Site icon InMarathi

कडु औषधांपेक्षा “हा” चविष्ट उपाय अॅनिमियासारखे गंभीर आजार दूर करू शकतो

sabudana wada inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. पण उपवासाला घरात सजणारं ताट पाहिलं की ही म्हण किती योग्य आहे, याचा अंदाज येतो. मात्र उपवासाच्या या ताटात डोकावलं की एक गोष्ट कॉमन दिसते, ती म्हणजे साबुदाणा.

 

 

 

“साबुदाना खिचडी” ही सर्वांचीच आवडती, तर काहींकडून साबुदाणा वाड्याची फर्माईश केली जाते. पण केवळ उपवासाला खाल्ला जाणारा हा साबुदाणा आपल्या शरिरासाठी किती महत्वाचा आहे, हे तुम्हाला माहित आहे का? अॅनिमिया हा आजार सर्वांना परिचित आहे,

सध्याच्या धावपळीच्या जगात अॅमिनायाने ग्रस्त असलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

 

मग अशावेळी बालपणापासूनच डॉक्टरांची ट्रिटमेंट, कडु गोळ्या, अनेकदा लावावी लागणारी सलाईन्स असे खर्चिक आणि वेदनादायी उपचार करावे लागतात.

मात्र आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होवु नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.  याचसाठी प्रयत्नाची इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला देत आहोत.

 

 

भारतात वापरला जाणारा साबुदाना हा Topioca/cassova या वनस्पतीपासुन बनवतात.

त्यातील पोषणमुल्ये पुढीलप्रमाणे : Per100gm

Calories-350cal

Carb-94gm

Protien  0.2gm

Fiber  o.5gm

Iron 1.2 gm

Calcium.10mg

तसेच vit-B, vit-C, copper, potassium, magniessium या घटकाचाही समावेश असतो.

Calories भरपुर असल्याने ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत आहे .त्यामुळे लहान मुले,खेळाडु ,ऊपवास असल्यास साबुदाना ऊत्तम कार्य करतो.

 

 

तसेच नाश्त्यासाठीचा (breakfast)ऊत्तम पर्याय आहे .

Calories भरपुर असल्याने वजन वाढवण्यासाठी आहारात नक्की समाविष्ट करावा.

 

 

इतर फायदे

 

 

 

 

 

 

 

 

डायबिटीज व साबुदाणा

 

साबुदाण्याचा Glycemic index 85 असुन तो High GI मध्ये मोडतो. त्यामुळे Diabetic रुग्णांनी तुप, शेंगदाणा यांचा वापर करून केलेले साबुदाण्याचे पदार्थ खावेत. जेणेकरून त्याचा GI कमी असेल.

साबुदाण्याच्या शुद्धतेबाबत बर्याच शंका ऊपस्थित होतात, अनेकांच्या मते, साबुदाणा हा पचनासाठी जड असो असं मानलं जातं, तर काहींच्या मते साबुदाणा स्वच्छ, ताजा आहे की नाही हे निवडणं फार महत्वाचं असतं. मात्र तुम्हाला साबुदाण्याची निवड करायची असेल, तर त्यासाठी एक छोटी चाचणी नक्कीच उपयोगी ठरेल.

सावलीमध्ये साबुदाणा वाळवून घ्यावा. नंतर तो जाळावा. जर तो आधी फुलला व नंतर पुर्णतः जळाला व राखेचा अंशही त्यात राहीला नाही तरच तो शुद्ध समजावा.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version