Site icon InMarathi

जीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधण्याची पद्धत जाणून घ्या…

gps 2 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी जात असलो आणि आपल्याला तिथे कसे जायचे हे माहित नसेल, तर त्यावेळी आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य मार्ग जीपीएसच्या आधारे ठरवतो.

जीपीएस तंत्रज्ञान हे एखादे ठिकाण शोधण्यासाठी खूपच लाभदायक आहे, लहानातील लहान रस्ता देखील आपण जीपीएसच्या मदतीने शोधू शकतो. त्यामुळे जीपीएसने लहानसहान मार्ग शोधणे आता खूपच सोपे झाले आहे.

 

 

आपण जेव्हा कधी एखादे नवीन अॅप डाऊनलोड करतो किंवा कोणाशी लोकेशन शेअरिंग करण्यास सांगतो, तेव्हा जीपीएस म्हणजेच Global Positioning System चा वापर करतो.

जीपीएसला चालू केल्यावर आपण तेव्हा कुठे आहात, हे समजू शकते. जीपीएस टेक्नोलॉजी खूपच फायद्याची आहे आणि आपले काम सोपे करते, यात काही शंका नाही. पण तुमची लोकेशन तुमच्या मर्जीशिवाय एखाद्याला कळणे, हे खूपच धोकादायक आहे.

 

 

अर्थातच, तुम्ही विचार कराल की, असे असेल तर काम झाल्यानंतर जीपीएस बंद करून टाकायचा. पण सध्याच प्रिंसटोन विद्यापीठातील काही संशोधकांनी हे दाखवून दिले आहे की, तुम्ही आपल्या स्मार्टफोनमधील जीपीएस बंद केल्यानंतर देखील तुमची लोकेशन ट्रेस केली जाऊ शकते.

 

 

या संशोधकांनी एक असे अॅप डिझाईन करून दाखवले आहे, जे बेसिक सेन्सरमधून डेटा काढते. मग भलेही तुमचे जीपीएस बंद असो, हे अॅप तुमचे लोकेशन ट्रॅक करण्याची क्षमता ठेवते.

हा डेटा Accelerometer, Magnetometer आणि Barometer यांसारख्या अॅपमधून मिळतो. ज्यांना तुमची लोकेशन अॅक्सेस करण्याची वेगळी परवानगी घ्यावी लागते.

याचबरोबर, तुमच्या डिव्हाइसचा आय पी अॅड्रेस, टाईम झोन आणि मोबईल डेटा किंवा वाय – फाय, तुम्ही ज्याचा वापार करत आहात त्या सर्वांच्या मदतीने तुमचे लोकेशन शोधणे शक्य आहे.

 

 

सेन्सरमधून मिळणाऱ्या डेट्याने हा अंदाज लावता येतो की, तुम्ही पायी चालत आहात, गाडी चालवत आहात की विमानामध्ये आहात, हा अंदाज तुमच्या स्पीडने लावता येतो.

त्यानंतर Barometer च्या सहाय्याने उंची आणि Magnetometer च्या मदतीने तुमच्या दिशेची माहिती मिळवता येते. या सर्व Algorithmsच्यानुसार, Intersecting Data Points च्या आधारावर तुमची लोकेशन ट्रेस करणे खूपच सोपे आहे.

 

 

या संशोधकांची शोध तर कौतुकास्पद आहे, पण आपल्यासाठी एक प्रकारची चेतावणी आहे. यापासून वाचण्यासाठी काही भक्कम असा उपाय तर नाही आहे, पण आपल्याकडून जेवढी योग्य ती काळजी घेता येईल, तेवढेच चांगले आहे.

त्यामुळे यापुढे कोणतेही अॅप किंवा गेम हे योग्य त्या सोर्समधूनच डाऊनलोड करा. कोणत्याही सोर्सेसमधून काहीही डाऊनलोड करू नका आणि एखाद्या अॅपला आपले लोकेशन अॅक्सेस करण्याची परवानगी देण्याआधी नक्की विचार करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version