Site icon InMarathi

देशासाठी काम करणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर खरंच ठार केलं जातं का, सत्य जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुत्रा हा एक इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्रा हा आपल्या मालकाशी नेहमी इमानदारीने वागतो. तो आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी मानतो.

तसेच, कुत्रा हा अत्यंत चपळ आणि हुशार प्राणी आहे. त्याला योग्यप्रकारे ट्रेनिंग दिल्यास तो गुन्हेगारांना शोधण्यासाठी देखील पोलिसांना मदत करतो.

 

 

सैन्यामध्ये माणसांबरोबरच हे कुत्रे देखील देशाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. जेव्हा कुत्र्याने स्वतःच्या जीवाशी खेळून एखाद्या सैनिकाचे प्राण वाचवले आहेत असे देखील कितीतरी वेळा झाले आहे.

सैन्यातील हे कुत्रे बॉम्ब, दारुगोळा आणि आतंकवाद्यांच्या ठिकाणांना शोधून काढण्यासाठी सैन्याची मदत करतात. कुत्र्यांच्या याच इमानदारीमुळे त्यांना माणसांचा खरा मित्र म्हटले जाते.

 

 

एकवेळ तुमचा मित्र तुमची मदत करण्यापासून मागे हटेल, पण तुमचा कुत्रा कधीही मागे हटणार नाही. मात्र, असे म्हटले जाते, की सैन्यात काम केलेल्या या कुत्र्यांना निवृत्तीनंतर मारून टाकण्यात येते.

हे कुत्रे जेव्हा सैन्यामधून निवृत्त होतात, तेव्हा सैन्याद्वारे त्यांना गोळी मारून ठार करण्यात येते. अशा घटना घडल्या आहेत. अर्थातच, ही विचार करण्याची गोष्ट आहे की, सैन्याची एवढी मदत करूनही या कुत्र्यांना का मारले जाते?

आज यावरील सत्य आपण जाणून घेऊयात.

 

 

भारतीय सैन्यामध्ये तीन जातीच्या कुत्र्यांना समाविष्ट करून घेतले जाते. यामध्ये लेब्रोडोर, जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम शेफर्ड या जातींचा समावेश होतो. सैन्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या कुत्र्यांच्या खाणे – पिण्यापासून त्यांच्या सुरक्षेपर्यंत सर्वप्रकारे त्यांची काळजी घेतली जाते.

या कुत्र्यांना योग्य ते प्रशिक्षण देखील दिले जाते. हे कुत्रे प्रत्येकवेळी एखाद्या आर्मी ऑफिसरसारखे अलर्ट राहतात.

 

 

जेव्हा एखादा कुत्रा एक महिन्यापेक्षा जास्त आजारी असेल किंवा आपली ड्युटी योग्यप्रकारे करू शकला नाही, तर त्या कुत्र्याला अॅनिमल यूथेनेशिया नावाचे विष देऊन मारून टाकले जाते.

===

===

सैन्यामध्ये कुत्र्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मारून टाकण्याची परंपरा खूप जुनी आहे. हे त्या काळापासून चालत आलेले आहे, जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते.

 

 

कुत्र्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मारून टाकण्याचे पहिले कारण हे आहे की, कुत्र्यांना सैन्याच्या बेस लोकेशनची पूर्ण माहिती असते, तसेच त्यांना सैन्याचे कितीतरी गुप्त गोष्टी माहीत असतात.

त्यामुळे या कुत्र्यांना एखाद्या सामान्य माणसाच्या हाती देणे, हा सुरक्षेला खूप मोठा धोका ठरू शकतो. हा धोका टाळण्यासाठी सैन्य असा कटू निर्णय घेतं.

 

 

शिवाय कुत्र्यांना सैन्यामध्ये विशेष सुविधा दिल्या जातात, ज्यांची या कुत्र्यांना सवय लागते. सैन्यासारखी या कुत्र्यांना सुविधा देणे कोणत्याही माणसाला किंवा वेल्फेअर सोसायटीला खूपच कठीण असते.

आणि एक कारण असे आहे की, सेना त्यांना दुसऱ्या कोणाकडे पाठवू इच्छित नसते. ते म्हणजे ह्या कुत्र्यांचा सन्मान…!

 

 

त्यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी विशेष आदरांजली वाहिली जाते. जर कुत्रे रिटायर करून सोडून दिले तर ही आदरांजली देता येणार नाही… हे ते कारण!

आजची नेमकी परिस्थिती

यामागील नेमकं सत्य काय, ते जाणून घेण्यासाठी जर इंटरनेटवर शोध घेतला तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. याबाबत चक्क दोन विरोधी बाजू पाहायला मिळतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

 

===

पहिली बाजू

याबद्दल द प्रिंट या वृत्तपत्राच्या माहितीनुसार,

२०१५ साली नवी नियमावली लागू करण्यात आली. त्यामुळे २०१५ नंतर आर्मीमधून निवृत्त झालेल्या कुठल्याही कुत्र्याला ठार करण्यात येत नाही. याउलट त्यांची योग्यप्रकारे काळजी घेण्यात येते.

