Site icon InMarathi

जगातील ७ आश्चर्य आता एकाच ठिकाणी बघायला मिळतात, तेही आपल्या भारतात!

president-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील ७ आश्चर्य बघण्यासाठी लोकं अख्ख जग पालथे घालतात. या अश्चर्यांना प्रत्यक्षात बघावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामानाने भारत जरा नशीबवान आहे, कारण या ७ आश्चर्यांपैकी एक तर आपल्या भारतातच आहे.

पण इतर ६ आश्चर्य बघायची म्हटलं तर चीन, चिली, ब्राझील, इजिप्त, इटली आणि जॉर्डनला जावे लागणार, जे काही प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे नाही.

त्यामुळे अनेकांच्या या ७ आश्चर्यांना पाहण्याची इच्छा पूर्ण होत नाही. पण आता तुम्हाला या ७ आश्चर्यांना बघण्यासाठी सात समुद्रापार जाण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त आपल्या कोलकत्यापर्यंत जायचे आहे. हो..!

आता तुम्हाला हे ७ आश्चर्य एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत.

 

 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ड्रिम प्रोजेक्ट मधील एक असलेले जगातील ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती इको पार्क येथे बनविण्यात आल्या असून आता तुम्हाला ही सातही आश्चर्य एकाच ठिकाणी बघता येणार आहेत.

 

 

येथे तुम्हाला इजिप्तचे पिरॅमिड्स बघायला मिळतील…

 

 

जगातील सर्वात मोठे Amphitheatre, ही आहे रोमच्या Colosseumची प्रतिकृती…

 

 

ब्राझीलच्या Christ the Redeemer ची प्रतिकृती, ही १७.७ मीटर उंच आहे…

 

 

चिलीच्या इस्टर द्वीपच्या मुर्त्या ही आहेत. त्यांची एक छोटीशी प्रतिकृती… यांची उंची ७ मीटर असून त्या ७०० चौरस मीटरच्या क्षेत्रात बनविण्यात आल्या आहेत.

 

 

ही आहे भारताची शान असलेल्या ताजमहालची प्रतिकृती, ही ४.३५ मीटर उंच असून याच्या बाजूला यमुना नदी आणि दोन लाकडी पूल देखील दाखविण्यात आले आहेत.

          ===

 

 

‘ग्रेट वॉल ऑफ चाइना’ चे एक छोटे स्वरूप तुम्हाला येथे बघायला मिळेल…

 

 

Petra Jordan ची ही प्रतिकृती ६४० चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आली आहे. ज्यात ३ पर्वत दाखविण्यात आले आहे, ज्यांची उंची १३ मीटर आहे.

या पूर्ण प्रकल्पाकरिता १५ कोटी रुपयांचा खर्च लागला असून ४८० एकराच्या मोठ्या इको पार्कमध्ये या जगातील सर्वात सुंदर ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. याची स्थापना बंगालच्या Housing Infrastructure Development Corporation (HIDCO) यांनी केली आहे.

मग वाट कसली बघताय, कलकत्याला जा आणि जगातील ७ आश्चर्य बघण्याचा आनंद अनुभवा…

स्त्रोत : hindustantimes

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version