५० करोड रुपयांची डील करणारी पी.व्ही. सिंधू ठरली पहिली महिला बॅडमिंटनपटू
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
रियो ऑलम्पिकमध्ये भारताला सिल्व्हर मेडल मिळवून देणारी पी.व्ही. सिंधू सध्या परत चर्चेत आली आहे – तिच्या ५० करोड रुपयांच्या डील मुळे…!
क्रिकेटपटू किंवा फुटबॉलपटू यांना एवढ्या मोठ्या रकमेच्या डील या आधी मिळालेल्या आहेत. बॅडमिंटन जगतातील एक महिला खेळाडूला इतक्या प्रचंड रकमेची डील प्रथमच मिळाली आहे. साहजिकच या गोष्टीचे सर्वांनी कौतुकच केले आहे.
बेसलाईन या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीने पी.व्ही. सिंधू सोबत ५० करोड रुपयांचा करार केला आहे. बदल्यात सिंधू या कंपनीचे प्रोडक्ट्स एन्डोर्स करेल.
हा करार मान्य करताना पी.व्ही. सिंधूने एक अशी अट घाली होती की, ज्या प्रोडक्ट्समुळे शरीराला हानी पोचेल अशी कोणत्याही प्रकारची उत्पादनांची मी जाहिरात करणार नाही.
सिंधूच्या या अटीमागची प्रेरणा कारण आहेत, तिचे प्रशिक्षक – गोपीचंद.
पुल्लेला गोपीचंद यांनीदेखील शरीराला हानी पोचवणाऱ्या प्रोडक्ट्सची कास धरली नव्हती. अश्या चांगल्या सवयी अंगीकारल्यानेच आपण करियर मध्ये या स्थानावर उभे असल्याचे सिंधू अभिमानाने सांगते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.