गुजरात निडवणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, “साम टीव्ही” चे वृत्त निवेदक, अनिकेत पेंडसे ह्यांची चपखल टिपणी.
हॅट्स ऑफ राहुल गांधी !
राहुल गांधी खरंच परिपक्व होतायंत. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागू देत पण माझ्यासाठी राहुल जिंकलेत. राहुल यांनी स्वत:ला ओळखलंय. राहुल यांच्या कारकिर्दीतलं हे १८० डिग्री वळण आहे. राहुल फक्त मोदींना कोंडीत पकडत नाहीयेत धू धू धूत आहेत.
मोदी पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत पोहचलेत मात्र राहुल गांधी गुजरातवर ठाम राहिलेत.
मोदींचं भाषण मी पूर्ण ऐकलंय. तितकं गुजराती समजतंही. गेला महिनाभर माझ्या शोमध्ये गुजरातचा एक रिपोर्ट करायचं असं ठरलंय. त्यामुळं रोज यांची भाषण ऐकतोय. मोदी विकासाच्या मुद्द्यावर १० टक्केही बोलत नाहीत. मोदी-शहा जात, मंदिर, गुजरात नो बेटा-देश नो नेता, अस्मिता यावर बोलतायत.
राहुल नर्मदा प्रकल्पाबाधितांवर बोलतायत. गुजरातच्या पुरावर आणि ढिसाळ मॅनेजमेंटवर बोलतायत. गुजरातच्या प्रदूषणावर बोलतायत. (गुजरातच्या जलप्रदुषणासंबंधी इच्छुकांनी माहिती घ्यावी)
भाजप प्रवक्त्यांकडून राहुल यांच्यावर व्यक्तिगत टीका होतेय. पण राहुल हे वारंवार सांगत आहेत की मी मोदींवर व्यक्तिगत टीका करणार नाही. असं सांगतानाही राहुल गांधींनी मोदींवर प्रश्नांची जो काय भडिमार केलाय तो ऐकण्यासारखा आहे.
मोदींवर टीका करताना ती सकारात्मक टीका आहे. खिल्ली उडवणारी टीका नाहीये. राहुल यांनी टीपीकल धाटणीतले Generalise प्रश्न विचारले नाहीयेत तर थेट मुद्द्यांना हात घातलाय. तेही अगदी शालीन, सभ्य भाषेत. कुठेही अभिनिवेश नाही, नाटकीपणा, अनैसर्गिक हातवारे नाहीत.
ही सहजताच राहुल गांधींचा सर्वात मोठा गुण आहे.
राहुल यांच्यात सगळ्यात मोठा फरक जाणवला तो म्हणजे ते पोपटपंची करत नाहीयेत. राहुल यांच्याद्वारे दुसरं कोणी बोलत नाहीयेत. ते स्वत: बोलत आहेत.
राहुल यांनी स्वत: प्रश्नांचा, भारतीय मनाचा जिव्हाळ्यानं अभ्यास सुरु केलाय. राहुल यांची सहजताच त्यांचं सर्वात श्रेष्ठ बलस्थान आहे. सहजतेमुळं ते जास्त क्लिक होतायंत.
आणि – आज मला राहुल गांधी जास्त क्लिक झाले, कारण –
एकीकडे विकास कसा झालाय हे दाखवण्यासाठी मोदींनी सिप्लेनमधनं प्रवास केला पण राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. शेवटच्या प्रश्नापर्यंत राहुल गांधींनी पत्रकारांच्या गुगली प्रश्नांना उत्तर दिली. राहुल व्हिजन या मुद्द्यावर ठाम होते.
प्रश्न मणिशंकर अय्यरवरुन विचारला तरी उत्तराचा शेवट व्हिजननं होत होता आणि ही भाषणातली पोपटपंची नव्हती. बोलताना एक आत्मविश्वास जाणवत होता आणि हेच राहुल गांधींनी कमावलंय!
अभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.
हॅट्स ऑफ राहुल गांधी !
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.