फोटो काढताना बोलले जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फोटो काढायचा म्हणजे तो उत्तम यायलाच हवा. अर्थात, फोटो छान यायला हवा असेल तर त्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे चेहऱ्यावर एखादी झकास स्माईल असणं. हसरा चेहरा हा नेहमी चांगलाच दिसतो.
चेहरा हसरा आणि चांगला असला की फोटो चांगला येणं सुद्धा स्वाभाविक आहे. यासाठी बरेच जण एक ठरलेला फंडा वापरताना दिसून येतात. याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेलच…
फोटो काढताना तुम्ही अनेक वेळा ‘Say Cheese’ असं म्हटलं किंवा ऐकलं असेल. जेव्हा कधी आपल्याला कुणी ‘Say Cheese’ म्हणतं, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल येते आणि आपण आनंदाने आपला फोटो काढतो.
हा फोटो हमखासपणे “एकदम बढिया” येतो…
आपल्या आजूबाजूला असणारी बहुतेक माणसे फोटो काढताना या वाक्याचा वापर करतात. कधी कधी फोटो काढताना, गंमत किंवा उगाचंच टाईमपास म्हणून “इडली” किंवा “से बटर” अशी मस्ती करणारी मंडळी सुद्धा पाहायला मिळतात.
पण तुम्हाला माहित आहे का ? की फोटो काढताना या “SAY CHEESE” या वाक्याचा वापर का करतात, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ? चला तर मग जाणून घेऊया, हा वाक्याचा वापर करण्याच्या मागील कारण…
‘Say Cheese’ चा वापर करण्यामागे खूप रंजक गोष्ट आहे. एका थेअरीनुसार, ch चा उच्चार तुमच्या दातांना एका अशा पोजिशनवर आणतात की, जेव्हा ee बोलले जाते, तेव्हा चेहऱ्यावर एका विशिष्ट प्रकारची स्माईल येते.
याचा वापर सर्वात पहिल्यांदा १९४० मध्ये करण्यात आला होता. जोसेफ डेव्हीसच्या म्हणण्यानुसार, हा हसण्यासाठी सर्वात चांगला फॉर्म्युला आहे आणि त्यामुळे आपण जेव्हा आपली फोटो काढत असतो, तेव्हा आपल्याला आनंदी दाखवण्यासाठी असे बोलायला सांगितले जाते.
त्यावेळी तुम्ही जरी कोणत्याही दुसऱ्या विचारात असलात, तरीदेखील तुम्हाला हे शब्द आनंदी दाखवतात.
डेव्हीसने ही गोष्ट मिशन टू मॉस्को दरम्यान आपलाच फोटो काढताना सांगितली होती. हे खूपच सोपे आहे, तुम्हाला फक्त Cheese बोलायचे आहे आणि ते बोलल्यामुळे आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटेल.
त्याने हे देखील सांगितले होते की, त्याने ही गोष्ट एका राजनेत्याकडून शिकली आहे. एका खूप प्रसिद्ध राजनेत्याकडून, परंतु त्यांचे नाव उघड करण्यात आले नाही.
असे मानले जाते की, डेव्हीस यांनी ज्या नेत्याबद्दल सांगितले, ते अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलीन रुसवेल्ट होते. रुसवेल्ट यांनी १९३३ पासून १९४५ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती पद भूषवले होते. डेव्हीस हे राष्ट्रपती रुसवेल्ट पदावर असण्याच्या काळामध्ये माजी राजदूत देखील राहिलेले आहेत.
आता राष्ट्रपती रुसवेल्ट यांनी स्वतः ही गोष्ट तयार केली होती की दुसऱ्या कुणाकडून ही गोष्ट आत्मसात केली होती, याबद्दल नक्की सांगणे थोडे कठीण आहे.
पण हे तर नक्की सांगता येते की, त्यांनी केलेल्या याच्या वापरानंतर हे वाक्यांशचा (Phrase) खूपच लोकप्रिय झाले आहे आणि आज देखील फोटो घेण्याअगोदर बहुतेक लोकं याचा वापर मोठ्या उत्साहाने करतात. लोकांना देखील असे करण्यामध्ये खूप मज्जा वाटते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.