Site icon InMarathi

शाहजहानची शेवटची इच्छा असलेला “काळा ताजमहाल” का नाही बनू शकला? जाणून घ्या

black-tajmahal-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतातील आग्रा येथील ताज महाल हा जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनविलेली ही वास्तू जगातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक मानली जाते. ताजमहाल हा बादशाह शहाजहान याने आपल्या पत्नीच्या आठवणीत बनवला होता.

पण तुम्हाला शहाजहानच्या काळ्या संगमरवर दगडाच्या ताजमहाला बाबत माहित आहे का?

 

 

आज आम्ही तुम्हाला त्याच काळ्या ताजमहालाबाबत सांगणार आहोत ज्याला शहाजहानच्या मुलाने म्हणजेच औरंगजेबने कधी अस्तित्वात येऊ दिले नाही. ते केवळ एक कल्पनाच बनून राहिले.

 

 

मुगल बादशाह शाहजहान यांच्या वसीयतनुसार काळ्या संगमरवर दगडांनी बनवलेला एक काल्पनिक मकबरा – ज्याला काळ्या ताजमहालाच्या नावाने ओळखले जाते.

हा महाल यमुना नदीच्या दुसऱ्या बाजूने ताजमहालाच्या मागे बनविण्यात येणार होता, असे सांगितले जाते.

 

 

सर्वांना हे माहितीच आहे की औरंगजेब याचा स्वभाव अतिशय क्रूर आणि तेवढाच चतुर होता. स्वभावानुसार त्याने आपल्या वडिलांची शेवटची इच्छा देखील पूर्ण केली नाही.

२२ जानेवारी १६६६ ला शहाजहान यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर त्यांच्या पार्थिवाला कुठे पुरण्यात यावे याचा विचार सुरु होता.

‘ताजमहाल’ पुस्तकानुसार शहाजहान यांनी त्यांच्या वसीयतमध्ये लिहिले होते की, “त्यांना ताजच्या मागे मेहताब बागेत पुरण्यात यावे.”

वसीयत आणि शाही परंपरेनुसार औरंगजेब याला ताजच्या मागे आणखी एका इमारतीचा निर्माण करायचा होता. त्यासोबतच तो मकबरा त्याच्या आईच्या मकबऱ्याहून कमी असयला नको हेही बघायचे होते.

पण औरंगजेबला त्याच्या वडिलांच्या वसीयतनुसार काहीही करण्याची इच्छा नव्हती.

 

 

शत्रूंच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शाही खजिना संपत चालला होता. त्यामुळे औरंगजेबने वसीयत पासून वाचण्याकरिता एक शक्कल लढवली.

औरंगजेब ला मकबरा वगैरे बनवणे हा उगाचचा खर्च वाटायचा. यावर त्याने इस्लामिक कायद्यानांना समोर ठेवत शाही सल्लागारांची मदत मागितली, त्याने सांगितले की –

जर कुठला पिता अशी कुठली वसीयत बनवत असेल जी इस्लाममध्ये चुकीची असेल तर त्याला मानावे काय…?

 

 

सल्लागारांनी यावर सल्ला देत सांगितले की, ही वसीयत चुकीची आहे. त्यानंतर औरंगजेबाने मुमताज महलच्या कब्रच्या शेजारी शाहजहानची कब्र बांधली. आता ताजमहालात दोन कब्र आहेत. त्यामुळे काळा ताजमहाल हा केवळ एक कल्पना म्हणूनच राहिला…

काही लोक या घटनेला काल्पनिक मानतात तर काहींना ही खरी वाटते.

पण जर खरंच आज काळा ताजमहाल असता तर ताजमहाल प्रमाणे त्याने देखील देशाचे वैभव वाढवले असते एवढं मात्र नक्की…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version