Site icon InMarathi

पाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; जगातल्या या अनोख्या घरांचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल!

Unique-Houses.Inmarathi3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

कोणतेही घर हे तिथे राहणाऱ्याचे आणि त्याला बनवणाऱ्याचे एक सुंदर स्वप्न असते. जे त्याने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलेला असतो. घर लहान असो वा मोठे प्रत्येकाला आपले घर प्रिय असते आणि ते अजून सुंदर बनवण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य तो प्रयत्न करत असतो.

याच प्रयत्नामध्ये काही लोकांनी आपल्या क्रिएटीव्हीटीने आपल्या घराला एवढे सुंदर बनवले आहे की, त्यांचे घर आज जगातील सर्वात सुंदर आणि वेगळ्या घरांमध्ये येते.

आज आम्ही तुम्हाला काही अशा घरांबद्दल सांगणार आहोत, जे खूपच वेगळे आहेत. यातील कुठलं घर झऱ्यावर बनवले गेले आहे, तर कुठलं १ स्क्वेअर फुटमध्ये बांधलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया, या वेगळ्या घरांबद्दल..

१. द ब्रोंस हाऊस, स्कॉटलंड

 

हे घर पाण्यामध्ये बनलेले आहे आणि हे खूपच सुंदर आहे. पाण्याच्या मधोमध आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला कोणाला का नाही आवडणार. पण येथे राहण्यासाठी तेवढ्याच हिंमतीची पण गरज आहे.

२. स्टीव्ह अॅरीनचे घर, थायलंड

 

हे जगातील सर्वात लहान घर आहे. या घराला बर्लिनच्या आर्किटेक्ट Van Bo Le-Mentzel ने बनवले आहे. १ स्क्वेअर फूटच्या या घरामध्ये दरवाजा, खिडकी, खुर्ची यांसारख्या वस्तू देखील आहेत. ४० किलोच्या या घराला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी चाके देखील लावण्यात आलेली आहेत.

३. फॉलिंग वॉटर, पेनसिल्व्हेनिया (यूएसए)

 

architecturaldigest.in

अमेरिकन आर्किटेक्ट फ्रॅंक लॉईड राईटद्वारे हे घर १९३५ मध्ये बनवले गेले होते. हिरवळ आणि निसर्गातील वस्तू आवडणाऱ्या लोकांना हे घर नक्कीच आवडेल. हे घर खूपच सुंदर आहे.

४. स्नोबोर्डर्सच्या इको हाऊस

 

माईक बेसिचं एक उत्कृष्ट स्नोबोर्डर आहे, त्याने एका पर्वतावर २३ चौरस मीटरचे एक लहान घर बांधले आहे. यामध्ये त्याने लक्झरी सुविधा देखील ठेवल्या आहेत. त्याने हे घर फक्त इको सामुग्रीने बनवले आहे. तसेच, त्याने ऊब आणि लाईट सोलर सेल्सचा वापर करून मिळवले आहे. आता त्याने, त्याच्या मित्रासोबत मिळून प्रवासासाठी एका ट्रकमध्येच घर तयार केले आहे.

५. अपसाईड – डाऊन हाऊस, फेंग्जिंग Ancient Town

 

pinimg.com

चीनच्या शांघाईबरोबरच कितीतरी देशांमध्ये अपसाईड – डाऊन हाऊस बनवले गेले आहेत. पाहताना भलेही हे घर उलटे दिसत असले, तरीदेखील या घरातील नजरा पाहून तुम्ही नक्कीच येथे सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त कराल. या घरातील इंटीरीयर देखील पूर्णपणे उलटे आहे. येथे सोफा, पलंग, खुर्च्या सर्व सिलिंगला चिपकलेले आहे.

६. वॉकिंग हाऊस

 

n55.dk

वॉकिंग हाऊस हे दोन क्रिएटीव्ह कंपन्यांद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. N55 आणि Wysing Arts Centre या कंपनीनी हे जवळपास १२०० किलो वजन असलेले घर बनवले आहे. या घराचा चालण्याचा वेग ताशी ३७ मैल एवढा आहे. विंडमिल्स आणि सोलर सेल्स या घराला उर्जा पुरवतात.

७. एक्स्परी एग हाऊस

 

hiconsumption.com

या चित्रात दिसणाऱ्या या सुंदर अंडाकृती घराची लांबी फक्त ६ मीटर आणि रुंदी फक्त २.८ मीटर आहे. हे घर पाण्यावर तरंगू शकते, त्यामुळे या घराच्या मदतीने तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहू शकता.

अशी ही घरे खूपच वेगळी आणि सुंदर आहेत. अशा प्रकारच्या घरामध्ये राहण्याची इच्छा तर आपल्यातील बहुतेक लोकांची असेलच. मग आपलेही घर काहीतरी वेगळ्याप्रकारे सजवण्याचा प्रयत्न करा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version