देशासाठी १८ व्या वर्षी शहीद झालेल्या युवा क्रांतिकारकाची अज्ञात कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
असं म्हणतात की, चरख्याने स्वातंत्र्य मिळवून दिले! काही अंशी हे खरं असलं तरी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक लोकांनी त्यांचं रक्त सांडलं आहे!
गांधीजींच्या अहिंसेने देशाला एक वेगळी दिशा मिळाली हे नक्कीच, पण आज ज्या क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्यांचा सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे!
स्वतंत्रता सेनानींची जेंव्हा – केंव्हा गोष्ट होते तेव्हा आपल्या ओठांवर सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, चंद्रशेखर आजाद, रानी लक्ष्मीबाई इत्यादी क्रांतीकारकांचीच नवे येतात.
पण आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
त्यापैकीच एक म्हणजे खुदिराम बोस जे वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी शहीद झाले. चला तर मग जाणून घेऊ या वीर शहीदाची कहाणी…
खुदिराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ साली पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावात झाला होता.
खुदिराम यांच्या मनात लहानपणीपासूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा रुजलेली होती. ते त्यांचे शिक्षण सोडून स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले. यानंतर बोस रिव्हॉल्यूशनरी पार्टीत सहभागी झाले.
१९०५ मध्ये बंगालच्या विभाजनाच्या मुद्द्याला धरून ‘बंग भंग’ आंदोलन सुरु होते. खुदिराम बोस या आंदोलनात सामील झाले तेव्हा ते केवळ १५-१६ वर्षांचे होते.
१९०५ साली जेव्हा लॉर्ड कर्जन याने बंगालचे विभाजन केले तेव्हा त्या विरोधात अनेक भारतीय रस्त्यावर उतरले.
ज्यांना तेव्हाचे कोलकाता मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांने अतिशय क्रूर शिक्षा दिली. त्याने क्रांतीकारकांवर देखील खूप अत्याचार केले.
त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्याला पदोन्नती देऊन मुजफ्फर पूर येथील सत्र न्यायाधीशाचे पद देण्यात आले.
‘युगांतर’ समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड याला मारण्याच्या निश्चय करण्यात आला. या कामासाठी खुदिराम बोस आणि प्रफ्फुल चंद चाकी यांची निवड करण्यात आली.
बोस यांना एक बॉम्ब आणि एक पिस्तुल तर चाकी यांना देखील एक पिस्तुल देण्यात आली.
ज्यानंतर या दोघांनी मुजफ्फरपूर येथे येऊन किंग्जफोर्डच्या बंगल्यावर लक्ष ठेवले, त्यांची बग्गी आणि घोडा कुठल्या रंगाचा आहे हे देखील त्यांनी बघितले होते.
३० एप्रिल १९०८ ला हे दोघेही किंग्जफोर्डला मारण्याकरिता त्याच्या बंगल्याच्या बाहेर त्याच्या बग्गीची वाट बघत बसले होते. रात्री किंग्जफोर्डच्या ब्ग्गीसारखी दिसणारी गाडी त्यांना येताना दिसली.
ज्यानंतर खुदिराम यांनी त्या गाडीचा पाठलाग केला.
===
- कोवळ्या वयात ब्रिटिशांच्या तावडीत सापडलेली, स्वातंत्र्यासाठी १४ वर्ष तुरुंगवास भोगणारी अज्ञात राणी
- जर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता!
===
रस्त्यात अंधार होता, गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्याच्या बाहेर येताच खुदिरामने अंधारातच त्या बग्गीवर बॉम्ब टाकला.
भारतात या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज तीन मैल पर्यंत गाजला. या घटनेने ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले.
पण खुदिरामने किंग्जफोर्डची गाडी समजून ज्या बग्गीवर हल्ला केला त्यात तो नसून एका ब्रिटीश अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलं होते. ज्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर खुदिराम बोस यांना मुजफ्फरपूर तुरुंगात फाशी देण्यात आली.
खुदिराम याला फाशी देणाऱ्या मॅजिस्ट्रेटने स्वतः सांगितले होते की, खुदिराम निर्भीडपणे फाशीला कवटाळला. या वेळी खुदिराम केवळ १८ वर्षांचे होते.
खुदिराम शहीद झाल्यानंतर अनेक दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. एवढंच नाही तर त्यांच्या सन्मानार्थ लोकं अशी धोती घालायला लागले ज्याच्या एका बाजूने खुदिराम लिहिलेले होते.
असा हा वीर वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी फाशीवर चढला..
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.