Site icon InMarathi

जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील या स्त्रिया माहित आहेत का?

Beautiful and Richest Muslim Women.Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखाद्या तरुणीकडे संपत्ती आणि सौंदर्य दोन्ही असेल तर… तर काही बोलायला शब्दच सापडणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा तरुणींची भेट घडविणार आहोत, ज्या मुस्लिम जगतातील श्रीमंत राजकुमारी आहेत.

यातील बहुतांश राजकुमारी पडद्याआड राहतात. या देखण्या राजकुमारींकडे बघितले तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सुंदर नट्याही यांच्यासमोर फिक्या पडतील असे वाटते.

जगातील श्रीमंत राजघराण्याशी संबंध असलेल्या या राजकुमारी अब्जावधी रुपयांच्या मालकीण आहेत. यातील काही कोट्यावधी रुपयांची स्वतःची कंपनी चालवितात तर काहींची स्वतंत्र बॅंक आहे. काही तर शाही घराण्याची सत्ता सांभाळीत आहेत.

यातील काही शाही घराण्यातील राजकुमारींची संपत्ती अंबानी-टाटा यांसारख्या श्रीमंतांपेक्षाही जास्त आहे. चला जर जाणून घेऊया या श्रीमंत आणि सुंदर राजकुमारींबद्दल…

राजकुमारी अमीरा

 

 

वरील छायाचित्र राजकुमारी अमीरा यांचे आहे. सौदीच्या शाही घराण्याचे राजकुमार अल-वालिद बिन तलाल यांच्या त्या पत्नी आहेत. तलाल एक मोठे बिझनेसमन असून गुंतवणुकदारही आहेत. अरब प्रांतातील ते सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.

मध्यंतरी फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती १.१४ लाख कोटी रुपये आहे.

 

जॉर्डनची राजकुमारी रानिया

 

 

प्रिंस अब्दुल्ला द्वितीय यांची ही महाराणी आहे. अब्दुल्ला यांनी अद्याप आपली संपत्ती जाहीर केलेली नाही. परंतु, स्टार ट्रेक थीम पार्क बनविण्यासाठी त्यांनी स्वतः १० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. रुबियन ग्रुपचे ते प्रमुख आहेत.

३१ ऑगस्ट १९७० मध्ये जन्म झालेल्या रानिया यांच्याकडे लग्नापूर्वी २२८ कोटी रुपयांची संपत्ती होती.

 

फातिमा कुलसुम

 

 

सौदी अरेबीयाचे प्रिंस शेख अवदी अल महंमद यांची फातिमा पत्नी आहे. जगातील सर्वांत श्रीमंत सौदी अरब राजघराण्याची ती महाराणी आहे. कौटुंबिक परंपरांमुळे आजवर त्यांचा चेहरा जाहीर झाला नव्हता.

 

महाराणी लला सलमा

 

 

मोरक्कोचे राजा महंमद सहावे यांची लला पत्नी आहे. लला यांना दोन मुले आहेत. सुमारे १६,२५० कोटी रुपयांची संपत्ती महंमद सहावे यांच्याकडे आहे. त्यांच्या संपत्तीची गुंतवणूक करण्यात लला यांचा मोलाचा सहभाग असतो.

लला यांचा दररोजचा खर्च ७ कोटी रुपये आहे.

 

नूर जाहिरा

 

 

मलेशियाची क्विन नूर जाहिरा ही सुल्तान मिजान जाईनल अबीदिन यांची पत्नी आहे. जाहिरा मलेशियाची १३ वी महाराणी आहे. त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा अद्याप खुलासा झालेला नाही.

परंतु, त्यांच्याकडे सुमारे १ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समजते.

 

मजीदा नूरूल बलकियाह

 

 

मजीदा नूरूल बलकियाह ब्रुनईचे सुल्तान हसन बलकियाह यांची दुसरी मुलगी आहे. त्यांचे पती अनक खैरुल खलिल शाही घराण्याशी संबंधित आहेत. मजीदा यांचे २००७ मध्ये लग्न झाले. या सुल्तानाकडे सुमारे १.३० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

मजीदाचे वडील सुल्तान हसन बलकियाह हे १९९७ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, तसेच त्यांना सोने खूप आवडत असे.

 

शेख मोझा बिंट नासीर

 

 

शेख हमाद बिन खलिफा अल थानी याच्या तीन पत्नींपैकी दुसरी शेख मोझा ही आहे. ह्या कतारमधील माजी राज्यकर्त्या आहेत. १९५९ मध्ये कतारमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे लग्न ६१ वर्षीय एच.एच. शेख हमाद बिन खलिफा अल थानी यांच्याशी कतारमध्ये झाला.

शेख हमाद याचे वार्षिक उत्पन्न ७ बिलियन पौंड म्हणजेच जवळपास ६०,५०० कोटींच्यावर आहे. अफाट तेल आणि नैसर्गिक गॅस असलेल्या देशांपैकी एक कतार आहे.

अशा या आणि इतर काही जगातील मुस्लिम राजवटीतील स्त्रिया या सुंदर तर आहेतच, पण तेवढीच गडगंज संपत्ती देखील त्यांच्याकडे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version