीमंत माणसाद्वारे १२ मिलियन डॉलर्सना म्हणजेच जवळपास ७८,२०,४३,६०० रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.

 

४. १९६३ ची फेरारी GTO

 

cargurus.com

 

ज्या वस्तूंकडे सामान्य लोक जुन्या म्हणून दुर्लक्ष करतात. त्याच वस्तूंना श्रीमंत लोक व्हिंटेज म्हणून आपल्याकडे संग्रहित करण्याचा प्रयत्न करतात.

अशीच एक १९६३ ची व्हिंटेज कार फेरारी GTO ला ५२ मिलियन डॉलर्सना म्हणजेच जवळपास ३,३८,८८,५५,६०० रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.

 

५. द कार्ड प्लेयर्स (छायाचित्र)

 

roodnoot.nl

 

हे छायाचित्र खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का?

की हे छायाचित्र तब्बल २७५ मिलियन डॉलर्सना म्हणजेच जवळपास १७,९१,९३,५७,५०० रुपयांना खरेदी करण्यात आली होती.

आता हे छायाचित्र खरचं एवढ्या मोठ्या किंमतीला विकले गेले पाहिजे होते का ? हे तुम्हीच ठरवा.

 

६. अँटिलिया (मुकेश अंबानीचे घर)

 

zricks.com Blog

 

जियो चे मालक आणि रिलायन्स इंडस्ट्री चे मालक मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही? आणि त्यांचा Antilia नावाचा बंगला सुद्धा खूप प्रसिद्ध आहे!

यासाठी मुकेश अंबानी यांनी खर्च केलेली रक्कम आणि त्यातल्या सोयी – सुविधा पाहून तुमचे डोळे पांढरे पडतील!

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानीच्या या घराची किंमत १ बिलियन म्हणजेच जवळपास ६५,१५,५५,००,००० रुपये एवढी आहे.

या घराची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या घरात ६०० फुल टाईम स्टाफ मेम्बर्स काम करतात.

 

७. द हिस्ट्री सुप्रीम यॉट (शिप)

 

thesun.co.uk

 

मुकेश अंबानीच्या घरापेक्षा देखील महाग ही शिप एका मलेशियन व्यावसायिकाची आहे.

सोने आणि प्लॅटिनमने बनलेल्या या शिपची किंमत ४.५ बिलियन म्हणजेच जवळपास २,९३,१६,९६,००,००० एवढी गडगंज आहे.

अशा या वस्तू खूपच महागड्या आहेत आणि एखाद्या माणसाला खरेदी करताना विचार करायला लावणाऱ्या आहेत, तरीही त्या एवढ्या किंमतीला विकल्या गेल्या.

निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत, आपल्या महिन्याच्या हिशोबत काही हजारांचा गोंधळ झाला तरी आपलं गणित बिघडतं!

तिथे या अशा महागड्या गोष्टी घ्यायचा विचार आपण स्वप्नात सुद्धा करू शकत नाही! पण या काही गडगंज पैसा असलेल्या माणसांनी या गोष्टी विकत घेऊन एक वेगळाच इतिहास रचला आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version