Site icon InMarathi

जर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर एकदा हा उपाय ट्राय करून बघाच

indian boy reading inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यातील काहींना नक्कीच लहानपणी अभ्यास करायला आवडत नसेल. अभ्यास करायला घरातल्या लोकांनी सांगितल्यावर आपण अभ्यास करण्यापासून कसे वाचता येईल, यासाठी वेगवेगळी कारणे शोधत असायचो. पण तरीही परीक्षा जवळ आल्यावर काहीही करून अभ्यास हा करावा लागायचाच.

पण कितीही वाचले, तरी देखील परीक्षेला गेल्यावर काहीही आठवत नसे. बहुतेक लोकांना या समस्येला सामोरे जावे लागले असेल.

 

काहीजण याच्या विपरीत असतील, कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती काही सारखी नसते. असो, ते प्रत्येकाच्या समजण्यावर आहे. पण आजही मुलांना या समस्यांमधून जावे लागत आहे.

मुलांनी कितीही वाचले, तरीदेखील त्यांना ते काही वेळाने आठवत नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये वाचून देखील त्याबद्दल काहीही लिहायला जमत नाही. पण यावर आता शास्त्रज्ञांनी एक उपाय सांगितला आहे, ज्याच्यामुळे तुम्ही वाचलेले विसरणार नाही.

 

चला तर मग जाणून घेऊया, शास्त्रज्ञांच्या या संशोधनाबद्दल..

एका रिसर्चनुसार, जे विद्यार्थी जोर – जोरात बोलून वाचतात, त्यांनी वाचलेले ते विसरण्याची शक्यता थोडी कमी आहे.

या शोधासाठी ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, ज्यांना १६० शब्द दिले गेले. त्यातील काहींना हे शब्द जोर – जोरात वाचायला सांगितले गेले आणि काही विद्यार्थ्यांना याच शब्दांना शांत राहून लक्षात ठेवण्यास सांगितले गेले. यानंतर खूपच प्रभावीपणे या संशोधनाचे विशेषण करण्यात आले.

शास्त्रज्ञांनी याची योग्यरीत्या पडताळणी केली आणि त्यांनतरच या विसरण्याच्या गोष्टीवर हा उपाय शोधून काढला.

 

 

या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, ७७ टक्के शब्द हे जोर – जोरात वाचणाऱ्या मुलांना लक्षात होते. शांत राहून हे शब्द लक्षात ठेवणाऱ्या मुलांना ते बरोबर आठवत नव्हते. या संशोधनातून शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांना हे सांगण्यामध्ये यशस्वी झाले की, शांत राहून वाचण्यापेक्षा जोरजोरात वाचन करणे अधिक प्रभावशाली असते.

शांत राहून वाचल्यास ते जास्त काळ आपल्या लक्षात राहणार नाही आणि नेमक्या वेळी आपण ते विसरू शकतो. त्यामुळे जोरात वाचणेच सर्वात योग्य आहे.

 

 

त्यामुळे जर तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जात असाल आणि तुमची परीक्षा लवकरच सुरू होणार असेल, तर तुम्हाला परीक्षेला येणाऱ्या भागाचा जोर – जोरात वाचून अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा.

असे केल्याने तुम्हाला त्यातील बहुतेक भाग लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेमध्ये योग्य ते लिहून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल. यापुढे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि आपल्या मित्रमंडळींना देखील सांगा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version