Site icon InMarathi

निःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर

parrikar inmarathi

india.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताचे माजी संरक्षणमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त काल संध्याकाळी आले आणि देशाच्या काळजाचा ठोका चुकला.

साधी राहणी आणि प्रामाणिक कामकाजाबद्दल प्रसिध्द असणाऱ्या मनोहर पर्रीकर यांनी आपल्या एकंदर कारकिर्दीत भारतीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे.

त्यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे..

पर्रीकर हे देशाचे पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री आहेत. पण फक्त हेच नाही तर अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना इतर नेत्यांहून वेगळ्या दाखवतात.

त्यांच्यातील साधेपणा आणि नम्रता यांची अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे आपले नेते हे जनतेचे सेवक असल्याचे मानले जाते. त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर.

 

indianexpress.com

१३ डिसेंबर १९५५ साली गोव्याच्या मापुसा येथे जन्मलेले मनोहर पर्रीकर हे भारताचे पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री होते. त्यांनी मुंबई येथून आयआयटीची पदवी घेतली होती.

पर्रीकर यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतला आणि त्यांच्यातील कलागुणांना बघत केवळ २६ वर्षांच्या वयात त्यांना गोव्याचे आरएसएसचे संघचालक बनविण्यात आले.

१९९४ साली ते पहिल्यांना आमदार बनले. १९९९ मध्ये पर्रीकर हे गोवा विधानसभेचे विरोधीपक्षाचे लीडर होते. 

१९९४ साली पर्रीकर जेव्हा पहिल्यांदा आमदार बनले तेव्हा राज्यात भाजप सरकारच्या केवळ ४ जागा होत्या. पण पर्रीकर यांनी ६ वर्षांत गोव्यात भाजप सरकारची सत्ता आणली.

 

indiatimes.com

पर्रीकर यांच्या एडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गेनाइजेशन स्किल्स मोदींना भावल्या. म्हणूनच मोदींनी २०१४ ला पर्रीकर यांना कॅबिनेटमध्ये घेत त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली.

पर्रीकर यांच्या पत्नी मेधा यांची २००१ साली कॅन्सरच्या आजाराने निधन झाले, त्यांना उत्पल आणि अभिजात हे दोन मुलं आहेत.

उत्पल याने अमेरिकेच्या मिशिगन स्टेट महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं आहे तर अभिजात हा लोकल व्यावसायिक आहे.

 

indiatimes.com

त्यांच्या मुलाच्या लग्नात जिथे सर्व गेस्ट सूट-बूट मध्ये येत होते तिथे पर्रीकर हे त्यांची ओळख असणाऱ्या हाफ शर्ट आणि साध्या पॅन्ट मध्ये सर्वांचे स्वागत करत होते.

मुख्यमंत्री असतानाही आपल्या कार्यालयात जाण्यासाठी ते दुचाकीचा वापर करत.

 

nizgoenkar.org

त्यांच्यासाठी त्यांच्या कामापेक्षा जास्त काही नाही, ते दिवसाला १६-१८ तास काम करत असतात.

एकदा अर्ध्या रात्री पर्यंत आपल्या ओएसडी गिरीराज वर्नेकर यांच्या सोबत एक प्रोजेक्टवर चर्चा करत होते. जाताना वर्नेकर यांनी विचारले की, उद्या कितीला येऊ, तेव्हा पर्रीकर म्हणाले की उद्या थोड्या उशिरा येऊ शकता, सकाळी ६:३० पर्यंत आलात तरी चालेल.

जेव्हा वर्नेकर सकाळी ६:१५ ला मुख्यमंत्री बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना कळाले की, पर्रीकर हे सकाळी ५:१५ वाजेपासूनच ऑफिसमध्ये काम करत आहेत.

 

indianexpress.com

फिल्म फेस्टिवल २००४ च्या उद्घाटन समारंभात पर्रीकर पोलिसांसोबत आयोजन स्थळाच्या बाहेरील ट्राफिकला सांभाळण्याच्या कामात लागले होते.

२०१२ साली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पर्रीकर यांनी त्या प्रत्येक व्यक्तीशी हात मिळविला जी त्यांना अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर आली होती.

 

nizgoenkar.org

पर्रीकर जेवढे शिस्तबद्ध आहेत ते तेवढेच भावूक देखील आहेत. मार्च २०१२ साली गोव्याचे पर्यटन मंत्री मातनही सलदन्हा यांचा मृत्यू झाला तेव्हा पर्रीकर यांना अश्रू अनावर झालेले अनेकांनी बघितले.

 

पर्रीकर हे नियमांचे पक्के होते. पण त्यांच्यातील माणुसकी देखील शिकण्यासारखी आहे. एकदा एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन साप्ताहिक जनता दरबार येथे पोहोचली आणि तिने तिच्या मुलासाठी लॅपटॉप मागितला तेव्हा तिथे असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की तो मुलगा त्या योजनेत येत नाही.

तेव्हा पर्रीकरांना आठवले की, ते त्यांच्या जनसंपर्क अभियानावेळी त्या महिलेला भेटले होते आणि त्यांनी या योजने बद्दल सांगितले होते. त्यानंतर पर्रीकर यांनी लगेचच त्या मुलाला लॅपटॉप देण्याची व्यवस्था केली आणि त्याचे पैसे स्वतःच्या खिश्यातून दिले.

पर्रीकर हे नेहेमी इकोनॉमी क्लास मधून प्रवास करतात. एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे आपलं समान स्वतः नेताना आणि प्रवाश्यांच्या रांगेत उभे राहून बोर्डिंग बस मधून जाताना त्यांना कित्येकांनी पहिले आहे.

 

india.com

निस्वार्थी राजकीय नेत्याची आणि सेवेच्या संस्कृतीची वानवा असणार्या सध्याच्या काळात साधेपणा आणि शिस्तीचा एकाच वेळी अवलंब करणारा पर्रीकर यांच्यासारखा नेता विरळाच.

आदर्श राजकारणी कसा असावा याचे परिमाण प्रस्थापित करणाऱ्या मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version