आरोग्यासाठी जादूच्या छडीसारखे असलेले या फळाचे फायदे क्वचितच कुणाला माहीत असतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – डॉ प्राजक्ता जोशी
—
शिंगाडा खायचा म्हटला की अनेकजण नाकं मुरडतात.
हा बेचव पदार्थ कशासाठी खायचा, त्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग आणि टेस्टी खाऊ असं म्हणणा-यांची संख्या काही कमी नाही.
घराघरातील मोठ्या माणसांकडून शिंगाडा खाण्याचा आग्रह धरला जातो, त्याच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात.
मात्र ते नाकारत, शिंगाड्याक़डे पाठ फिरविणारेच जास्त दिसतात.
मात्र शिंगाड्यांचे शरिराला होणारे फायदे पाहिले, की यांचं महत्व तुम्हाला नक्की पटेल.
थोडं शिंगाड्याबद्दल…
ऊपवासाला वापरले जाणारी भारतातील आणखी एक वनस्पती म्हणजे “शिंगाडा”. ईंग्रजीत याला “water chestnut” असे नाव आहे.
पोषणमुल्ये :
Carbs-23.9mg
Suger-4.8mg
Fiber-3mg
Fat-0.1mg
Protein-1.4mg
Vitamins in percentage – B1-12%, B2-17%, B3 7%, B5-10%, B6-25%, B9-4%, Vitc-5%, Vit E-8%
Minerals- Magnessium-6%, Magnese-16%, Phospherous-9%, Potassium-5%
- भरपुर पोषणमुल्ये,कमी calories आणि low fat असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.
- जीवनसत्व भरपुर असल्याने detoxificationमध्ये मदत करते. त्यामुळे काविळ झाल्यास सिंगाडा खावा.
- सिंगाड्यातील mineralsही thyroid glandsच्या कार्याचे नियमन करतात. त्यामुळे thyroidism (hypo/hyper)च्या रूग्णांनी तो अवश्य खावा.
Antioxidants भरपुर असल्याने सिंगाड्यात antiviral व antibacterial properties असतात.
तसेच यातील काही antioxidants जठर (stomach) व प्लिहा (spleen) यांची कार्यक्षमता वाढवतात.
तसेच antioxidentsमुळे त्वचा व केस यांचे आरोग्य राखल्या जाते.
वजन वाढवण्यास मदत करतो.
यातील potassiumच्या योग्य मात्रेने मांसपेशी (muscles) व मज्जासंस्थे ची कार्यक्षमता वाढते.
energyचा ऊत्तम स्त्रोत असल्याने अतिकष्टाची कामे, व्यायाम, खेळ करणाऱ्या व्यक्तीसाठी ऊत्तमआहार आहे.
आता आयुर्वेदीय दृष्टीकोन पाहुया –
आयुर्वेदात शिंगाडा याला अत्यंत महत्वाचे मानल्या जात असुन याला “शृंगाटक” असे संस्कृत नाव आहे.
===
- आयुष्यात टेन्शन जाणवतंय?, फ्रस्ट्रेशनही वाढलंय? मग ही फळ ठरतील रामबाण उपाय
- किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री
===
पित्तदोषाचे शमन व पौरूष शक्तीचे वर्धन ही त्याची महत्वाची कार्ये सांगितली आहेत.
- मुत्राल्पता (dysuria),अतिमुत्रता (polyuria) अशा व्याधीत ऊपयुक्त आहे.
- शोथ (सुज) (inflamation) कमी करण्यास मदत करते. रक्तस्त्रावजन्य व्याधी (bleeding disorders) मध्ये ऊपयुक्त ठरते.
- पित्तशामक व ऊष्णतेचे शमन करणारे असल्याने डोळ्याची जळजळ, तळव्यांची आग होणे, अशी लक्षणे दिसल्यास सिंगाड्याचे सेवन करावे.
- तसेच ऊन्हाळ्यातही सिंगाडा अवश्य खावा.
- यातील vitamins व minerals चे प्रमाण पाहता गरोदर महिलेने शिंगाडा अवश्य खावा.
- आयुर्वेदाने (threatened abortion) गर्भपात वारंवार होत असेल तर शिंगाडा ऊपयुक्त सांगितला आहे.
- दाह कमी करण्याचे कार्य सिंगाडा करतो.
- ग्राही हा गुण सांगितला असुन त्यामळे indigestion, irritable bowel syndrome मध्ये ऊपयुक्त ठरतो .
बर्याच आयुर्वेदीक कल्पांमध्ये सिंगाडा समाविष्ठ असतो. ऊदा. अमृतप्राश घृत, सौभाग्यशुन्ठी
तर असा हा शिंगाडा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे याचा आपल्या आहारात नक्की समावेश करावा..
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.