 

 

त्यांचे असे म्हणणे आहे, की मध्यंतरी सोशल मीडियावर याबद्दल जी माहिती देण्यात आली होती, ती खरी नाही. सोशल मीडियावरील या पोस्ट्समध्ये असे म्हटले आहे की, या कुत्र्यांना मारण्यात येते. मात्र, सत्यता पडताळून पाहिली तर ही गोष्ट खरी नसल्याचे लक्षात येईल.

केवळ, आजाराने त्रस्त असणाऱ्या कुत्र्यांना ठार केले जाते. याचा शुद्ध आणि स्वच्छ हेतू, त्या कुत्र्यांना आणि त्यांच्यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये एवढाच असतो. याव्यतिरिक्त कुणालाही केवळ वृद्धत्व आले म्हणून मारले जात नाही.

 

 

गुप्त ठिकाणांबद्दल माहिती असणारे हे कुत्रे चुकीच्या हातात गेले, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. या कुत्र्यांना मिळत असलेल्या सर्व सोयीसुविधा इतर कुणीही पुरवू शकत नाही, आणि याच दोन कारणांसाठी या कुत्र्यांना इतर कुणाच्याही हाती सुपूर्द केले जात नाही. असे त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले गेले होते.

 

 

असे मुद्दे मांडण्यात आल्यामुळेच ती पोस्ट लोकांना खरी वाटली असे आर्मी ऑफिसर्सचे म्हणणे असे आहे. मात्र, हे सत्य नाही असे ठासून सांगताना, या प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे सुद्धा हे ऑफिसर्स म्हणतात.

अशा प्राण्यांसाठी विशेष जागा निश्चित केल्या गेल्या आहेत. त्याच्यासाठी ही ‘रिटायरमेंट होम्स’ असतात. तिथे त्यांना पाठवण्यात येते. तिथेच त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात असल्याचे आर्मी ऑफिसर म्हणतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच या लिंकला भेट देऊ शकता.

 

दुसरी बाजू

मात्र, इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्स यांचे मत मात्र याउलट असल्याचे दिसते

ते असे म्हणतात की आर्मीमधून निवृत्त झालेले कुत्रे ठार केले जातात. सैन्यात सहभागी असलेल्या कुत्र्यांची आणि घोड्यांची तंदुरुस्ती वेळोवेळी तपासली जाते. यात सलग एक महिन्याहून अधिक काळ आजारी ठरलेला प्राणी ठार करण्याचा निर्णय घेतला जातो. एका विशिष्ट प्रकारचा विषप्रयोग करून त्यांना मारून टाकले जाते.

एका आर्मी ऑफिसरने नाव न सांगण्याच्या बोलीवर असे सांगितले आहे की, अशा आजारी प्राण्यांना ठार करणे हाच एकमेव पर्याय असतो. त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे बाकी असतील, तरीही जे ते आर्मीच्या कामासाठी तंदुरुस्त नसतील, तर त्यांना मारून टाकण्याचा निर्णय घेतला जातो.

 

 

ज्या कामावर त्या कुत्र्याची नेमणूक झाली आहे, ते काम करणे त्याला शक्य नसल्यास त्या कुत्र्याचा जीव घेतला जातो. त्याची तंदुरुस्ती अशावेळी फारच महत्त्वाची ठरते. तंदुरुस्ती आणि उपयुक्तता सिद्ध न करू शकणारा कुत्रा ठार केला जातो.

तर काही आर्मी ऑफिसर्सचे असे म्हणणे आहे की, आर्मी देत असलेल्या सुविधा पुरवणे कुठल्याही संस्थांना शक्य नसते. म्हणूनच, त्या कुत्र्यांचे हाल होऊ नयेत, त्यांचा अनादर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जातो. या इंग्रजी वृत्तपत्राने आर्मी ऑफिसर्सशी संवाद साधल्यावर ही माहिती मिळाली आहे.

 

 

सामाजिक संस्थांचे असे म्हणणे आहे, की आर्मीचे वागणे चुकीचे आहे. हे कुत्रे एखाद्या संस्थेच्या ताब्यात देणे त्यांना सहज शक्य आहे, मात्र ते असे करत नाहीत.

 

 

नेमकी परिस्थिती काय??

थोडक्यात सांगायचे झाले तर, या कुत्र्यांची सध्याची स्थिती काय आहे, याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला, तर अशीच वेगवेगळी आणि विरोधाभास असलेली माहिती पाहायला मिळते.

नेमके काय घडते, याबद्दल विरोधी मते पाहायला मिळतात. याबाबतचे सत्य सहजरित्या शोधणे अशक्य आहे, मात्र, भारतीय सैन्यातील इतर सैनिकांइतकेच हे कुत्रे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा.

देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या कुत्र्यांना अशाप्रकारे ठार केले जात असेल, तर तसे होऊ नये, अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो!

 

 

====

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version