Site icon InMarathi

कमी पैश्यात भारत बघायचा आहे? तर ही ‘बॅकपॅकर्स हॉस्टेल्स’ तुमच्यासाठीच आहेत

backpackers-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतातील कान्याकोपऱ्यामध्ये फिरायला जाण्याची इच्छा तर आपल्या सर्वांची असते. भारतामधल्या विविध ठिकाणी भेट देऊन तेथील भाषा आणि संस्कृतीची माहिती घेण्यास आपण उत्सुक असतो. संपूर्ण जग तर फिरणे शक्य नाही, पण किमान आपला भारत देश तरी पूर्ण फिरावा, अशी आपली इच्छा असते. पण यासाठी प्रवास खर्च जरी परवडत असला, तरीदेखील प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च आपल्याला परवडणारा नसतो. त्यामुळे तुमची भारत भ्रमंतीची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आज आम्ही तुम्हाला हॉटेल्सला पर्याय असलेल्या काही शानदार हॉस्टेलविषयी सांगणार आहोत, जिथे तुम्ही खूप कमी पैशामध्ये राहू शकता. तसेच, येथे तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये राहिल्या सारखाच अनुभव येईल.

१. ड्रीम हॉस्टेल, गोवा

 

 

गोव्यामधील बहुतेक हॉस्टेल्स हे पार्टी आणि मज्जा करणाऱ्या बॅकपॅकर्सना लक्षात ठेवून बनवले गेले आहेत. पण हे एक असे हॉस्टेल आहे, जे तुम्हाला शांत वातावरण देते. जर तुम्ही शहरातील गोंगाटापासून लांब काही दिवस शांत वातावरणामध्ये घालवू इच्छित असाल, तर ड्रीम हॉस्टेलपेक्षा दुसरे कुठलेही योग्य ठिकाण नाही. येथून तुम्ही Vagator बीचचा आनंद देखील घेऊ शकता.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ४०० रुपये येतो.

२. बुनक्कर (Bunkker), गोवा

 

 

जर तुम्हाला काही वेगळा अनुभव घेण्याची इच्छा असल्यास, बुनक्करचा Namesake Backpackers हॉस्टेल खास तुमच्यासाठी बनवलेले आहे.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ५०० रुपये येतो.

३. Bunked Up हॉस्टेल, वाराणसी

 

 

धर्मनगरी वाराणसीमध्ये असलेले हे हॉस्टेल तुम्हाला शांती आणि आराम देईल. धर्म नगरीच्या अद्भुत दृश्यासह सकाळचा नाश्ता बॅकपॅकर्सचे मन आनंदी करून टाकते.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ५०० रुपये येतो.

४. रेड लॉलीपॉप हॉस्टेल, चेन्नई

 

 

चेन्नईचे सौम्य ऊन आणि आनंदी करून टाकणारे वातावरण येथील  खास गोष्ट आहे. येथे एकदा आल्यानंतर या ठिकाणाला विसरणे खूप कठीण आहे.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ६५० रुपये येतो.

५. बेडपूल, जोधपुर

 

 

जर तुम्हाला कलेच्या गोष्टी आवडत असतील, तर हे हॉस्टेल तुमच्यासाठीच आहे. या हॉस्टेलच्या रुमच्या भिंतींवर बनलेली कलाकुसर पाहून तुम्हाला या जागेशी एक नाते निर्माण होईल.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ४०० रुपये येतो.

६. द जर्नी, उदयपुर

 

 

हॉस्टेलच्या गच्चीवरून तलावांचे दिसणारे सुंदर दृश्य आणि  येथील विशेषता आहे. निसर्गावर प्रेम करत असाल आणि अस्सलं खवय्ये असाल, तर ही जागा तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ३०० रुपये येतो.

७. Mystic Dervish, जेसलमेर

 

 

जर तुम्ही आधुनिक सुख – सुविधांच्या बरोबरच जेसलमेरच्या सुंदरतेचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही येथे येऊन काही दिवस घालवू शकता.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ४५० रुपये येतो.

८. Bedweiser Backpackers Hostel, आग्रा

 

 

हे हॉस्टेल खूपच सुंदर आहे. प्रेमाची निशाणी असलेला आग्राचा ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या लोकांसाठी हे हॉस्टेल एक योग्य पर्याय आहे. या हॉस्टेलमधील कलाकुसर देखील कलाप्रेमींना भावणारी आहे.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ४५० रुपये येतो.

९. बंक स्टे, ऋषिकेश

 

 

पवित्र शहर ऋषिकेश हे स्तुतीच्या योग्य आहे. ऋषिकेशला तुम्ही अॅडव्हेन्चर स्पोर्ट्सचा आनंद देखील घेऊ शकता. येथे एकदा तरी फिरण्यासाठी नक्की गेले पाहिजे आणि त्यासाठी आता जास्त पैसे देखील घालवायची गरज नाही. या हॉस्टेलमध्ये तुम्हाला सर्व उत्तम सुविधा मिळतील, त्याही खूपच कमी किंमतीत.

===

===

येथे राहण्याचा खर्च जवळपास ४०० रुपये येतो.

१०. The Mansion 1907, म्हैसूर

 

 

म्हैसूरमधील हे हॉस्टेल एक पारंपारिक इमारत आहे, जी जवळपास १०० वर्ष जुनी आहे. जर तुम्ही जुन्या काळाचा अनुभव घेऊ इच्छित आहात, तर तुम्ही येथे येऊन काही वेळ घालवू शकता.

येथे राहण्याचा खर्च जवळपास ५०० रुपये येतो.

अशी ही आणि इतर काही हॉस्टेलस् खूपच स्वस्त आणि आपल्या खिशाला परवडणारी आहेत. त्यामुळे यापुढे हॉटेल्समध्ये राहण्यापेक्षा येथे राहून पैसे वाचवा आणि फिरण्याचा आनंद लुटा.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version